Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 30:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत की जेव्हा मी इस्राएल आणि यहूदीयातील माझ्या लोकांना बंदिवासातून परत आणेन व त्यांच्या पूर्वजांना मी वतन म्हणून दिलेल्या भूमीवर पुनर्स्थापित करेन,’ असे याहवेह म्हणतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कारण परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की माझे लोक इस्राएल व यहूदा ह्यांचा बंदिवास मी उलटवीन; मी जो देश त्यांच्या पूर्वजांना दिला होता त्यात त्यांना परत आणीन व ते त्याचा ताबा घेतील, असे परमेश्वर म्हणतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण पाहा, परमेश्वराचे हे निवेदन आहे, असे दिवस येतील की, ज्यात मी आपल्या लोकांचे इस्राएल आणि यहूदा यांचे भविष्य प्रस्थापित करील. कारण मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशात त्यांना परत आणीन आणि ते त्याचा ताबा घेतील.” असे मी परमेश्वर म्हणत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 30:3
45 Iomraidhean Croise  

यहूदीयाला परतलेले सर्व इस्राएली लोक आपआपल्या शहरात स्थायिक झाल्यावर ते सातव्या महिन्यात यरुशलेममध्ये एकत्र आले.


पण वयस्कर याजक, लेवी, व इतर पुढारी यातील पुष्कळजण, ज्या लोकांनी पूर्वीचे मंदिर बघितले होते ते शलोमोनाने बांधलेल्या सुंदर मंदिराची आठवण काढून एकीकडे मोठ्याने रडू लागले, तर दुसरीकडे त्यांच्यापैकी काही मोठ्या आनंदाने जयघोष करू लागले.


इस्राएली लोक यरुशलेमला परमेश्वराच्या भवनात आल्यानंतर दुसर्‍या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, योसादाकाचा पुत्र येशूआ व त्यांच्याबरोबर त्यांचे याजकबंधू व लेवीबंधू या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली बंदिवासाहून परत आलेले सर्वजण कामास लागले. वीस वर्षे वा अधिक वयाच्या लेव्यांना याहवेहच्या मंदिराची देखरेख करण्यासाठी नेमण्यात आले.


हे याहवेह, नेगेव नदीसारखी, आमची समृद्धी परत आम्हाला मिळू द्या.


अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल! जेव्हा परमेश्वर त्यांच्या प्रजेची पुनर्स्थापना करतील, तेव्हा याकोब हर्ष करो आणि इस्राएल आनंद करो!


परंतु असे म्हटले जाईल, ‘जिवंत याहवेहची शपथ, ज्यांनी इस्राएलला उत्तर दिशेच्या भूमीतून व गुलामगिरीत पाठविलेल्या सर्व देशातून त्यांना बाहेर आणले.’ त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या या देशात मी त्यांना पुनर्वसित करेन.


याहवेह म्हणतात, “असे दिवस येत आहेत की, त्या समयी मी दावीदातून एक नीतिमान शाखा पुन्हा उगवेन, तो राजा सर्व देशात सुज्ञतेने, खरेपणाने आणि न्यायाने राज्य करेल.


परंतु बाबेलच्या राजाच्या गुलामीला शरण जाणार्‍या कोणत्याही राष्ट्राच्या लोकांना त्यांच्याच देशात राहण्याची मुभा असेल आणि त्यांना नेहमीप्रमाणे आपल्या शेतीची मशागत करता येईल, याहवेह असे म्हणतात.” ’ ”


‘होय, त्या आता बाबेलला नेण्यात येतील आणि मी त्यांची भेट घेईपर्यंत त्या तिथेच राहतील,’ याहवेह घोषित करतात. ‘नंतर पुढे मी हे सर्व यरुशलेमला परत आणेन व पुनर्स्थापित करेन.’ ”


याहवेह असे म्हणतात: “बाबेलमध्ये सत्तर वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी तुमची भेट घेईन आणि तुम्हाला दिलेल्या उत्तम अभिवचनानुसार पुन्हा तुम्हाला या ठिकाणी आणेन.”


याहवेह जाहीर करतात, “मी तुम्हाला आढळेन व तुमच्या दास्यातून तुम्हाला परत आणेन, तुम्हाला ज्या सर्व राष्ट्रातून व ठिकाणाहून इतर देशात बंदिवासात पाठविले, तर तुम्हाला त्याच ठिकाणी परत आणेन,” असे याहवेह जाहीर करतात.


त्या दिवसामध्ये यहूदीयाचे लोक इस्राएलच्या लोकांसोबत येतील, आणि ते लोक उत्तरेकडून एकत्र येईल. त्यांच्या पूर्वजांना मी कायमचे वतन म्हणून दिलेल्या देशात ते परत येतील.


“ ‘म्हणून भिऊ नको! याकोबा, माझ्या सेवका; हे इस्राएला, निराश होऊ नको,’ याहवेह असे जाहीर करतात. ‘मी तुला निश्चितच दूरच्या देशातून, व तुझ्या वंशजांना त्यांच्या बंदिवासातून वाचवेन. याकोबाला परत शांती व संरक्षण लाभेल आणि त्यांना कोणीही भयभीत करणार नाही.’


“परंतु याहवेह असे म्हणतात: “ ‘मी तुझी धनसंपत्ती तुला परत देईन, आणि याकोबाच्या निवासावर करुणा करेन; त्याच्या भग्नावशेषांवरही नगरी पुन्हा बांधली जाईल आणि राजवाडा पुन्हा त्याच्या ठराविक जागी उभारला जाईल.


इस्राएल व यहूदीया यांच्यासंबंधी याहवेह असे म्हणतात:


परंतु याहवेह असे म्हणतात: “तुझा रुदनस्वर आणि तुझ्या डोळ्यातील अश्रू आता आवर, कारण तुझ्या कार्यास फलप्राप्ती होणार आहे,” याहवेह असे जाहीर करतात “ते शत्रूच्या देशातून परत येतील.


सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “मी जेव्हा बंदिवासातून त्यांना परत आणेन, तेव्हा यहूदीयामधील व त्यांच्या नगरांमधील लोक असे म्हणतील: हे समृद्ध नगरी, ‘हे पवित्र डोंगरा, याहवेह तुला आशीर्वादित करो’


याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत जेव्हा लोकांच्या व गुरांच्या वंशजाचे मी इस्राएल व यहूदीयामध्ये रोपण करेन.


“असे दिवस येतील जेव्हा, इस्राएलच्या लोकांशी व यहूदीयाच्या लोकांशी मी एक नवीन करार करेन,” याहवेह म्हणतात.


याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत, कोपर्‍यातील हनानेलच्या बुरुजापासून कोपर्‍याच्या वेशीपर्यंत या नगरीची पुनर्बांधणी होईल.


परंतु माझ्या महाक्रोधाने व उग्र कोपाने मी त्यांना ज्या देशात हाकलून दिले, त्या सर्व देशातून मी माझ्या लोकांना एकत्र करेन; मी त्यांना याच ठिकाणी परत आणेन आणि ते सुरक्षितपणे वस्ती करतील.


बिन्यामीन प्रांतात, येथे यरुशलेममध्ये, तसेच यहूदीयाच्या शहरात, डोंगराळ प्रदेशातील नगरात, पश्चिमेच्या तळवटीच्या प्रदेशात व नेगेवमध्ये देखील चांदीची नाणी देऊन खरेदीखतांवर सह्या होतील, त्यावर शिक्का मारला जाईल, साक्षीदारांच्या सह्या होतील, कारण मी त्यांची पूर्वीची समृद्धी निश्चित परत देईन, असे याहवेह जाहीर करतात.”


तर मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या या वंशजांवर राज्य करण्यास याकोबाचे व माझा सेवक दावीदाचे वंशज नाकारले असते व दावीदाच्या पुत्राला निवडले नसते. पण मी त्यांची पूर्वीची समृद्धी त्यांना परत देईन व त्यांच्यावर दया करेन.’ ”


बाबेलवर जी भयंकर अरिष्टे येणार होती, ती यिर्मयाहने एका गुंडाळीवर लिहिली—बाबेलवर येणाऱ्या सर्व अरिष्टांची नोंद करून ठेवण्यात आली होती.


जेव्हा इस्राएल देश, जो देश मी माझा हात उंच करून तुम्हाला शपथ वाहून दिला होता त्यात मी तुम्हाला आणेन, तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.


राष्ट्रांतून मी त्यांना आणेन आणि देशांमधून त्यांना एकवट करेन आणि मी त्यांना स्वदेशात आणेन. इस्राएलच्या डोंगरांवर, ओहोळात व देशाच्या सर्व वस्त्यांमध्ये मी त्यांना चारीन.


“ ‘कारण मी तुम्हाला राष्ट्रांतून बाहेर काढेन; सर्व देशातून मी तुम्हाला एकवट करेन आणि तुम्हाला तुमच्या स्वदेशात आणेन.


त्यांच्यात तो देश तू समानतेने वाटावा. कारण मी हात उंच करून शपथ घेतली होती की, मी हा देश तुमच्या पूर्वजांना देईन, हा देश तुमचे वतन होईल.


“त्या दिवसात आणि त्या समयी जेव्हा मी यहूदाह व यरुशलेम भविष्य पुनर्संचयित करेन,


ती भूमी यहूदीयाच्या वंशातील अवशेषाचे वतन होईल; तिथे त्यांची कुरणे असतील. संध्याकाळी ते अष्कलोन येथील घरात विश्रांती घेतील. याहवेह, त्यांचे परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतील; त्यांचे पूर्वीचे वैभव त्यांना परत प्राप्त करून देतील.


त्यावेळी मी तुम्हा सर्वांना एकत्र गोळा करेन; त्यावेळी मी तुम्हाला घरी परत आणेन. जेव्हा मी तुमची संपन्नता तुम्हाला परत देईन तेव्हा पृथ्वीवरील सर्व लोकांमध्ये, स्वतःच्या दृष्टीसमोर मी तुम्हाला गौरव व प्रशंसा बहाल करेन,” असे याहवेह म्हणतात.


ते शिष्यांना म्हणाले, “अशी वेळ येत आहे की, मानवपुत्राच्या राज्याचा एक दिवस पाहावा अशी तुम्हाला उत्कंठा लागेल, परंतु तुम्हाला ते दिसणार नाही.


कारण अशी वेळ येत आहे की तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट बांधून तुला वेढतील आणि चहूबाजूंनी तुला कोंडीत धरतील.


“जे तुम्ही पाहत आहात, पण अशी वेळ येत आहे की, त्यावेळेस एकावर एक स्थापित असा एकही दगड राहणार नाही; त्यांच्यामधील प्रत्येक दगड खाली पाडला जाईल.”


तर याहवेह तुमचे परमेश्वर तुमची बंदिवासातून सुटका करतील आणि ते तुमच्यावर दया करतील आणि ज्या देशात त्यांनी तुम्हाला पांगवून टाकले असेल, त्या देशातून तुम्हाला एकत्र करतील.


याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या देशात परत आणतील आणि तुम्ही तो ताब्यात घ्याल. ते तुमचे कल्याण करतील आणि तुमच्या पूर्वजांपेक्षा तुम्हाला अधिक संपन्न आणि बहुगुणित करतील.


परंतु परमेश्वराला लोकांतील दोष दिसले आणि ते म्हणाले: “प्रभू जाहीर करून म्हणत आहेत, असे दिवस येतील जेव्हा, इस्राएलच्या लोकांशी व यहूदीयाच्या लोकांशी मी एक नवीन करार करेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan