Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 3:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 आम्ही लज्जास्पद अवस्थेत लोळू आमची विटंबना आम्हाला झाकून टाको. आम्ही आमच्या याहवेह परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे, आम्ही आणि आमच्या पूर्वजांनी; तारुण्यापासून आजपर्यंत आमच्या याहवेह परमेश्वराची आज्ञा आम्ही पाळली नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 आपण आपल्या लज्जेत लोळू या, आमची अप्रतिष्ठा आम्हांला झाको; कारण आम्ही व आमच्या पूर्वजांनी बाळपणापासून आजवर आमचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध पाप केले आहे आणि आमचा देव परमेश्वर ह्याच्या वाणीकडे लक्ष दिले नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 आम्ही आपल्या लज्जेत पडू. आमची लाज आम्हांला झाको, कारण आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरूद्ध पाप केले. आम्ही आणि आमच्या वडिलांनी, आपल्या तरुणपणापासून या दिवसापर्यंत परमेश्वरा आमचा देव याचा शब्द ऐकला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 3:25
38 Iomraidhean Croise  

आम्ही आमच्या पूर्वजांप्रमाणे पाप केले; आम्ही अपराध केला आणि दुष्टतेने वागलो.


जेव्हा ते इजिप्तमध्ये होते, तेव्हा तुम्ही केलेल्या अद्भुत चमत्कारांकडे त्यांनी लक्ष दिले नाही; तुम्ही केलेली अनेक दयाळूपणाची कृत्ये ते विसरले; उलट, तांबड्या समुद्राकाठी त्यांनी तुमच्याविरुद्ध बंड केले.


माझे विरोधक एखाद्या वस्त्राप्रमाणे अनादर धारण करोत, आणि लज्जेने ते स्वतःस पांघरूण घेवोत.


जो शिक्षण नाकारतो, त्याला दारिद्र्य आणि लज्जा प्राप्त होतात, पण जो अनुशासन स्वीकारतो, त्याला सन्मान लाभेल.


मी माझ्या शिक्षकांचे आज्ञापालन करत नसे किंवा मला मार्गदर्शन करणार्‍यांकडे मी कानाडोळा करीत असे.


तुम्ही त्या ऐकलेल्या नाहीत किंवा तुम्हाला उमगल्या नाहीत; पूर्वीपासूनच तुमचे कान उघडलेले नाहीत. कारण मला चांगले माहीत आहे कि तुम्ही किती विश्वासघातकी आहात; जन्मापासूनच तुम्ही बंडखोर म्हटले गेले.


परंतु आता, तुम्ही जे अग्नी प्रज्वलित करता आणि स्वतःला जळत्या मशालीचा पुरवठा करता, जा, तुम्ही स्वतः प्रज्वलित केलेल्या, आणि तुम्ही ज्वलंत केलेल्या मशालीच्या प्रकाशात चला, माझ्यापासून मात्र तुम्हाला हे प्राप्त होईल: तुम्ही यातनामध्ये पडून राहाल.


हे यहूदीया, जेवढी तुमची शहरे आहेत तेवढीच त्या दैवतांची संख्या; आणि तुमच्या या लाजिरवाण्या दैवतांच्या वेद्या, बआलापुढे धूप जाळण्याच्या वेद्या यरुशलेमच्या प्रत्येक रस्त्यावर आहेत.’


माझे लोक गहू पेरतील पण काट्यांची कापणी करतील; ते कष्ट करून स्वतःला झिजवतील, पण त्याचा काही फायदा होणार नाही. कारण याहवेहच्या भयंकर क्रोधामुळे ते लज्जेचे पीक गोळा करतील.”


हे याहवेह, आम्ही आमचा दुष्टपणा पदरी घेतो आणि आमच्या पूर्वजांचा अपराध स्वीकार करतो; आम्ही निश्चितच तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.


जरी आमची पापे आमच्याविरुद्ध साक्ष देतात, तरी हे याहवेह, तुमच्या नामाखातर तुम्ही काहीतरी करा. आम्ही तुमच्याविरुद्ध नेहमी बंडखोरी केली आहे; आम्ही तुमच्याविरुद्ध घोर पातक केले आहे!


ज्या याहवेहनी तुम्हाला योग्य मार्गाने चालविले त्या तुमच्या परमेश्वराचा त्याग करून, ही परिस्थिती तुम्ही स्वतःवर ओढवून घेतली नाही का?


तुमचा दुष्टपणाच तुम्हाला शिक्षा देईल; तुमचे माघार घेणे तुम्हाला दोषी ठरवेल. म्हणून विचार करा आणि तुमच्या लक्षात येईल याहवेह तुमच्या परमेश्वराचा त्याग करून दूर जाणे तुमच्यासाठी किती वाईट आणि कटू आहे, आणि माझे भय तुमच्यामध्ये नाही,” सर्वशक्तिमान याहवेह असे म्हणतात.


“जा आणि यरुशलेमच्या लोकांस याची घोषणा कर: “याहवेह असे म्हणतात: “ ‘मला आठवण आहे, मला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही एखाद्या नववधूप्रमाणे मजवर कशी प्रीती केली. आणि रानात व पेरणीरहित भूमीत देखील मला अनुसरला.


“चोराला पकडल्यावर जशी त्याला लाज वाटते, तसे इस्राएल शरमिंदा झाला आहे— ते, त्यांचे राजे व त्यांचे सरदार, त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे हे सर्वजण.


मी गर्भाशयातून बाहेरच का आलो, ही संकटे व दुःख बघण्यासाठी आणि अप्रतिष्ठा सोसत जीवनाचा शेवट करण्यासाठी?


तुम्हाला सुरक्षित वाटत होते, तेव्हाच मी तुम्हाला सावधगिरीचा इशारा दिला होता, परंतु तुम्ही उत्तर दिले, ‘मी ऐकणार नाही!’ लहानपणापासून तुम्ही असेच आहात; तुम्ही आज्ञापालन केलेच नाही!


केवळ तुम्ही आपली पापे स्वीकार करा— तुमचे याहवेह परमेश्वर यांच्याविरुद्ध तुम्ही बंड केले आहे, इतर परकीय दैवतांची तुम्ही उपासना केली प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली, माझे आज्ञापालन केले नाही,’ ” असे याहवेह म्हणतात.


मी भरकटल्यानंतर, मला पश्चात्ताप झाला; मला समज आल्यानंतर, मी दुःखातिशयाने ऊर बडवून घेतला. माझ्या तरुणपणाच्या दिवसात मी जे आचरण केले, त्यामुळे मी लज्जित व अपमानित झालो आहे.’


माझ्या लोकांनो, गोणपाट धारण करा, आणि राखेत लोळा; एकुलत्या एका पुत्रासाठी आक्रोश करतो तसा आक्रोश कर. कारण संहारक सेना एकाएकी तुझ्यावर हल्ला करेल.


याहवेह विचारतात, या त्यांच्या करणीने ते मला चिथावणी देतात का? नाही! यामुळे त्यांचेच मोठे नुकसान होत नाही का, त्यांचीच बेअब्रू होत नाही का?


आम्ही इथे का बसलो आहोत? एकत्र होऊ या! आपण तटबंदीच्या शहरात पलायन करू आणि तिथेच मरू! कारण आमच्या याहवेह परमेश्वराने आमचा नाश होण्यासाठी आम्हाला टाकून दिले आहे आणि त्यांनी आम्हाला विषारी पाणी पिण्यासाठी दिले आहे, कारण आम्ही त्यांच्याविरुद्ध पाप केले आहे.


त्यांना त्वरित येऊ द्या आणि आमच्यासाठी आक्रोश करतील व आमच्या डोळ्यातून अश्रू वाहतील आणि डोळ्याच्या पापण्या धारा काढतील.


आमच्या मस्तकावरील मुकुट धुळीत पडला आहे. धिक्कार असो आमचा, कारण आम्ही पाप केले आहे!


आमच्या पूर्वजांनी पाप केले व ते आता हयात नाहीत. आणि आम्ही त्यांची शिक्षा भोगत आहोत.


तो म्हणाला, “हे मानवपुत्रा, ज्या राष्ट्राने माझ्याविरुद्ध बंड केले, अशा बंडखोर इस्राएल राष्ट्राकडे मी तुला पाठवित आहे; ते व त्यांचे पूर्वज यांनी आजपर्यंत माझ्याशी फितुरी केली आहे.


माझी इच्छा आहे तुम्ही हे जाणावे की हे मी तुमच्यासाठी करीत नाही, सार्वभौम याहवेह जाहीर करतात की अहो इस्राएली लोकांनो तुम्ही आपल्या वर्तनामुळे लाजिरवाणी व कलंकित असावे!


त्यांनी याजक म्हणून माझी सेवा करण्यास जवळ येऊ नये किंवा माझ्या कोणत्याही पवित्र वस्तूंच्या किंवा परमपवित्र अर्पणांच्या जवळ येऊ नये; त्यांनी त्यांच्या अमंगळ कृत्यांची लाज भोगावी.


ते गोणपाट नेसतील आणि भयाचे वस्त्र घालतील. प्रत्येक चेहरा लज्जेने झाकला जाईल, आणि प्रत्येक डोक्याचे मुंडण केले जाईल.


पृथ्वीच्या धुळीत झोपलेले बरेच लोक जागे होतील: काहीजण सर्वकाळच्या जीवनासाठी तर काही निर्लज्जता व सर्वकाळच्या अपमानासाठी उठतील.


“जेव्हा मला इस्राएल आढळला, तेव्हा ते रानात द्राक्षे आढळल्यासारखे होते; जेव्हा मी तुमच्या पूर्वजांना पाहिले, ते अंजिराच्या झाडावर प्रथमफळ पाहण्यासारखे होते. पण जेव्हा ते बआल-पौराला आले तेव्हा त्यांनी त्या घृणास्पद मूर्तींपुढे स्वतःला समर्पित केले आणि त्यांच्या आवडत्या वस्तूप्रमाणे अमंगळ झाले.


“मी सर्व लोकांवर अशा विपत्ती आणेन, ते मार्ग शोधणार्‍या एखाद्या आंधळ्या माणसाप्रमाणे चाचपडतील, कारण त्यांनी याहवेहविरुद्ध पाप केले आहे. त्यांचे रक्त धुळीसारखे ओतले जाईल व त्यांच्या आतड्या शेणासारख्या विखुरतील.


ज्यासाठी तुम्हाला आता लाज वाटते त्या गोष्टींपासून त्यावेळी तुम्हाला काय लाभ मिळाला? त्या गोष्टींचा परिणाम तर मरण आहे.


आणि तुम्ही या देशातील लोकांशी कोणतेही करार करू नका, परंतु तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका.’ तरी तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही. तुम्ही हे का केले?


Lean sinn:

Sanasan


Sanasan