Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 30:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तुझे सर्व मित्रगण तुला विसरले आहेत; त्यांना तुझी चिंता नाही; एखाद्या शत्रुगत मी तुला जखमी केले आहे निर्दयागत मी तुला शासन केले, कारण तुझा अपराध फार मोठा आहे तुझी पातके पुष्कळ झाली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तुझे सर्व वल्लभ तुला विसरले आहेत; ते तुला विचारत नाहीत; तुझ्या घोर दुष्कर्मामुळे तुझी पातके फार झाल्यामुळे तुला शत्रूप्रमाणे जखम करून, क्रूर जनांप्रमाणे शिक्षा करून, मी तुला घायाळ केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तुझे सर्व प्रियकर तुला विसरले आहेत. ते तुला शोधत नाहीत, कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे आणि अगणित पापांमुळे, मी तुला शत्रूप्रमाणे जखम करून आणि क्रूर धन्याप्रमाणे शिक्षा करून, मी तुला घायाळ केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 30:14
38 Iomraidhean Croise  

परमेश्वर माझ्यावर तुटून पडतात आणि आपल्या क्रोधाने मला फाडून टाकतात, आणि माझ्यावर दात खातात; माझे विरोधी माझ्यावर कडक नजर लावून आहेत.


त्यांचा क्रोध माझ्याविरुद्ध भडकला आहे; आपल्या शत्रूंमध्ये त्यांनी मला गणले आहे.


तुम्ही माझ्याविषयी निष्ठुर झाला आहात; आणि आपल्या हाताच्या बळाने माझ्यावर वार करता.


काही लोकांनी त्यांच्या बंडखोर वृत्तीमुळे मूर्खपणा केला, आणि त्यांनी केलेल्या पापामुळे ते पीडित झाले.


जेव्हा तू मदतीसाठी धावा करशील, तुझ्या संग्रहातील मूर्तींना तुझा बचाव करू दे! वारा त्या सर्वांना उडवून नेईल, श्वासाच्या एका फुंकराने त्या उडून जातील. परंतु जो कोणी माझा आधार घेतो तो या भूमीचा ताबा घेईल व माझ्या पवित्र पर्वताचा स्वामी होईल.”


“हे वचन तू त्यांना सांग: “ ‘रात्रंदिवस माझ्या नेत्रातून अश्रू वाहू दे मी माझे रडणे थांबविणार नाही; माझे लोक, कुमारी कन्या, तिच्यासाठी, कारण ती जखमांनी घायाळ होऊन तुडविली गेली आहे.


तुम्ही आपले मार्ग सोडून पथभ्रष्ट का होता? अश्शूरने तुमचा आशाभंग केला तसाच इजिप्तही करेल.


“लबानोनात जा व विलाप करा, बाशानात तुमचा आवाज ऐकू आला पाहिजे, अबारीमाहून आरोळी मारा, कारण तुमचे सर्व मित्र चिरडले गेले आहेत.


आता वार्‍याच्या झोतासरशी तुझे मेंढपाळ उडून जातील, तुमच्या सर्व मित्रांना बंदिवासात नेण्यात येईल. मग तुम्ही शरमिंदे व्हाल व तुमच्या सर्व दुष्टपणामुळे तुम्ही तुमची प्रतिष्ठा घालवाल.


तुझ्या जखमेबद्दल तू विलाप का करतोस, तुझ्या दुखण्यावर काहीही इलाज नाही का? कारण तुझा अपराध खूप मोठा व तुझी पातके अनेक आहेत म्हणून मी तुझ्याशी असा व्यवहार केला.


हल्ला करणारे बाबिलोनचे सैनिक आत शिरतील, आणि शहराला आग लावतील. माझा संताप चेतविण्यासाठी ज्या घरांच्या धाब्यावरून बआलमूर्तीस धूप जाळण्यात आला आणि दैवतांना पेयार्पणे वाहण्यात आली, ती सर्व घरे जाळून टाकण्यात येतील.


“त्यांच्या तारुण्यापासून इस्राएलने व यहूदीयाने माझ्या नजरेत दुष्कर्म करण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही; खरोखर, स्वतःच्या हस्तकृतींची उपासना करून माझा क्रोध भडकविण्याशिवाय त्यांनी दुसरे काहीही केले नाही, असे याहवेह जाहीर करतात.


माझे नाव धारण केलेल्या मंदिरात त्यांनी त्यांच्या अमंगळ मूर्तीची स्थापना केली व ते भ्रष्ट केले आहे.


बेन हिन्नोम खोर्‍यांमध्ये त्यांनी बआल दैवतासाठी उंच उंच वेद्या बांधल्या आहेत. तिथे त्यांनी त्यांचे पुत्र व कन्या मोलख मूर्तीस अर्पण केले, हे करण्याचे मी त्यांना कधीही आज्ञापिले नव्हते—असे माझ्या मनातही कधी आले नव्हते—की ते अशी घृणास्पद कृत्ये करतील व यहूदीयास पाप करण्यास लावतील.


तुमच्या यहूदीयाच्या राजाच्या राजवाड्यात उरलेल्या सर्व स्त्रियांना बाहेर आणून बाबिलोनच्या सरदारांच्या स्वाधीन केले जाईल, तेव्हा त्या स्त्रिया तुम्हाला म्हणतील: “ ‘त्यांनी तुला चुकीच्या मार्गावर नेले व तुझ्यावर मात केली— ते तुझे विश्वसनीय मित्र. तुझी पावले आता गाळात रुतली आहेत; त्यांनी टाकून दिले आहे.’


हे उद्ध्वस्त झालेल्या, तू काय करीत आहे? कशासाठी तू ही गडद वस्त्रे परिधान केली आहेस आणि अंगावर सोन्याचे दागिने चढविले आहेस? आपल्या डोळ्यांत काजळ घालून ते सजविले आहेस? या सर्व शृंगारांचा तुला काही एक उपयोग होणार नाही. तुझे प्रियकर तुझा तिरस्कार करतात; तुला ठार करण्याची त्यांची इच्छा आहे.


तुम्ही जी सर्व दुष्कृत्ये करीत होता, ती सहन करणे याहवेहला अशक्य झाले; म्हणून तुमची भूमी शापित झाली व ओसाड होऊन निर्मनुष्य झाली, जशी ती आजही आहे.


मी त्यांच्या पुढार्‍यांकडे जाईन व त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना निश्चितच याहवेहचे मार्ग ठाऊक आहेत. त्यांना त्यांच्या परमेश्वराची अपेक्षा काय आहे हे ठाऊक आहे.” पण त्या सर्वांनी एकमताने माझे जू झिडकारून टाकले आहे. आणि माझी बंधने तोडून टाकली आहेत.


म्हणून जंगलातील सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, वाळवंटातील लांडगा त्यांना फस्त करेल, त्यांच्या नगरांभोवती चित्ता दबा धरून बसेल, आणि बाहेर पडणार्‍या प्रत्येकाला तो फाडून टाकील; कारण त्यांची बंडखोरी फार मोठी आहे त्यांची घसरण फार मोठी आहे.


त्यांचे सैनिक धनुष्ये व भाल्यांसहित सज्ज आहेत. ते अत्यंत क्रूर व दयाहीन आहेत. ते घोड्यांवर स्वार झाले असता त्यांचा आवाज गर्जणाऱ्या समुद्राप्रमाणे आहे. हे बाबिलोन कन्ये तुझ्यावर हल्ला करण्यासाठी युद्धासाठी सुसज्जित असलेल्यांप्रमाणे ते येत आहेत.


त्यांचे सैनिक धनुष्य व भाल्यासहित सज्ज आहेत. ते अत्यंत क्रूर असून दया दाखवित नाही. ते घोड्यांवर स्वार झाले असता त्यांचा आवाज गर्जणाऱ्या समुद्राप्रमाणे आहे. हे सीयोनकन्ये तुझ्यावर हल्ला करण्यासाठी युद्धासाठी सुसज्जित असलेल्यांप्रमाणे ते येत आहेत.”


“मी माझ्या मित्रगणांना बोलाविले पण त्यांनी माझा विश्वासघात केला. माझे याजक आणि वडीलजन स्वतःस जिवंत ठेवण्यासाठी जेव्हा ते अन्नाचा शोध घेत होते तेव्हा ते नगरात नष्ट झाले.


रात्रभर ती अत्यंत रडत असते; तिच्या गालांवरून अश्रू ओघळत आहेत. तिच्या सर्व प्रियकरात तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; तिच्या सर्व मित्रांनी तिचा विश्वासघात केला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत.


प्रभूने सीयोनकन्येला आपल्या क्रोधरूपी मेघाने कसे आच्छादून टाकले आहे! त्यांनी इस्राएलचे वैभव स्वर्गातून पृथ्वीवर खाली धुळीत फेकले आहे; क्रोधाच्या दिवशी त्यांनी आपल्या पादासनाचेही स्मरण केले नाही.


“म्हणून, हे ओहोलीबाह, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या तुझ्या प्रियकरांपासून तू तिरस्काराने दूर झालीस त्यांना मी तुझ्याविरुद्ध भडकवीन, प्रत्येक बाजूंनी मी त्यांना तुझ्याविरुद्ध आणेन;


“म्हणून मी तिला तिचे अश्शूरी प्रियकर, ज्यांची अभिलाषा तिने बाळगली त्यांच्या हाती दिले.


सर्व इस्राएली लोकांनी तुमच्या नियमांचे आज्ञाभंग केले आहे आणि तुमची आज्ञा पाळण्यास आपली पाठ फिरविली आहे. “म्हणूनच परमेश्वराचा सेवक मोशे याच्या नियमशास्त्रात लिहून ठेवलेले शाप आणि शपथेवरचा दंड आमच्यावर ओतला गेला आहे, कारण आम्ही तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.


मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आमच्याविरुद्ध लिहून ठेवलेली सर्व संकटे आमच्यावर आली आहेत, तरीही आमच्या अपराधांपासून वळून आणि तुमच्या सत्याकडे लक्ष लावण्यास आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराला विनंती केली नाही.


परंतु आम्ही पाप आणि चूक केली आहे. आम्ही दुष्ट आणि बंडखोर आहोत; तुमच्या आज्ञांपासून आणि नियमांपासून आम्ही बहकलो आहोत.


कारण त्यांची आई अविश्वासू आहे आणि तिने लाजिरवाणी गोष्ट करून त्यांचे गर्भधारणा केली आहे. ती म्हणाली, ‘मी माझ्या प्रियकरांच्या मागे जाईन, जे मला माझे अन्न आणि माझे पाणी, माझी लोकर आणि माझे ताग, माझे जैतुनाचे तेल आणि माझे पेय देतात.’


कारण मी एफ्राईमला एखाद्या सिंहासारखा, व यहूदाहला मोठ्या सिंहासारखा होईन. मी त्यांना फाडून टाकीन आणि दूर निघून जाईन; मी त्यांना घेऊन जाईन आणि त्यांना सोडविणारा कोणीही नसेल.


तुझ्यासोबत करार केलेले सर्व मित्र राष्ट्रे तुला तुझ्या सीमेपर्यंत ढकलतील; तुझे मित्र तुला फसवतील आणि तुझा ताबा घेतील; जे तुझी भाकरी खातात, तेच तुझ्यासाठी सापळा रचतील, परंतु तुला ते कळणारही नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan