Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 3:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 हे सगळे घडून सुद्धा तिची अविश्वासू बहीण, यहूदीया, तिच्या संपूर्ण हृदयाने माझ्याकडे परतली नाही, परंतु तिच्यात खोटेपणाच दिसला,” असे याहवेह म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 इतके असूनही तिची बेइमान बहीण यहूदा मनापासून माझ्याकडे वळली नाही, तर कपटाने वळली, असे परमेश्वर म्हणतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 इस्राएलची विश्वासघातकी बहीण (यहूदा) मनापासून माझ्याकडे परत आली नाही, तर येण्याचे तिने फक्त ढोंग केले. असे परमेश्वर म्हणतो

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 3:10
13 Iomraidhean Croise  

योशीयाहने इस्राएली लोकांच्या सर्व प्रदेशामधून सर्व घृणास्पद मूर्ती काढून टाकल्या आणि इस्राएलमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना त्यांचे परमेश्वर याहवेहची सेवा करावयास लावले. जोपर्यंत तो जिवंत होता, तोपर्यंत त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांचे अनुसरण करण्यास ते चुकले नाहीत.


परदेशीय माझ्यासमोर भीतीने वाकतात; माझे नाव ऐकताच ते माझी आज्ञा पाळतात.


परमेश्वराला म्हणा, “तुमची कृत्ये किती अद्भुत आहेत! तुमच्या सामर्थ्यामुळे तुमचे शत्रू तुम्हाला दबकतात.


मी त्याला अधार्मिक राष्ट्राविरुद्ध पाठवितो, मला जे संताप आणतात, अशा लोकांविरुद्ध पाठवितो, त्यांची लूटमार करण्यासाठी आणि लूट हिसकावून घेण्यासाठी, आणि त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडविण्यासाठी.


प्रभू असे म्हणतात: “हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात, पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत. माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.


अहो तुम्ही इस्राएली लोकांनो, ज्यांच्याविरुद्ध तुम्ही फार मोठेपणाने बंड केले आहे त्याच्याकडे परत या.


ते त्यांच्या पूर्वजांच्या पापाकडे परतले आहेत, ज्यांनी माझे वचन पाळणे नाकारले होते. त्यांनी इतर दैवतांचे अनुसरण करून सेवा केली. त्यामुळे यहूदीया व इस्राएलाच्या पूर्वजांशी मी केलेला करार मोडला आहे.


तुम्हीच त्यांचे रोपण केले आणि ते मुळावले; ते वाढतात व फलवंत होतात. तुमचे नाव सतत त्यांच्या मुखात असते परंतु त्यांच्या अंतःकरणापासून तुम्ही फार दूर असता.


हाय, हाय! माझे मस्तक पाण्याचे एक स्त्रोत आणि माझे डोळे एक अश्रूंचा झरा असता! तर मी रात्रंदिवस सारखे अश्रू ढाळीत माझ्या घात केलेल्या लोकांकरिता विलाप केला असता.


ते मला त्यांच्या हृदयापासून हाक मारत नाहीत, परंतु त्यांच्या बिछान्यांवर विलाप करतात. ते धान्य आणि नवीन द्राक्षारसासाठी त्यांच्या दैवतांकडे भीक मागून स्वतःला जखमा करतात, पण ते माझ्यापासून दूर राहतात.


“मी तुमच्या शेतांवर व द्राक्षमळ्यांवर तांबेरा आणि भेरड हे रोग पाठविले; टोळांनी तुमची अंजिराची व जैतुनाची झाडे खाऊन टाकली, आणि तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,” असे याहवेह जाहीर करतात.


यहूदाहने विश्वासघात केला. इस्राएल आणि यरुशलेम येथे अत्यंत घृणास्पद कार्य केले आहे: यहूदीयाच्या पुरुषांनी याहवेहचे प्रिय मंदिर परकीय मूर्तिपूजक स्त्रियांशी विवाह करून भ्रष्ट केले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan