Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 3:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 “विश्वासहीन लोकांनो, परत या,” याहवेह म्हणतात, “कारण मी तुमचा धनी आहे. मी तुमची निवड करेन—एका नगरातून एक आणि एका कुळातून दोन—आणि तुला सीयोनास आणेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 परमेश्वर म्हणतो, मुलांनो मागे फिरा; कारण मी लग्नाचा नवरा आहे; मी तुम्हांला ह्या शहरातून एक, त्या कुळांतून दोघे, असे घेऊन सीयोनेस आणीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 अविश्वासू लोकहो, परत या. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी तुमचा पती आहे. मी प्रत्येक नगरातील एक आणि प्रत्येक कुटुंबातील दोन माणसे असे मी घेईन, आणि तुम्हास सियोनला आणीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 3:14
31 Iomraidhean Croise  

राजाज्ञेनुसार, राजा आणि त्याच्या अधिकार्‍यांकडून पत्रे घेऊन संदेशवाहक संपूर्ण इस्राएल आणि यहूदीयामध्ये गेले, ज्यात लिहिले होते: “अहो, इस्राएलचे लोकहो, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहकडे परत या, म्हणजे, अश्शूरी राजांच्या हातातून जे निसटले आहेत त्यांच्याकडे ते परत येतील.


सर्वसमर्थ याहवेह यांनी जर आमच्यातील काहींना वाचविले नसते तर, आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोरासारखी आमची गत झाली असती.


हे, इस्राएला, तुझे लोक समुद्राच्या वाळूच्या कणासारखे असली तरी, उरलेलेच मात्र परत येतील. नाश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, परिपूर्ण आणि न्याययुक्त.


जसे जैतुनाच्या झाडाला झोडपतात तेव्हा उंचटोकाच्या फांद्यांवर दोन किंवा तीन जैतून, आणि फळ देणाऱ्या मोठ्या फांद्यांवर चार किंवा पाच जैतून राहून जातात, तसे जमा करण्याचे काही शिल्लक राहील,” असे इस्राएलचे परमेश्वर याहवेह घोषित करतात.


त्या दिवशी याहवेह वाहत्या फरात नदीपासून इजिप्तच्या खोऱ्यापर्यंत मळणी करतील आणि तुम्ही, इस्राएल एकएक करून गोळा केले जाल.


अहो तुम्ही इस्राएली लोकांनो, ज्यांच्याविरुद्ध तुम्ही फार मोठेपणाने बंड केले आहे त्याच्याकडे परत या.


मी तुझी पापे आकाशातील मेघांप्रमाणे, सकाळच्या धुक्याप्रमाणे विरून टाकली आहेत. माझ्याकडे परत ये, मी खंडणी भरून तुला मुक्त केले आहे.”


कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे— सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे— इस्राएलचे पवित्र परमेश्वर तुझे उद्धारकर्ता आहेत; त्यांना सर्व पृथ्वीचे परमेश्वर म्हणतात.


दुष्टांनी आपले दुष्टमार्ग सोडून द्यावे अनीतिमानांनी त्यांचे विचार मनातून काढावे. त्यांनी याहवेहकडे वळावे, म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील, आपल्या परमेश्वराकडे धाव घ्यावी, म्हणजे ते त्यांना मुक्तपणे क्षमा करतील.


मी त्यांच्या पापमय लोभामुळे संतापलो; आणि त्यांना ताडण केले व माझे मुख रागाने लपविले, तरी त्यांनी स्वेच्छेने करण्याचे सोडले नाही.


आणि भूमीवर एक दशांश जरी राहिला तरी, तो पुन्हा उद्ध्वस्त होईल. परंतु जसे एला आणि अल्लोन जेव्हा कापून टाकल्यावर बुंधा उरतो, त्याचप्रमाणे पवित्र बियाणे हे भूमीमध्ये बुंध्याप्रमाणे होईल.”


तुमचा दुष्टपणाच तुम्हाला शिक्षा देईल; तुमचे माघार घेणे तुम्हाला दोषी ठरवेल. म्हणून विचार करा आणि तुमच्या लक्षात येईल याहवेह तुमच्या परमेश्वराचा त्याग करून दूर जाणे तुमच्यासाठी किती वाईट आणि कटू आहे, आणि माझे भय तुमच्यामध्ये नाही,” सर्वशक्तिमान याहवेह असे म्हणतात.


“जा आणि यरुशलेमच्या लोकांस याची घोषणा कर: “याहवेह असे म्हणतात: “ ‘मला आठवण आहे, मला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही एखाद्या नववधूप्रमाणे मजवर कशी प्रीती केली. आणि रानात व पेरणीरहित भूमीत देखील मला अनुसरला.


“जिथे माझ्या कळपाला मी पाठविले आहे, तिथून मी माझ्या कळपाच्या अवशेषाला त्या सर्व देशातून एकत्र करून पुन्हा त्यांच्या मेंढवाड्यात आणेन आणि मग ती मेंढरे फलद्रूप होतील व त्यांची संख्यावाढ होईल.


याहवेह जाहीर करतात, “मी तुम्हाला आढळेन व तुमच्या दास्यातून तुम्हाला परत आणेन, तुम्हाला ज्या सर्व राष्ट्रातून व ठिकाणाहून इतर देशात बंदिवासात पाठविले, तर तुम्हाला त्याच ठिकाणी परत आणेन,” असे याहवेह जाहीर करतात.


“जर एखाद्या पुरुषाने आपल्या स्त्रीला घटस्फोट दिला आणि त्या स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले, तर तिच्या पहिल्या पतीकडे तिच्याकडे परत जावे काय? असे करण्याने ही भूमी पूर्णपणे भ्रष्ट होणार नाही काय? परंतु तू एका वेश्येप्रमाणे अनेक प्रियकरांसह राहिलीस— तू माझ्याकडे आता परत येणार का?” असे याहवेह म्हणतात.


उत्तर दिशाकडे जाऊन, संदेशाची घोषणा करा: “ ‘हे अविश्वासू इस्राएल परत ये, मी तुझ्यावर कायमचाच राग धरणार नाही, कारण मी विश्वासू आहे,’ याहवेह म्हणतात ‘मी नेहमीच क्रोध करणार नाही,


मी अविश्वासू इस्राएलला तिच्या घटस्फोटाचे प्रमाणपत्र दिले आणि तिच्या सर्व व्यभिचारामुळे तिला पाठवले. तरीही मी पाहिले की तिची अविश्वासू बहीण यहूदाहला मुळीच भय वाटले नाही. तीही बाहेर गेली व तिने व्यभिचार केला.


ते येतील आणि सीयोनाच्या टेकड्यांवर हर्षगीते गातील; याहवेहच्या विपुल पुरवठ्यासाठी— धान्य, नवा द्राक्षारस, आणि जैतुनाचे तेल, गुरातील व कळपातील पिल्लांसाठी आनंद करतील. भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे ते होतील आणि त्यांची सर्व दुःखे नाहीशी होतील.


“मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले, तेव्हा मी त्यांच्याशी केलेल्या कराराप्रमाणे हा करार नसेल. मी जरी त्यांचा पती होतो, तरी त्यांनी माझा करार मोडला.” असे याहवेह जाहीर करतात.


‘चला, उठा, आपण सीयोनकडे जाऊ, आपले परमेश्वर याहवेहकडे, जाऊ या.’ ” पहारेकरी एफ्राईमच्या टेकड्यांवरून अशी आरोळी मारण्याचा दिवस येत आहे,


ते आपला अपराध कबूल करेपर्यंत व साहाय्यासाठी माझे मुख पुन्हा शोधेपर्यंत मी आपल्या गुहेत परत जाईन— कारण संकट आल्याबरोबर, ते माझा शोध कळकळीने करतील.”


तुमच्या पूर्वजांसारखे तुम्ही होऊ नका, ज्यांना पूर्वीच्या संदेष्ट्यांनी घोषणा केली: ‘आपल्या दुष्ट मार्गापासून व दुष्ट प्रथांपासून मागे वळा.’ पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याच्याकडे लक्ष दिले नाही, याहवेह जाहीर करतात.


यशायाह इस्राएलाविषयी उच्च वाणीने म्हणतो: “इस्राएलाची संख्या समुद्राच्या वाळूच्या कणासारखी असली, तरी अवशिष्ट मात्र तारले जातील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan