Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 26:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 कारण कदाचित ते ऐकतील आणि आपल्या कुमार्गापासून मागे वळतील; मग त्यांच्या कुकर्माबद्दल मी त्यांना करणार होतो तो विनाश आवरून धरेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 न जाणो ते कदाचित ऐकतील व त्यांतला प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून फिरेल, म्हणजे मग त्याच्या कृतीच्या दुष्टतेमुळे त्यांच्यावर जे अनिष्ट आणण्याचे मी योजले आहे त्याविषयी मला अनुताप होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कदाचित् ते ऐकतील आणि प्रत्येक जण त्याच्या कुमार्गापासून वळेल, त्यांच्या कर्मांच्या दुष्टपणाबद्दल त्यांना शिक्षा करण्याच्या माझ्या बेतांबद्दल मीही कदाचित् पुनर्विचार करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 26:3
15 Iomraidhean Croise  

अहाबाने जेव्हा हे शब्द ऐकले, त्याने आपली वस्त्रे फाडली व गोणपाट नेसून उपास केला. तो गोणपाटात राहून दीनपणे जगू लागला.


“अहाब माझ्यासमोर कसा नम्र झाला आहे हे तुला दिसते का? कारण त्याने स्वतःला नम्र केले आहे, म्हणून हे अरिष्ट मी तो जिवंत असताना आणणार नाही, परंतु ते मी त्याच्या घराण्यावर त्याच्या पुत्राच्या काळात आणेन.”


आता तुम्ही तुमचे मार्ग, तुमची कर्मे बदला व याहवेह तुमचे परमेश्वर यांच्या आज्ञा पाळा. मग ते त्यांचे मन बदलतील व तुमच्याविरुद्ध जाहीर केलेली सर्व संकटे रद्द करतील.


“परंतु यहूदीयाचा हिज्कीयाह राजा व इतर कोणी या संदेशाबद्दल मिखायाहला ठार केले का? हिज्कीयाहला याहवेहचे भय नव्हते काय व त्याने त्यांच्या कृपेची याचना केली नाही का? मग याहवेहनी ठरविलेली विपत्ती त्यांच्यावर आणण्याचा आपला विचार बदलला नाही का? आपण यिर्मयाहला ठार करून स्वतःवर घोर संकट आणणारच होतो!”


जी भयानक संकटे मी यहूदीयाच्या लोकांवर आणणार आहे, ती त्यांनी चर्मपत्रावर लिहिलेली प्रत्यक्ष पाहिली, तर कदाचित ते त्यांच्या दुष्टकर्मापासून मागे वळतील; मग मी त्यांच्या दुष्कर्माची व पापांची क्षमा करेन.”


कदाचित ते याहवेहकडे क्षमेची याचना करतील व आपल्या दुष्ट मार्गापासून वळतील, कारण या लोकांविरुद्ध याहवेहने उच्चारलेले संताप व प्रकोप अत्यंत घोर आहेत.”


“म्हणून, हे मानवपुत्रा, निर्वासित होऊन जाण्यास तू आपले सामान बांध आणि दिवसाच्या प्रकाशात ते तुला पाहत असताच तू जिथे आहेस तिथून नीघ आणि दुसर्‍या ठिकाणाकडे जा. जरी ते बंडखोर लोक आहेत, तरी कदाचित ते समजतील.


“पण जर एखादा दुष्ट मनुष्य त्याने केलेल्या सर्व पापांपासून मागे फिरला आणि माझ्या सर्व विधींचे पालन केले आणि जे न्याय्य व योग्य ते केले, तो व्यक्ती खचित जगेल; तो मरणार नाही.


मी माझ्या तीव्र रागाप्रमाणे वागणार नाही, मी एफ्राईमचा पुन्हा नाश करणार नाही. कारण मी तुमच्यामध्ये एक पवित्र परमेश्वर आहे. मनुष्य नाही. मी त्यांच्या शहरांविरुद्ध येणार नाही.


कोण जाणो? याहवेह तुमचे परमेश्वर वळतील व अनुताप करतील आणि तुमच्यासाठी एक आशीर्वाद सोडतील— मग याहवेह तुमच्या परमेश्वराला तुम्ही धान्यार्पण व पेयार्पण करू शकाल.


त्याने याहवेहकडे प्रार्थना केली, “हे याहवेह, जेव्हा मी आपल्या देशात होतो, तेव्हा मी हे म्हटले नाही काय? म्हणून मी तार्शीशला पळून जाण्याचा प्रयत्न केला. मला माहीत होते की तुम्ही कृपाळू आणि दयाळू परमेश्वर आहात, मंदक्रोध आणि विपुल प्रीती करणारे आहात, विपत्ती आणल्याबद्दल अनुताप करणारे परमेश्वर आहात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan