Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 27:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्यांच्या अधिकार्‍यांसाठी एक संदेश दे आणि सांग, ‘इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, असे म्हणतात: “तुमच्या धन्यांना सांगा की:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 आणि त्यांना त्यांच्या धन्यांकडे असा निरोप देऊन पाठव की, ‘सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तुम्ही आपल्या धन्यांना हे सांगा,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्यांच्या मालकाला सांगण्यासाठी त्यांना आज्ञा कर आणि सांग, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, तुम्ही आपल्या मालकास असे सांगा की.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 27:4
8 Iomraidhean Croise  

नंतर मोशे व अहरोन फारोहकडे जाऊन त्याला म्हणाले, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘माझ्या लोकांना जाऊ दे, यासाठी की रानात जाऊन त्यांनी माझा उत्सव साजरा करावा.’ ”


परंतु याहवेह हेच खरे परमेश्वर आहेत; ते जिवंत परमेश्वर आहेत, ते सनातन राजा आहेत. जेव्हा ते क्रोधित होतात, सर्व पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या प्रकोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.


परंतु जो याकोबाचा वाटा आहे, तो यासारखा नाही. कारण तेच सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, इस्राएलसहित, ते लोक त्यांचे वारस आहेत; सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे.


“त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: माझ्या क्रोधाने भरलेल्या या प्याल्यातून तुम्ही प्या, धुंद होईपर्यंत प्या, आणि मग ओकारी करा, व पुन्हा कधीही न उठण्याकरिता पडा, कारण मी तुमच्यावर तलवार पाठवित आहे.’


मग एदोम, मोआब, अम्मोन, सोर व सीदोन यांच्या राजांना, यरुशलेममध्ये यहूदीयाचा राजा सिद्कीयाहकडे आलेल्या दूतांसह हा संदेश पाठव,


माझ्या महान शक्तीने व उगारलेल्या भुजेने मी पृथ्वी, सर्व मानवजात, व प्राणिमात्रेस निर्माण केले आणि या सर्वगोष्टी मी माझ्या इच्छेस येईल त्याला देतो.


सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: या सर्व राष्ट्रांच्या मानेवर मी लोखंडी जोखड ठेवले आहे, त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची गुलामगिरी करण्यास लावेन, व ते करतील. मी वनपशूही त्याच्या ताब्यात देईन.’ ”


परंतु जो याकोबाचा वाटा आहे, तो यासारखा नाही. कारण तेच सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, ते लोक त्यांचे वारस आहेत; सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan