Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 27:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मग एदोम, मोआब, अम्मोन, सोर व सीदोन यांच्या राजांना, यरुशलेममध्ये यहूदीयाचा राजा सिद्कीयाहकडे आलेल्या दूतांसह हा संदेश पाठव,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 आणि ती यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याकडे यरुशलेमास जे जासूद आले आहेत त्यांच्या हस्ते अदोमाचा राजा, मवाबाचा राजा, अम्मोन्यांचा राजा, सोराचा राजा आणि सीदोनाचा राजा ह्यांच्याकडे पाठव;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मग यरूशलेमेला, यहूदाचा राजा सिद्कीया याच्याकडे जे दूत येतात त्यांच्या हातून अदोमाच्या राजाकडे व मवाबाच्या राजाकडे, अम्मोन लोकांच्या राज्याकडे, सोराच्या राजाकडे, सीदोनाच्या राजाकडे ती पाठव.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 27:3
12 Iomraidhean Croise  

ज्याने त्याला परमेश्वराच्या नावाने शपथ घ्यायला लावली होती, त्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरविरुद्धही त्याने बंड केले. तो ताठ मानेचा झाला आणि त्याने त्याचे हृदय कठोर केले आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्याकडे तो वळला नाही.


सीदोन आणि समुद्रातील किल्ल्यांनो, लज्जित व्हा, कारण समुद्र म्हणाला: “मला कधीही बाळंतपणाच्या वेदना झाल्या नाहीत आणि मी कधीही प्रसवलो नाही; मी कधीही मुलांचे संगोपन केले नाही किंवा मुलींचा सांभाळ केला नाही.”


हा संदेश मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह यास सांगितला. मी म्हणालो, “बाबेलच्या राजाचे जू आपल्या मानेवर ठेव; त्याची व त्याच्या लोकांची सेवा कर, म्हणजे तुम्ही जगाल.


त्यांच्या अधिकार्‍यांसाठी एक संदेश दे आणि सांग, ‘इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, असे म्हणतात: “तुमच्या धन्यांना सांगा की:


त्याच वर्षी, म्हणजे यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या कारकिर्दीच्या प्रारंभी म्हणजे चौथ्या वर्षातील पाचव्या महिन्यात, गिबोन येथील अज्जूरचा पुत्र हनन्याह नावाचा जो संदेष्टा होता, तो याजक व सर्व लोकांच्या समक्ष मला उद्देशून याहवेहच्या भवनात जाहीरपणे म्हणाला:


“मानवपुत्रा, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने त्याच्या सैन्याला कठोरतेने सोरविरुद्ध पाठवले; प्रत्येक डोके टकले झाले आणि प्रत्येक खांदा सोलून काढला. तरीही त्याने हे जे कठीण कष्टाचे अभियान सोरविरुद्ध चालविले त्याबद्दल त्याला व त्याच्या सैन्याला काहीही प्रतिफळ मिळाले नाही.


याहवेह असे म्हणतात: “सोरच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण बंदिवासातील सर्वांना एदोमास विकले आणि बंधुत्वाच्या कराराची अवहेलना केली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan