Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 30:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 “ ‘परंतु ज्यांनी तुला गिळंकृत केले, ते गिळंकृत केले जातील; तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील. ज्यांनी तुला लुटले, तेच लुटले जातील; ज्यांनी तुला लुबाडले, तेच लुबाडल्या जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तुला ग्रासून टाकणार्‍या सर्वांना ग्रासून टाकण्यात येईल आणि तुझे सर्व वैरी बंदिवान होऊन जातील; तुझे हरण करणार्‍यांचे हरण होईल, तुला लुटणार्‍या सर्वांना मी लुटवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 म्हणून जे प्रत्येकजण तुला खाऊन टाकतील ते खाऊन टाकले जातील, आणि तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील. कारण ज्या कोणी तुला लुटले त्यांची लूट होईल आणि तुला लुटणाऱ्या सर्वांना मी लुटीस देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 30:16
44 Iomraidhean Croise  

सीयोनाचा द्वेष करणारे सर्व लाजिरवाणा पराजय होऊन परत जावोत.


जर तुम्ही काळजीपूर्वक त्याचे ऐकाल आणि मी जे सांगतो ते कराल, तर मी तुमच्या शत्रूंचा शत्रू होईन आणि जे तुमचा विरोध करतात, त्यांचा मी विरोधक होईन.


कारण याहवेह त्यांचा खटला लढतील आणि जीवनासाठी जीवन घेतील.


अनेक राष्ट्रे त्यांना सहकार्य करतील व त्यांना त्यांच्या जागी आणतील. आणि इस्राएल राष्ट्रांवर ताबा मिळवतील, व याहवेहच्या भूमीत त्यांच्या स्त्रिया व पुरुषांना आपले सेवक बनवतील, त्यांना बंदिवासात नेलेल्यांना ते बंदी करतील त्यांना पीडलेल्यांवर ते राज्य करतील.


हे विनाशका, तुझा धिक्कार असो, तू, ज्याचा नाश करण्यात आला नाही! हे विश्वासघातक्यांनो, तुमचा धिक्कार असो, तुम्ही, ज्यांचा विश्वासघात करण्यात आला नाही! जेव्हा तुम्ही नाश करणे थांबवाल, तेव्हा तुमचा नाश होईल; जेव्हा तुम्ही विश्वासघात करणे थांबवाल, तेव्हा तुमचा विश्वासघात केला जाईल.


जर कोणी तुमच्यावर हल्ला केला, तर ती माझी करणी नसेल; जे कोणी तुमच्यावर हल्ला करतील, ते तुम्हाला शरण जातील.


तुमच्याविरुद्ध घडविलेले कोणतेही शस्त्र कधीच सफल होणार नाही आणि तुमच्यावर आरोप करणारी प्रत्येक जीभ खोटी ठरविली जाईल. याहवेहच्या सेवकांचा हा वारसा आहे, हाच न्याय मी तुम्हाला दिला आहे,” अशी याहवेह घोषणा करतात.


या राष्ट्रांवर आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करा जे तुमचा अधिकार मान्य करीत नाहीत, जे लोक तुमच्या नावाचा धावा करीत नाहीत. त्यांनी याकोबाला गिळले आहे; त्याला संपूर्णपणे गिळंकृत केले आहे आणि त्यांच्या मातृभूमीचा नायनाट केला आहे.


म्हणून याहवेह असे म्हणतात: “माझ्या सर्व दुष्ट शेजाऱ्यांनी, मी माझ्या इस्राएली लोकांना जो देश वतन म्हणून दिला, तो बळकावला. त्यांना मी त्यांच्या भूमीतून उखडून टाकेन आणि मी यहूदीयाच्या लोकांना त्यांच्यामधून घालवून देईन.


इस्राएल हे याहवेहकरिता पवित्र होते; त्यांच्या हंगामाचे प्रथमफळ होते. ज्यांनी त्यांचा नाश केला, त्यांच्यावर दोष लावण्यात आला आणि घोर आपत्तीने त्यांना गाठले,’ ” असे याहवेह जाहीर करतात.


“गुलामगिरीची ही सत्तर वर्षे संपल्यानंतर, मी बाबेलचा राजा व त्याचे लोक यांना त्यांच्या अपराधांबद्दल शासन करेन; मी खाल्डियनांचा देश कायमचा ओसाड करेन,


तुझ्या जखमेबद्दल तू विलाप का करतोस, तुझ्या दुखण्यावर काहीही इलाज नाही का? कारण तुझा अपराध खूप मोठा व तुझी पातके अनेक आहेत म्हणून मी तुझ्याशी असा व्यवहार केला.


बाबेलमधील फरारी व निर्वासित लोक सीयोनात काय म्हणतात ते ऐका याहवेह, आमच्या परमेश्वराने कसा सूड घेतला, त्यांच्या मंदिराबद्दल सूड घेतला. हे याहवेह जाहीर करतात.


दान इथून शत्रूच्या घोड्यांचा फुरफुरण्याचा आवाज येतो; घोड्यांच्या मोठ्या किंकाळण्यांनी सर्व भूमीवर थरकाप उडाला आहे. ते भूमी आणि त्यात जे काही आहे, हे नगर आणि जे सर्व इथे राहतात, ते सर्वनाश करण्यासाठी आले आहेत.


“लोकांनी माझे कण्हणे ऐकले आहे, पण माझे सांत्वन करण्यास कोणीही नाही. माझ्या सर्व शत्रूंनी माझ्या संकटांबद्दल ऐकले आहे तुम्ही जे केले ते पाहून त्यांना आनंद झाला आहे; तुम्ही घोषणा केलेला दिवस येवो म्हणजे ते देखील माझ्यासारखेच होतील.


“त्यांची सर्व दुष्कृत्ये तुमच्यापुढे येवोत; माझ्या सर्व पापांमुळे तुम्ही माझ्याशी जसा व्यवहार केला तसाच त्यांच्याशीही करा. माझे उसासे खूप आहेत व माझे हृदय मूर्छित झाले आहे.”


तेव्हा इजिप्तमध्ये राहणारे जाणतील की मीच याहवेह आहे. “ ‘तू इस्राएल लोकांसाठी बोरूच्या काठीप्रमाणे होतास.


“ ‘कारण तुझ्याठायी तू निरंतर वैर ठेवले आणि संकटाच्या काळी, जेव्हा त्यांच्या शिक्षाकाळ कळसाला जाऊन पोहोचला, तेव्हा तू इस्राएली लोकांवर तलवार चालविली,


मी तुमचे पुत्र व तुमच्या कन्या यहूदीयातील लोकांना विकून टाकेन आणि ते त्यांना दूरच्या शबाई लोकांस विकतील.” याहवेहने हे म्हटले आहे.


पण आता पुष्कळ राष्ट्रे तुमच्याविरुद्ध एकत्र झाली आहेत. ते म्हणतात, “तिला अशुद्ध होऊ द्या, आपण सीयोनेवर दुष्ट नजर टाकून आनंद करू!”


मग माझे शत्रू हे पाहून ते लज्जेने झाकले जातील, ती जी मला म्हणत होती, “याहवेह तुझा परमेश्वर कुठे आहे?” माझे डोळे तिचे पतन पाहतील; रस्त्याच्या चिखलाप्रमाणे तीही पायाखाली तुडविली जाईल.


परंतु भयंकर महापुराने ते निनवेहचा अंत करतील; त्यांच्या शत्रूचा ते अंधकाराच्या साम्राज्यातही पाठलाग करतात.


तुम्ही गौरवाऐवजी लज्जेने भरून जाल. आता तुमची वेळ आहे, प्या व तुमची नग्नता उघडी होऊ द्या! याहवेहच्या उजव्या हातातील प्याला तुमच्याकडे येत आहे, आणि कलंक तुमचा गौरव झाकून टाकेल.


“मोआबी लोकांच्या अपमानास्पद गोष्टी आणि अम्मोनी लोकांचे टोमणे मी ऐकले आहेत, जे माझ्या लोकांचा उपहास करतात आणि त्यांच्या प्रदेशाविरुद्ध धमक्याही मी ऐकल्या आहेत.


मग माझ्याशी संवाद करीत असलेला याहवेहचा स्वर्गदूत म्हणाला, “या वचनाची घोषणा कर: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘मी यरुशलेम व सीयोनाबाबत अत्यंत ईर्ष्यावान आहे,


ज्या अन्य राष्ट्रांना सुरक्षित वाटते त्यांच्यावर मी फार क्रोधित झालो आहे, कारण आधी मी माझ्या लोकांवर थोडा नाराज होतो, पण त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार मिळालेली राष्ट्रे मर्यादेपलिकडे गेली.’


“मी यरुशलेमला प्याल्याप्रमाणे करेन, जो पिऊन सभोवतालची राष्ट्रे झोकांड्या खातील. यहूदीया तसेच इस्राएलच्या सभोवती वेढा घातल्या जाईल.


मी यरुशलेमविरुद्ध युद्ध करण्यास सर्व राष्ट्रांना एकत्र करेन; नगर हस्तगत केले जाईल आणि घरे लुटली जातील, स्त्रियांवर बलात्कार करण्यात येईल. नगरीतील अर्धे लोक बंदिवासात जातील, परंतु उरलेले लोक नगरीतच राहतील.


आणि यहूदीया ही पवित्र भूमी याहवेहचे वतन होईल, आणि ते पुन्हा यरुशलेमला निवडतील.


सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात, “गौरवशाली प्रभूने तुम्हाला लूटणाऱ्या राष्ट्राविरुद्ध मला पाठविले—जो कोणी तुम्हाला स्पर्श करतो, तो याहवेहच्या डोळ्यातील बुबुळाला स्पर्श करतो—


याहवेह तुमचे परमेश्वर हे सर्व शाप तुमच्या शत्रूंवर, म्हणजे जे तुमचा द्वेष करतात व तुमचा छळ करतात, त्यांच्यावर आणतील.


“जर कोणाला तुरुंगवास घडणार असेल, तर ते तुरुंगवासात जातील. जर एखाद्याला तलवारीने ठार मारणे आहे, तर तलवारीने ते मारले जातील.” परमेश्वराच्या लोकांनी धीराने सहन करण्याची व आपला दृढविश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे.


इस्राएली लोक पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत आले व त्यांची छावणी लुटली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan