Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 30:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 त्यांची मुलेबाळे पूर्ववत होतील, त्यांचे समाज माझ्यासमोर स्थापित होतील; त्यांचा छळ करणार्‍या सर्वांना मी शिक्षा करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 त्यांच्या मुलांची स्थिती पूर्ववत होईल, त्यांची मंडळी माझ्यासमोर स्थिर राहील, त्यांच्यावर जुलूम करणार्‍यांना मी शासन करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मग त्यांचे लोक पूर्वीच्या सारखे होतील आणि त्यांची मंडळी माझ्यासमोर प्रस्थापित होईल जेव्हा त्यांच्या सर्व लोकांना जे कोणी त्यांना आता पीडा देतील त्यांना मी शिक्षा करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 30:20
16 Iomraidhean Croise  

भावी पिढ्यांच्या हितासाठी हे सर्व नमूद करून ठेवले जावो, जे आजपर्यंत अस्तित्वात नाहीत, तेही याहवेहची स्तुती करतील:


तुमच्या सेवकांचे संतान तुमच्या उपस्थितीत टिकून राहतील; तुमच्या संरक्षणाखाली त्यांच्या वंशजांचे जतन होईल.”


तुम्हाला पिडणाऱ्यांना मी त्यांचेच मांस खाऊ घालेन; आणि त्यांच्याच रक्ताच्या नद्यांचे रक्त पिऊन ते मद्य पिल्यासारखे धुंद होतील. मग हे सर्व मानवजातीला समजेल कि मी, याहवेह, तुझा त्राता, तुझा उद्धारकर्ता व याकोबाचा सर्वसमर्थ परमेश्वर आहे.”


तुमचे सार्वभौम याहवेह, तुमचे परमेश्वर, जे त्यांच्या लोकांना सुरक्षित ठेवतात, ते असे म्हणतात: “पाहा, जो प्याला तुम्हाला धुंद करून अडखळवितो तो मी तुमच्या हातातून काढून घेतला आहे; त्या प्याल्यातून, माझ्या क्रोधाच्या प्याल्यातून तुम्ही यापुढे कधीही पिणार नाही.


तुम्ही नीतिमत्तेने प्रस्थापित व्हाल: जुलूमशाही तुमच्यापासून दूर राहील; तुम्हाला काहीही भयभीत करू शकणार नाही. दहशत तुमच्यापासून दूर करण्यात येईल; ती तुमच्याजवळ येणार नाही.


इस्राएल हे याहवेहकरिता पवित्र होते; त्यांच्या हंगामाचे प्रथमफळ होते. ज्यांनी त्यांचा नाश केला, त्यांच्यावर दोष लावण्यात आला आणि घोर आपत्तीने त्यांना गाठले,’ ” असे याहवेह जाहीर करतात.


“ ‘परंतु ज्यांनी तुला गिळंकृत केले, ते गिळंकृत केले जातील; तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील. ज्यांनी तुला लुटले, तेच लुटले जातील; ज्यांनी तुला लुबाडले, तेच लुबाडल्या जातील.


मी त्यांना एकनिष्ठ अंतःकरण व एकमात्र कार्य देईन, जेणेकरून ते नेहमी माझे भय धरतील आणि त्यांचे व त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाबाळांचे सर्वदा कल्याण होईल.


याहवेह, तुम्ही आमचा स्वतःशी पुनः संबंध स्थापित करा, म्हणजे आम्ही तुमच्याकडे परत येऊ; पूर्वीच्या दिवसांसारखे आमच्या दिवसांना नवनिर्मित करा,


“मी यहूदाहला बलवान करेन आणि योसेफाच्या वंशास वाचवेन. मी त्यांची पुनर्स्थापना करेन कारण मी त्यांच्यावर करुणा करतो. ते असे होतील, जणू काही मी त्यांचा त्याग कधी केलाच नव्हता, कारण मी त्यांचा याहवेह परमेश्वर आहे आणि मी त्यांचा धावा ऐकेन.


मी त्यांना संकेत देईन, आणि त्यांना एकत्र करेन. मी निश्चितच त्यांना सोडवेन; ते पुन्हा पूर्वीसारखेच असंख्य होतील.


आणि नगरातील रस्ते तिथे खेळणार्‍या मुलांनी व मुलींनी भरून जातील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan