Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 28:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 आणि यहोयाकीमचा पुत्र, यहूदीयाचा राजा यकोन्याह व खास्द्यांच्या देशात बंदिवासात पाठविलेले सर्व बंदी यांनाही मी परत आणेन. बाबेलच्या राजाचे जोखड मी तोडून टाकेन,’ असे याहवेह जाहीर करतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 यहूदाचा राजा यकन्या बिन यहोयाकीम व बाबेलास पकडून नेलेले यहूदाचे सर्व लोक ह्यांना मी ह्या ठिकाणी परत आणीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण मी बाबेलच्या राजाचे जू मोडून टाकीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकन्या व बाबेलास कैद करून नेलेले यहूदाचे जे सर्व लोक यांस मी परत या ठिकाणी आणीन असे परमेश्वर म्हणतो, कारण मी बाबेलाच्या राजाचे जोखड मोडीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 28:4
20 Iomraidhean Croise  

तलवारीच्या जोरावर तू जगशील तू आपल्या भावाची सेवा करशील, परंतु जेव्हा अस्वस्थ होशील, तेव्हा तुझ्यावर असलेले त्याचे जू तू तुझ्यावरून झुगारून देशील.”


यरुशलेम येथील लोक त्याने बंदिवासात नेले: सर्व अधिकारी आणि लढाऊ पुरुष आणि सर्व कुशल कामगार आणि कारागीर—एकूण दहा हजार. देशात फक्त सर्वात गरीब लोक उरले.


कारण जसे मिद्यानाच्या पराभवाच्या दिवसामध्ये, तुम्ही त्यांच्यावर ओझे असलेले जोखड, त्यांच्या खांद्यांवरील लोखंडाची सळई, त्यांच्यावर जुलूम करणाऱ्याची काठी मोडून टाकली आहे.


यहूदीयाच्या दक्षिणेकडील नेगेवप्रांतातील नगरवेशी बंद होतील, आणि त्या उघडण्यास तिथे कोणीही नसेल. संपूर्ण यहूदीयाला बंदिवासात नेण्यात येईल पूर्णपणे नेण्यात येईल.


“फार फार पूर्वी तुम्ही माझे जू झुगारून दिले व मी बांधलेले दावे तोडून टाकले; तुम्ही म्हटले, ‘आम्ही तुमची सेवा करणार नाही!’ अर्थात्, प्रत्येक उंच टेकडीवर, आणि प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली तुम्ही वेश्येप्रमाणे निजलात.


मेलेल्यां राजासाठी रडू नका किंवा त्यांच्या हानीकरिता शोक करू नका; त्याऐवजी, जो बंदिवासात गेला आहे त्याच्यासाठी विलाप करा, कारण तो मायदेशी परत येणार नाही किंवा मातृभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही.


“मी माझ्या जिवाची शपथ घेऊन सांगतो,” असे म्हणून याहवेह जाहीर करतात, यहूदीयाचा राजा यहोयाकीम याचा पुत्र कोन्याह, तू माझ्या उजव्या हातातील मुद्रिकेसारखा असलास, तरीही मी तुला ओढून काढेन,


बाबिलोनचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीम याचा पुत्र, यकोन्याह, याच्याबरोबरच यहूदीयाचे अधिपती, निष्णात सुतार व लोहार असे कारागीर यांना यरुशलेमहून बाबिलोन येथे बंदिवासात नेले. या घटनेनंतर याहवेहने यरुशलेम येथील मंदिरासमोर अंजीर भरून ठेवलेल्या दोन टोपल्या मला दाखविल्या.


“याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘हे उत्तम अंजीर यहूदीयातून बंदिवासात पाठवलेल्यांचे प्रतीक आहे, ज्यांना मी या ठिकाणातून खास्द्यांच्या देशामध्ये रवाना केले आहे.


“ ‘ “जर, कोणतेही राष्ट्र किंवा राज्य बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची सेवा करणार नाही किंवा त्याचा जू आपल्या मानेवर ठेवणार नाही, मी त्या राष्ट्राला तलवार, दुष्काळ आणि मरीने शिक्षा करेन, असे याहवेह घोषित करतात, जोपर्यंत मी त्याच्या हाताने त्यांचा नाश करत नाही.


यावर संदेष्टा हनन्याह याने यिर्मयाहच्या मानेवरील जू घेतले व ते मोडले;


“सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर जाहीर करतात: ‘तुमच्या मानेवरील बाबेलच्या राजाचे जू मी काढून टाकेन.


नबुखद्नेस्सरने यरुशलेमहून बाबेलला बंदिवासात नेलेल्या लोकांपैकी अवशेष वडीलजनांना, याजकांना, संदेष्ट्यांना व इतर सर्व लोकांना यिर्मयाहने लिहिलेल्या पत्राचा हा मजकूर आहे.


(राजा यकोन्याह, राजमाता, न्यायालयातील अधिकारी, यहूदाहचे व यरुशलेमचे अधिकारी व कारागीर अशा सर्वांना यरुशलेमहून बाबेलला बंदिवासात नेण्यात आले होते.)


“कारण सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, ‘त्या दिवशी,’ मी त्यांच्या मानेवरचे जू मोडून टाकेन, त्यांच्या बेड्या तोडेन, आणि यापुढे परकीय लोक त्यांना गुलाम करणार नाहीत;


इजिप्तच्या लोकांचे तुम्ही गुलाम राहू नये म्हणून ज्याने तुम्हाला इजिप्त देशामधून बाहेर आणले; तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. मी तुमच्या बेड्या तोडून टाकल्या आणि तुम्ही ताठ मानेने चालाल असे मी केले आहे.


आता मी तुमच्या मानेवरील जू मोडून टाकीन आणि तुमच्या शृंखला तोडून टाकीन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan