Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 3:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 हे त्या दिवसामध्ये होईल, जेव्हा तुम्ही देशात बहुगुणित व्हाल,” याहवेह अशी घोषणा करतात, “तेव्हा लोक असे म्हणणार नाहीत, ‘याहवेहच्या कराराचा कोश त्यांच्या मनात येणार नाही.’ ते कधीही त्यांच्या लक्षात येणार नाही, त्यांना आठवणसुद्धा राहणार नाही; ते त्याच्याविषयी पुन्हा विचार करणार नाहीत, दुसरा कोश पुन्हा निर्माण होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 परमेश्वर म्हणतो, तुम्ही वाढून देशात बहुगुणित व्हाल त्या काळी ‘परमेश्वराच्या कराराचा कोश’ असे ते ह्यापुढे म्हणणार नाहीत, तो त्यांच्या ध्यानीही येणार नाही, त्यांना तो आठवणारही नाही, ते त्याची खंत करणार नाहीत, आणि तो पुन्हा बनवणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 आणि त्या दिवसात असे होईल की, तुम्ही देशात बहूतपट असे व्हाल आणि फळ द्याल. परमेश्वर असे म्हणतो, त्या वेळेला, लोक पुन्हा कधीही असे म्हणणार नाहीत, परमेश्वराच्या कराराचा कोश, असे ते आणखी म्हणणार नाही. येथून पुढे ते त्या पवित्र कोशाचा विचारसुद्धा करणार नाहीत. ते कोणी बनवणार पण नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 3:16
24 Iomraidhean Croise  

तुमच्यातील सर्वात कनिष्ठ, हजारोंच्या संख्येत बहुगुणित होतील, सर्वात लहान एक बलाढ्य राष्ट्र होईल, मी याहवेह आहे; योग्य त्या समयी, मी हे सर्व वेगाने घडवेन.”


ते प्राचीन भग्नावशेषाची पुनर्बांधणी करतील फार पूर्वी उद्ध्वस्त झालेल्या शहरांची डागडुजी करतील; ते पुरातन पडीक नगरांचा, जी पिढ्यान् पिढ्या उद्ध्वस्त झाली होती, त्यांचा जीर्णोद्धार करतील.


“कारण पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी उत्पन्न करेन. पूर्वीच्या गोष्टींची आठवण केल्या जाणार नाही, मनात त्यांचे स्मरणदेखील होणार नाही.


त्यावेळी ते यरुशलेमला याहवेहचे सिंहासन असे म्हणतील, आणि याहवेहच्या नावाला आदर देण्यासाठी सर्व राष्ट्रे तिथे तिच्याकडे येतील. ते त्यांच्या हृदयाच्या हट्टीपणाने चालणार नाहीत.


तिथून उपकारस्तुतिगान गाईले जातील आणि आनंदगीतांचे ध्वनी येतील. मी त्यांची लोकसंख्या वाढवेन, पण त्यात घट होऊ देणार नाही; मी त्यांना प्रतिष्ठित करेन, पण ते तुच्छ मानले जाणार नाहीत.


याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत जेव्हा लोकांच्या व गुरांच्या वंशजाचे मी इस्राएल व यहूदीयामध्ये रोपण करेन.


पाहा, मी त्यांना उत्तरेकडील देशातून आणेन आणि पृथ्वीच्या दिगंतापासून गोळा करेन. त्यांच्यात आंधळे व पांगळे, गर्भवती स्त्रिया, प्रसूती वेदना लागलेल्या माता असतील; फार मोठा समुदाय परत येईल.


तुमची फसवणूक करणाऱ्या शब्दांवर विश्वास ठेऊन असे म्हणू नका, “हे याहवेहचे मंदिर आहे, हे याहवेहचे मंदिर आहे, हे याहवेहचे मंदिर आहे!”


ती संपूर्ण असता कोणत्याही कामास येत नाही तर, अग्नीत जळून भस्म झाल्यावर कोणती उपयोगी वस्तू बनवण्यास ती कामास येईल?


मी त्यांच्याशी शांतीचा करार करेन; तो सर्वकाळचा करार असेल. मी त्यांना स्थापित करेन आणि त्यांची संख्या बहुगुणित करेन, आणि मी माझे पवित्रस्थान सर्वकाळासाठी त्यांच्यात ठेवेन.


“तर पाहा, मी आज्ञा करेन आणि जसे चाळणीने धान्य चाळावे त्याप्रमाणे इस्राएलला इतर राष्ट्रांनी चाळावे, पण त्याचा एक खडाही भूमीवर पडणार नाही.


त्या दिवशी तू यरुशलेमा, माझ्याविरुद्ध जे काही दुष्कृत्य केलेस, त्याबद्दल तू लज्जित केली जाणार नाही, तेव्हा तू माझ्याविरुद्ध बंड करणारी अशी राहणारच नाहीस. कारण मी तुझ्यातील सर्व गर्वाने उन्मत्त झालेली माणसे काढून टाकेन. माझ्या पवित्र पर्वतावर पुन्हा कधीही गर्विष्ठपणा केला जाणार नाही.


योशीयाह यखन्या व त्यांच्या भावांचा पिता होता, हे बाबेलमध्ये हद्दपार केले तेव्हा झाले.


आमचा पिता तर अब्राहाम आहे असे आपल्या मनात म्हणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वर या दगडांपासून देखील अब्राहामासाठी संतती निर्माण करण्यास समर्थ आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan