Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 29:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर कोलायाहचा पुत्र अहाब व मासेयाहचा पुत्र सिद्कीयाह या तुमच्या खोट्या संदेष्ट्याविषयी असे म्हणतात: “त्यांचा तुमच्यासमोर जाहीरपणे वध व्हावा म्हणून मी त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हवाली करणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 ‘कोलायाचा पुत्र अहाब आणि मासेयाचा पुत्र सिद्कीया हे माझ्या नामाने तुम्हांला खोटा संदेश देतात त्यांच्याविषयी सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी त्यांना बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती देईन; व तो त्यांना तुमच्या डोळ्यांदेखत वधील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 कोलायाचा मुलगा अहाब व मासेयाचा मुलगा सिद्कीया, ते माझ्या नावाने खोटे भविष्य सांगतात, यांच्याविषयी इस्राएलाचा देव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी त्यांना बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराच्या हाती देईन. आणि तो त्यास तुमच्या डोळ्यांसमोर ठार करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 29:21
8 Iomraidhean Croise  

याहवेह असे म्हणतात: मी तुला स्वतःकरिता व तुझ्या मित्राकरिता दहशत असे करेन; ते सर्व शत्रूंच्या तलवारींनी बळी पडलेले तू आपल्या नजरेने पाहशील. मी संपूर्ण यहूदीया प्रांत बाबेलच्या राजाच्या स्वाधीन करेन, तो या लोकांना गुलाम करून बाबेलला नेईल किंवा त्यांना ठार मारेल.


आणि हे पशहूरा, तू स्वतः व तुझ्यासह तुझ्या घरात राहणारे सर्वजण बाबेलमध्ये बंदिवासात जाल. तू तिथेच मरशील व पुरला जाशील, तू व ज्यांच्याकडे तू खोटी भविष्यवाणी केलीस त्या तुझ्या सर्व मित्रगणाची गतही तशीच होईल.”


आणि यरुशलेममधील संदेष्ट्यात मी काही भयानक गोष्टी बघितल्या: ते व्यभिचार करतात आणि लबाडीत जीवन जगतात. ते दुष्कर्म्याचे बाहू मजबूत करतात, जेणेकरून दुष्टतेपासून कोणीही परावृत्त होत नाही. ते सर्व मला सदोमातील लोकांसारखे वाटतात; यरुशलेम येथील लोक गमोरातील लोकांसारखे वाटतात.”


तुम्ही म्हणाल, “याहवेहने बाबेलमध्ये आपल्यासाठी संदेष्टे उभे केले आहेत,”


तुझ्या संदेष्ट्यांनी सांगितलेले दृष्टान्त खोटे व व्यर्थ होते; तुला बंदिवासात पडण्यापासून वाचविण्याकरिता तुझी पापे उघडकीस आणली नाहीत. त्यांनी तुला दिलेले संदेश खोटे व दिशाभूल करणारे होते.


परंतु लोकांमध्ये सुद्धा खोटे संदेष्टे होते, तसेच तुमच्यामध्ये खोटे शिक्षक असतील, ते गुप्त रीतीने विध्वंसक पाखंडी मते प्रचारात आणतील, ज्याने त्यांना विकत घेतले अशा सार्वभौम प्रभूला नाकारतात आणि स्वतःवर आकस्मिक नाश ओढवून घेतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan