Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 31:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्या समयी तरुण कुमारिका नृत्य करून हर्षावतील, तरुण व ज्येष्ठ लोकही त्यात सहभागी होतील. कारण मी त्यांच्या विलापाचे आनंदात रूपांतर करेन; मी त्यांचे सांत्वन करेन आणि दुःखाऐवजी त्यांना हर्ष प्रदान करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 त्या समयी कुमारी आनंदाने नृत्य करतील; वृद्ध व तरुण एकत्र आनंद करतील; मी त्यांचा शोक पालटून तेथे आनंद करीन, मी त्यांचे सांत्वन करीन, त्यांच्या दुःखानंतर त्यांनी आनंद करावा असे मी करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मग कुमारी आनंदीत होऊन नाचतील आणि तरुण व वृद्ध एकत्र आनंद करतील. कारण मी त्यांच्या शोकाचे रुपांतर उत्सवामध्ये करीन. मी त्यांच्यावर दया करीन आणि दुःखाच्याऐवजी त्यांच्या आनंदाचे कारण होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 31:13
22 Iomraidhean Croise  

बेखमीर भाकरीचा सण सात दिवस हर्षभराने पाळण्यात आला. सर्व देशभर आनंदोत्सव होता, कारण याहवेहने अश्शूरच्या राजाला इस्राएलाशी कनवाळूपणे वागण्यास आणि इस्राएलाच्या परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामामध्ये मदत करण्यास प्रवृत्त केले.


यरुशलेमच्या नवीन तटाच्या समर्पणविधीमध्ये भाग घेण्यासाठी देशातील सर्वच लेवी जिथे कुठे असतील तिथून शोधून यरुशलेम येथे पाचारण करण्यात आले, जेणेकरून या विधीमध्ये त्यांनी भाग घेऊन साह्य करावे, झांजा, सारंग्या, वीणा यांच्या संगीतासह गीते गाऊन उपकारस्तुती करावी आणि हा आनंदोत्सवाचा सोहळा साजरा करावा.


या आनंदाच्या दिवशी अनेक मोठमोठी अर्पणे करण्यात आणली, कारण परमेश्वराने त्यांना फार मोठा हर्ष दिला होता. स्त्रिया व मुलांनी देखील आनंद व्यक्त केला. यरुशलेममधील लोकांच्या आनंदाचे निनाद दूरवर ऐकू आले.


कारण त्या दिवशी यहूदी लोकांचे त्यांच्या शत्रूपासून रक्षण झाले आणि त्यांच्या दुःखाचे हर्षात आणि त्यांच्या शोकाचे आनंदोत्सवात रूपांतर झाले. आणि हा दिवस मेजवान्या देऊन व एकमेकांना सर्व प्रकाराच्या भेटी देऊन व गोरगरिबांना दानधर्म करून आनंदाने साजरा करावा असे त्याने पत्राद्वारे त्यांना कळविले.


जे अश्रूंनी पेरणी करतात, ते आनंदाने कापणी करतील.


युवक व युवतींनो, वृद्ध व बालके.


त्यांच्या गौरवार्थ नृत्य करीत, डफ आणि वीणा यांच्या संगीताच्या साथीवर स्तुती गा.


तुम्ही माझ्या शोकाचे रूपांतर हर्षनृत्यात केले. तुम्ही माझे शोकाचे गोणपाट काढून मला उल्हासाची वस्त्रे घातली,


त्या दिवशी तुम्ही म्हणाल: “याहवेह, मी तुमची स्तुती करेन, जरी तुम्ही माझ्यावर रागावला होता, तरी तुमचा राग दूर झाला आहे आणि तुम्ही माझे सांत्वन केले आहे.


आणि ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील. ते हर्षगीते गात सीयोनात प्रवेश करतील; अनंतकाळचा उल्हास त्यांच्या मस्तकावर असेल. हर्ष व उल्हासाने ते भरून जातील, दुःख व शोक दूर पळून जातील.


ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील. ते हर्षगीते गात सीयोनात प्रवेश करतील; अनंतकाळचा उल्हास त्यांच्या मस्तकावर असेल. हर्ष व उल्हासाने ते भरून जातील, दुःख व शोक दूर पळून जातील.


तर याहवेह सीयोनचे निश्चितच सांत्वन करतील आणि तिच्या सर्व ओसाड प्रदेशाकडे दयेने बघतील; ते तिचे वाळवंट एदेन बागेसारखे सुंदर करतील, तिची उजाड ठिकाणे याहवेहच्या बागेसारखी होतील. तिथे आनंद व उल्लास व्यक्त करण्यात येईल. उपकारस्मरण व गीतांचे स्वर तिथे ऐकू येतील.


तुझा सूर्य पुन्हा कधीही मावळणार नाही, आणि तुझ्या चंद्राचा कधी ऱ्हास होणार नाही. कारण याहवेहच तुझा सर्वकाळचा प्रकाश असतील; आणि तुझे शोकाचे दिवस संपतील.


याहवेहच्या कृपेचे वर्ष आणि परमेश्वराचा सूड घेण्याचा दिवस आला आहे, हे जाहीर करण्यास, आणि जे सर्व विलाप करतात त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.


सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना— राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट, विलापाऐवजी आनंदाचे तेल, निराशेच्या आत्म्याऐवजी स्तुतीचे वस्त्र बहाल करण्यासाठी. कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी ते नीतिमत्तेचे एला वृक्ष याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.


मी तुला पुन्हा उभारेन, आणि तू, इस्राएली कुमारिके, पुनर्वसित होशील. तू पुन्हा तुझे खंजीर घेशील आणि बाहेर जाऊन आनंदाने नृत्य करशील.


आनंद व हर्षाचे स्वर, वरांचे आणि वधूंचे आवाज आणि याहवेहला उपकारस्तुतीची अर्पणे आणणार्‍यांची हर्षगीते पुन्हा ऐकू येतील. ते म्हणतील, “याहवेहला धन्यवाद द्या, कारण ते चांगले आहेत; त्यांची प्रीती सर्वकाळ टिकते.” मी हा देश आधी होती तशी समृद्धी परत देऊन पुनर्वसित करेन,’ याहवेह असे म्हणतात.


सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “चवथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्यातील उपवास आता यहूदीयाच्या घराण्यास आनंदाचा व उल्हासाचा काळ व हर्षोत्सव म्हणून पाळले जातील. म्हणून सत्य व शांती यावर प्रीती करा.”


त्याच प्रकारे आता दुःख करण्याची तुमची वेळ आहे, परंतु मी तुम्हाला पुन्हा भेटेन तेव्हा तुमचे हृदय आनंदी होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही.


आणि लक्ष ठेवा. तुम्ही तिथे जा आणि शिलोहतील कन्या त्यांचे नृत्य करण्यासाठी बाहेर येतील, तेव्हा तुम्ही द्राक्षमळ्यातून धावत बाहेर निघा आणि तुम्ही प्रत्येकाने एकी एकीला धरून आपली पत्नी करून घ्यावी. नंतर बिन्यामीनच्या भूमीत परत यावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan