Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 3:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मी अविश्वासू इस्राएलला तिच्या घटस्फोटाचे प्रमाणपत्र दिले आणि तिच्या सर्व व्यभिचारामुळे तिला पाठवले. तरीही मी पाहिले की तिची अविश्वासू बहीण यहूदाहला मुळीच भय वाटले नाही. तीही बाहेर गेली व तिने व्यभिचार केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 आणि तिला जरी असे दिसून आले की मला सोडून जाणारी इस्राएल हिला जारकर्म केल्यामुळे मी टाकून सूटपत्र दिले, तरी तिची बेइमान बहीण यहूदा हिला बिलकूल भीती वाटली नाही; तीही जाऊन व्यभिचार करू लागली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 धर्मत्यागी इस्राएल! या सर्व कारणांमुळे तीने व्यभिचार का केला हे मला दिसून आले आहे. तिने व्यभिचार केला म्हणून मी तिला सूटपत्र दिले आहे. पण ह्यामुळे तिची विश्वासघातकी बहीण यहूदा भयभीत झाली नाही आणि तिनेसुद्धा बाहेर जाऊन व्यभिचारीणीप्रमाणे व्यवहार केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 3:8
20 Iomraidhean Croise  

त्याने यहूदीयाच्या टेकड्यांवर उच्च स्थानेही बांधली आणि यरुशलेमच्या लोकांना व्यभिचार करावयाला लावले होते आणि यहूदीयाला चुकीच्या मार्गाने नेले होते.


याहवेह असे म्हणतात: “मी तुमच्या आईला घटस्फोट दिला, जो दाखला देऊन मी तिला पाठविले, तो कुठे आहे? मी तुम्हाला माझ्या कोणत्या कर्जदारांना विकून टाकले? तुमच्या पापांमुळेच तुम्ही विकले गेले आहात; आणि तुमच्या अपराधांमुळे तुमच्या आईला पाठविण्यात आले.


तुमचा दुष्टपणाच तुम्हाला शिक्षा देईल; तुमचे माघार घेणे तुम्हाला दोषी ठरवेल. म्हणून विचार करा आणि तुमच्या लक्षात येईल याहवेह तुमच्या परमेश्वराचा त्याग करून दूर जाणे तुमच्यासाठी किती वाईट आणि कटू आहे, आणि माझे भय तुमच्यामध्ये नाही,” सर्वशक्तिमान याहवेह असे म्हणतात.


“जर एखाद्या पुरुषाने आपल्या स्त्रीला घटस्फोट दिला आणि त्या स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले, तर तिच्या पहिल्या पतीकडे तिच्याकडे परत जावे काय? असे करण्याने ही भूमी पूर्णपणे भ्रष्ट होणार नाही काय? परंतु तू एका वेश्येप्रमाणे अनेक प्रियकरांसह राहिलीस— तू माझ्याकडे आता परत येणार का?” असे याहवेह म्हणतात.


“लोक काय म्हणतात ते तुझ्या लक्षात आले आहे काय, ते म्हणतात, ‘याहवेहने निवडलेल्या यहूदीया व इस्राएल राज्यांचा त्याग केला’? म्हणून ते माझ्या लोकांची घृणा करतात आणि त्यांना एक राष्ट्र म्हणून ओळखत नाहीत.


“मी तुम्हाला का क्षमा करू? तुमच्या मुलांनी माझा त्याग केला आहे आणि जे देव नाहीत त्यांची ते शपथ घेऊ लागले आहेत. मी त्यांच्या सर्व गरजांचा पुरवठा केला, तरी त्यांनी व्यभिचार केला वेश्यागृहात गर्दी केली.


शोमरोन तुझी थोरली बहीण होती, जी आपल्या मुलींसह तुझ्या उत्तरेस राहत होती; आणि तुझ्या दक्षिणेस राहणारी तुझी धाकटी बहीण सदोम आहे.


तू त्यांच्या मार्गांचे केवळ अनुसरण करून त्यांची अमंगळ कृत्ये अंमलात आणली नाही, तर लवकरच तू त्यांच्याहीपेक्षा अति भ्रष्ट झालीस.


शोमरोनने तर तुझ्या तुलनेत अर्धीसुद्धा पातके केली नाहीत. तू त्यांच्यापेक्षा अधिक अमंगळ कृत्ये केली आहेत आणि तू अशी कृत्ये करून तुझ्या बहिणींना नीतिमान असे दाखविले आहे.


आणि ते तिच्याबरोबर झोपले. पुरुष जसे वेश्यांबरोबर झोपतात तसेच ते त्या अश्लील स्त्रिया, ओहोलाह व ओहोलीबाह यांच्याबरोबर झोपले.


“म्हणून मी तिला तिचे अश्शूरी प्रियकर, ज्यांची अभिलाषा तिने बाळगली त्यांच्या हाती दिले.


कारण दीर्घकाळापर्यंत इस्राएली लोक राजा अथवा राजपुत्र, यज्ञ अथवा पवित्र दगड, एफोद अथवा कुलदैवतांशिवाय राहतील.


कोणा पुरुषाने एखाद्या स्त्रीसोबत विवाह केला, परंतु नंतर तो तिच्यासोबत संतुष्ट होत नाही आणि त्याला तिच्यात काही दोष आढळला, तर त्याने सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला आपल्या घरातून घालवून द्यावे,


आणि तिच्या दुसर्‍या पतीलाही ती आवडली नाही व त्यानेही तिच्या हाती सूटपत्रे देऊन तिला घालवून दिले किंवा तो मरण पावला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan