Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 3:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 उत्तर दिशाकडे जाऊन, संदेशाची घोषणा करा: “ ‘हे अविश्वासू इस्राएल परत ये, मी तुझ्यावर कायमचाच राग धरणार नाही, कारण मी विश्वासू आहे,’ याहवेह म्हणतात ‘मी नेहमीच क्रोध करणार नाही,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 जा, उत्तरेकडे हे पुकारून सांग की, ‘हे मार्ग सोडून जाणार्‍या इस्राएले, मागे फीर, असे परमेश्वर म्हणतो; मी तुझ्याकडे रागाने पाहणार नाही, कारण मी कृपाळू आहे; मी सदा क्रोधयुक्त राहणार नाही; असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तू जाऊन ही वचने उत्तरेकडे घोषीत कर. परमेश्वर असे म्हणतो, हे विश्वासहीन इस्राएला, परत ये! परमेश्वर असे म्हणतो, मी तुमच्यावर नेहमीच संतापणार नाही, कारण मी विश्वासू आहे, मी सर्वकाळ क्रोध धरणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 3:12
45 Iomraidhean Croise  

तू योग्य ते केलेस तर तुझाही स्वीकार केला जाणार नाही काय? पण तू योग्य ते करण्याचे नाकारशील तर सावध राहा, तुझा सर्वनाश करावा म्हणून पाप तुझ्या दारावर हल्ला करण्यास टपून बसले आहे; पण त्यावर तू विजय मिळव.”


इस्राएलचा राजा पेकहा याच्या कारकिर्दीत अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याने इस्राएलवर स्वारी केली आणि इय्योन, आबेल-बेथ-माकाह, यानोहा, केदेश, हासोर, गिलआद, गालील व नफतालीचा सर्व भाग त्याने जिंकला आणि लोकांना कैद करून अश्शूरास नेले.


जोपर्यंत याहवेहने त्यांना आपल्या उपस्थितीतून घालवून दिले नाही. जी चेतावणी त्यांनी आपल्या सर्व सेवक संदेष्ट्यांद्वारे दिली होती. म्हणून इस्राएली लोकांना त्यांच्या देशातून बंदिवान म्हणून अश्शूरात नेण्यात आले व आजपर्यंत ते तिथेच आहे.


होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन ताब्यात घेतले आणि इस्राएली लोकांना बंदिवान करून अश्शूरला नेले आणि तिथे हलह आणि हाबोर नदीच्या काठावर वसलेल्या गोजान भागात तसेच मेदिया प्रदेशातील नगरांमध्ये वसविले.


इस्राएलचा राजा, एलाहचा पुत्र होशेच्या तिसर्‍या वर्षी, यहूदीयाचा राजा आहाजाचा पुत्र हिज्कीयाह राज्य करू लागला.


आता मी या उद्देशाने इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांच्याशी एक करार करतो की, जेणेकरून त्यांचा भयंकर क्रोध आपल्यापासून दूर होईल.


जर तुम्ही याहवेहकडे परत याल, तर तुमच्याबरोबर असणारे इस्राएली लोक आणि तुमच्या मुलाबाळांवर त्यांना कैद करणाऱ्यांकडून दया करण्यात येईल आणि ते या देशात परत येतील, कारण तुमचे परमेश्वर याहवेह हे कृपाळू आणि दयाळू आहेत. जर तुम्ही त्यांच्याकडे परत आलात तर ते तुमच्यापासून मुख फिरविणार नाहीत.”


परंतु याहवेहची प्रेममयदया त्यांचे भय धरणार्‍यांवर अनादि पासून अनंतकालापर्यंत तथा त्यांची नीतिमत्ता त्याच्या पुत्र पौत्रांना लाभते.


याहवेह कृपावान व करुणामय आहेत, ते मंदक्रोध व प्रीतीने विपुल आहेत.


ते सर्वदाच दोष देत राहणार नाहीत, व त्यांचा क्रोध सर्वकाळ टिकून ठेवत नाहीत.


याहवेह करुणामय व कृपावान आहेत, ते मंदक्रोध व प्रीतीने ओतप्रोत भरलेले आहेत.


हे याहवेह, किती काळ? तुम्ही आमच्यावर सदासर्वकाळ संतप्त राहाल काय? तुमचा क्रोधाग्नी केव्हापर्यंत पेटलेला राहणार आहे?


परंतु हे प्रभू, तुम्ही कृपाळू व दयाळू परमेश्वर आहात, मंदक्रोध, अति करुणामय आणि विश्वसनीयतेने संपन्न आहात.


हे प्रभू, तुम्ही क्षमाशील आणि चांगले आहात, तुमच्याकडे धाव घेणार्‍या सर्वांवर तुम्ही विपुल दया करता.


जो कोणी त्याचे पाप झाकून ठेवतो, तो समृद्ध होत नाही, परंतु जो अपराध कबूल करून ते करण्याचे सोडून देतो त्याला कृपा प्राप्त होते.


अहो तुम्ही इस्राएली लोकांनो, ज्यांच्याविरुद्ध तुम्ही फार मोठेपणाने बंड केले आहे त्याच्याकडे परत या.


मी तुझी पापे आकाशातील मेघांप्रमाणे, सकाळच्या धुक्याप्रमाणे विरून टाकली आहेत. माझ्याकडे परत ये, मी खंडणी भरून तुला मुक्त केले आहे.”


नंतर याहवेहने मला म्हटले, “यहूदीयाच्या प्रत्येक नगरात व यरुशलेमच्या रस्त्यातून जा व हा संदेश घोषित कर: ‘कराराच्या अटी ऐकून घ्या व त्यांचे पालन करा.


परंतु त्यांना घालवून दिल्यानंतर मी पुन्हा सर्वांवर करुणा करेन आणि तुमच्यातील प्रत्येक मनुष्याला परत तुमच्या वतनात, तुमच्या देशात आणेन.


‘ज्या जिवंत याहवेहने इस्राएली लोकांच्या वंशजांना उत्तरेकडील भूमीतून आणि ज्या वेगवेगळ्या देशात पांगविले होते, त्या देशातून परत आणले आहे. त्या जिवंत परमेश्वराची शपथ’ असे म्हणतील. मग ते स्वतःच्या भूमीवर वस्ती करतील.”


“जर एखाद्या पुरुषाने आपल्या स्त्रीला घटस्फोट दिला आणि त्या स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले, तर तिच्या पहिल्या पतीकडे तिच्याकडे परत जावे काय? असे करण्याने ही भूमी पूर्णपणे भ्रष्ट होणार नाही काय? परंतु तू एका वेश्येप्रमाणे अनेक प्रियकरांसह राहिलीस— तू माझ्याकडे आता परत येणार का?” असे याहवेह म्हणतात.


“विश्वासहीन लोकांनो, परत या,” याहवेह म्हणतात, “कारण मी तुमचा धनी आहे. मी तुमची निवड करेन—एका नगरातून एक आणि एका कुळातून दोन—आणि तुला सीयोनास आणेन.


त्या दिवसामध्ये यहूदीयाचे लोक इस्राएलच्या लोकांसोबत येतील, आणि ते लोक उत्तरेकडून एकत्र येईल. त्यांच्या पूर्वजांना मी कायमचे वतन म्हणून दिलेल्या देशात ते परत येतील.


“विश्वासहीन लोकांनो परत या; मी तुमच्यामागे घसरणीस बरे करेन.” “होय, आम्ही तुमच्याकडे येऊ, कारण तुम्हीच आमचे परमेश्वर याहवेह आहात.


तू नेहमीसाठी रागावला आहेस का? हा क्रोध नेहमीसाठी राहील काय?’ याप्रकारे तू बोलतेस, परंतु तू करता येईल ते सर्वप्रकारचे कुकर्म करतेस.”


मला वाटले हे सर्वकाही झाल्यानंतर ती माझ्याकडे परत येईल, परंतु ती माझ्याकडे परत आलीच नाही आणि हा बंडखोरपणा तिच्या विश्वासघातकी बहिणीने, यहूदीया हिने पाहिला.


कारण याहवेह जाहीर करतात, ‘मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझी मुक्तता करेन. जरी ज्या राष्ट्रात मी तुझी पांगापांग केली, त्या राष्ट्रांचा मी समूळ नायनाट केला, तरी मी तुझा पूर्णपणे नायनाट करणार नाही. मी तुला योग्य शासन करेन, पण ते मर्यादित; तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.’


हा एफ्राईम माझा लाडका पुत्र नाही का, जे माझे लेकरू, मला अत्यंत सुखदायक? जरी मी बरेचदा त्याच्याविरुद्ध बोललो, तरी मला आताही त्याची आठवण येते. म्हणून माझ्या मनाला त्याची ओढ लागली आहे; मला त्याची अत्यंत दया येते.” असे याहवेह जाहीर करतात.


“जाताना वाटेवर खुणा कर; दिशादर्शक लाव. तू गेलीस तो महामार्ग ध्यानात ठेव, त्या मार्गावर लक्ष ठेव. हे इस्राएली कुमारी, परत ये, तू आपल्या नगरांमध्ये परत ये.


पाहा, मी त्यांना उत्तरेकडील देशातून आणेन आणि पृथ्वीच्या दिगंतापासून गोळा करेन. त्यांच्यात आंधळे व पांगळे, गर्भवती स्त्रिया, प्रसूती वेदना लागलेल्या माता असतील; फार मोठा समुदाय परत येईल.


तर मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या या वंशजांवर राज्य करण्यास याकोबाचे व माझा सेवक दावीदाचे वंशज नाकारले असते व दावीदाच्या पुत्राला निवडले नसते. पण मी त्यांची पूर्वीची समृद्धी त्यांना परत देईन व त्यांच्यावर दया करेन.’ ”


याहवेह म्हणतात, “हे इस्राएला, जर तू परत फिरशील,” “मग माझ्याकडे परत ये.” “जर तू आपल्या अमंगळ मूर्ती पूर्णपणे माझ्या दृष्टीसमोरून दूर करशील आणि तू कधीही पथभ्रष्ट होणार नाही,


याहवेहच्या महान प्रीतीमुळे आम्ही पूर्णपणे भस्म झालेलो नाही कारण त्यांच्या कृपेचा कधीही ऱ्हास होत नाही.


“म्हणून असे म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी तुम्हाला राष्ट्रातून गोळा करेन आणि ज्या देशात तुम्ही पांगले आहात तिथून तुम्हाला परत आणेन आणि इस्राएल देश मी तुम्हाला परत देईन.’


त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जीविताची शपथ, दुष्टाच्या मरणात मला संतोष नाही, परंतु त्यांनी आपल्या मार्गापासून वळावे व जगावे. वळा! आपल्या दुष्ट मार्गापासून वळा! मग अहो इस्राएली लोकहो तुम्ही का मरावे?’


“म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी याकोबाची संपत्ती परत करेन आणि इस्राएलच्या सर्व लोकांवर दया करेन आणि माझ्या पवित्र नावासाठी ईर्षा बाळगेन.


“चला, आपण याहवेहकडे परत जाऊ. त्यांनी आम्हाला फाडले आहे, व तेच आम्हाला बरे करतील; त्यांनी आम्हाला जखम केली आहे, व आता तेच पट्टी बांधतील.


“ ‘परंतु जर ते आपल्या पापांची व आपल्या वाडवडिलांच्या पापांची—त्यांच्या अविश्वासूपणाची आणि माझ्याविरुद्ध चालण्याची कबुली देतील,


तुमच्या पूर्वजांसारखे तुम्ही होऊ नका, ज्यांना पूर्वीच्या संदेष्ट्यांनी घोषणा केली: ‘आपल्या दुष्ट मार्गापासून व दुष्ट प्रथांपासून मागे वळा.’ पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याच्याकडे लक्ष दिले नाही, याहवेह जाहीर करतात.


आणि त्यावेळी जर तुम्ही व तुमची मुले याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत याल आणि संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने आज मी तुम्हाला देत आहे त्या त्यांच्या आज्ञा पाळाल,


Lean sinn:

Sanasan


Sanasan