Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 30:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “कारण सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, ‘त्या दिवशी,’ मी त्यांच्या मानेवरचे जू मोडून टाकेन, त्यांच्या बेड्या तोडेन, आणि यापुढे परकीय लोक त्यांना गुलाम करणार नाहीत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी तुझ्या मानेवरील त्यांचे जू मोडीन, तुझी बंधने तोडीन, ह्यापुढे परके तुझ्या लोकांकडून दास्य करवून घेणार नाहीत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 सेनाधीश परमेश्वर म्हणतो त्या दिवशी असे होईल की, मी तुमच्या मानेवरील जोखड मोडीन आणि तुमची बंधने तोडीन, यापुढे परके तुला गुलाम करणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 30:8
16 Iomraidhean Croise  

त्यांना काळोखातून आणि गडद अंधकारातून बाहेर आणले, आणि त्यांचे साखळदंड तोडून टाकले.


त्या दिवशी त्यांचे ओझे तुमच्या खांद्यावरून, त्यांचे जू तुमच्या मानेवरून काढून घेतले जाईल. तुमच्या खांद्यावरून जू तुटले जाईल.


याहवेह याकोबवर दया करतील; पुन्हा एकदा ते इस्राएलची निवड करतील आणि त्यांना त्यांच्या मातृभूमीत स्थायी करतील. परदेशी लोक त्यांच्यात सामील होतील आणि याकोबाच्या वंशजांसोबत एकत्र येतील.


माझ्या भूमीवर मी अश्शूरांना चिरडून टाकेन; त्यांना माझ्या डोंगरावर तुडवेन. त्याचे जू माझ्या लोकांवरून काढून टाकेन, आणि त्याचे ओझे त्यांच्या खांद्यावरून उतरवेन.”


त्या दिवशी याहवेह तुम्हाला तुमच्या सर्व पीडा व अस्वस्थता व कठोर परिश्रमातून मुक्तता देतील.


कारण जसे मिद्यानाच्या पराभवाच्या दिवसामध्ये, तुम्ही त्यांच्यावर ओझे असलेले जोखड, त्यांच्या खांद्यांवरील लोखंडाची सळई, त्यांच्यावर जुलूम करणाऱ्याची काठी मोडून टाकली आहे.


“फार फार पूर्वी तुम्ही माझे जू झुगारून दिले व मी बांधलेले दावे तोडून टाकले; तुम्ही म्हटले, ‘आम्ही तुमची सेवा करणार नाही!’ अर्थात्, प्रत्येक उंच टेकडीवर, आणि प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली तुम्ही वेश्येप्रमाणे निजलात.


अनेक राष्ट्रे व महान राजे त्यांना गुलाम करतील. त्यांनी माझ्या लोकांचा कृत्याद्वारे व हस्तकृतीद्वारे ज्या प्रमाणात छळ केला, त्याच प्रमाणात मी त्यांना शासन करेन,” याहवेह असे म्हणतात.


याहवेहनी मला असे म्हटले आहे: “चामड्याच्या वाद्यांचा व गुणाकार चिन्हाच्या सळयांचा एक जू तयार कर आणि तो तुझ्या मानेवर ठेव.


सर्व राष्ट्रे, त्या देशाची वेळ येईपर्यंत, त्याच्या पुत्राची व त्याच्या नातवाची सेवा करतील, आणि नंतर अनेक राष्ट्रे व मोठमोठे राजे बाबिलोन जिंकून घेतील आणि त्याला आपला गुलाम करतील.


यावर संदेष्टा हनन्याह याने यिर्मयाहच्या मानेवरील जू घेतले व ते मोडले;


“जा आणि हनन्याहला सांग, ‘याहवेह असे म्हणतात, तू लाकडी जोखड मोडलेस, पण त्याऐवजी तुझ्या मानेवर लोखंडाची जोखड येईल.


आणि यहोयाकीमचा पुत्र, यहूदीयाचा राजा यकोन्याह व खास्द्यांच्या देशात बंदिवासात पाठविलेले सर्व बंदी यांनाही मी परत आणेन. बाबेलच्या राजाचे जोखड मी तोडून टाकेन,’ असे याहवेह जाहीर करतात.”


तहपनहेसमध्ये दिवसा काळोख होईल जेव्हा मी इजिप्तचे जू मोडून टाकीन; तेव्हा तिच्या अहंकाराच्या सामर्थ्याचा शेवट करेन. ती ढगांनी झाकली जाईल, आणि तिची गावे बंदिवासात जातील.


झाडे त्यांची फळे देतील आणि भूमी तिचे पीक उपजवेल; लोक त्यांच्या देशात सुरक्षित राहतील. जेव्हा मी त्यांच्या जोखडाची बंधने तोडेन आणि ज्यांनी त्यांना गुलाम करून घेतले, त्यांच्या हातून त्यांना सोडवेन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.


आता मी तुमच्या मानेवरील जू मोडून टाकीन आणि तुमच्या शृंखला तोडून टाकीन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan