Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 27:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीमचा पुत्र यकोन्याह, याच्यासह यहूदीया व यरुशलेम येथील सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना बाबिलोन येथे कैद करून नेले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदाचा राजा यहोयाकीमाचा पुत्र यकन्या ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांतील सर्व सरदारांसह पकडून यरुशलेमेतून बाबेलास नेले तेव्हा त्याने पात्रे नेली नव्हती;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 म्हणजे बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकन्या याला, यहूदाचे व यरूशलेमेचे सरदार यांना कैद करून बाबेलास नेले, तेव्हा त्या वस्तू नेल्या नव्हत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 27:20
14 Iomraidhean Croise  

यहूदीयाचा राजा यहोयाखीन, त्याची आई, त्याचे सेवक, त्याच्या राजघराण्यातील सेवक आणि त्याचे अधिकारी हे सर्व त्याला शरण गेले. बाबेलचा राजाच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी, त्याने यहोयाखीनला कैदी बनविले.


वसंतऋतूमध्ये राजा नबुखद्नेस्सरने त्याला बोलाविणे पाठवले आणि त्याला बाबेलमध्ये आणले, त्याचबरोबर याहवेहच्या मंदिरातील मौल्यवान वस्तू आणल्या आणि त्याने यहोयाखीनचा काका सिद्कीयाहला यहूदीया आणि यरुशलेमवर राजा केले.


ज्याने परमेश्वराच्या मंदिरातील मोठ्या आणि लहान सर्व मौल्यवान वस्तू आणि याहवेहच्या मंदिरातील खजिने आणि राजा आणि त्याचे अधिकारी, यांचे खजिने बाबेलला नेले.


तिच्या उच्चकुलीन लोकांना त्या ठिकाणी राज्य असे काहीही राहणार नाही, तिचे सर्व राजपुत्र नाहीसे होतील.


हा मनुष्य, कोन्याह, फुटक्या भांड्यासारखा कोणालाही नको असलेली वस्तू नाही का? तो व त्याच्या मुलांना त्यांना माहीत नसलेल्या देशात बंदिवान करून भिरकावून का टाकले गेले.


बाबिलोनचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीम याचा पुत्र, यकोन्याह, याच्याबरोबरच यहूदीयाचे अधिपती, निष्णात सुतार व लोहार असे कारागीर यांना यरुशलेमहून बाबिलोन येथे बंदिवासात नेले. या घटनेनंतर याहवेहने यरुशलेम येथील मंदिरासमोर अंजीर भरून ठेवलेल्या दोन टोपल्या मला दाखविल्या.


मंदिरातील उरलेली पात्रे व यहूदीया आणि यरुशलेमच्या राजांच्या महालातील उरलेल्या मौल्यवान वस्तू याविषयी सर्वसमर्थ याहवेह इस्राएलाचे परमेश्वर असे म्हणतात:


(राजा यकोन्याह, राजमाता, न्यायालयातील अधिकारी, यहूदाहचे व यरुशलेमचे अधिकारी व कारागीर अशा सर्वांना यरुशलेमहून बाबेलला बंदिवासात नेण्यात आले होते.)


योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम, हा यहूदीयाचा राजा असताना, यिर्मयाहला याहवेहकडून आलेले वचन हेच आहे:


आणि प्रभूने यहूदीयाच्या राजा यहोयाकीमला परमेश्वराच्या मंदिरातील काही पात्रांसोबत त्याच्या हाती दिले. ती शिनार प्रांतातील त्याच्या दैवताच्या मंदिरासाठी नेली आणि त्याच्या दैवताच्या खजिन्यात नेऊन ठेवली.


योशीयाह यखन्या व त्यांच्या भावांचा पिता होता, हे बाबेलमध्ये हद्दपार केले तेव्हा झाले.


बाबेलमध्ये हद्दपार झाल्यावर: यखन्या शल्तीएलचा पिता, शल्तीएल जरूब्बाबेलाचे पिता,


अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलच्या बंदिवासापर्यंत चौदा पिढ्या, बंदिवासापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan