Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 26:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 याहवेह असे म्हणतात, “यहूदीया प्रांताच्या विविध नगरातून लोक उपासना करावयास आले आहेत, तेव्हा तू याहवेहच्या मंदिरासमोर उभा राहा आणि यहूदीया नगरातील सर्व लोकांना जे याहवेहच्या मंदिरात उपासना करण्यास आले त्यांच्याशी बोल. मी तुला सांगितलेले सर्व त्यांना सांग; त्यातील एकही शब्द कमी करू नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “परमेश्वर म्हणतो : परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहा, व यहूदाच्या सर्व नगरांतून जे परमेश्वराच्या मंदिरात भजनपूजन करण्यास येतात त्यांना जे शब्द बोलण्याची मी तुला आज्ञा केली आहे ते सर्व त्यांना सांग, एकही शब्द गाळू नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, परमेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात उभा राहा आणि परमेश्वराच्या मंदिरात उपासना करण्यास येणाऱ्यांना हा सर्व यहूदातील नगरांना तुला त्यांच्याजवळ बोलायला आज्ञापितो ती बोल, एक शब्द कमी करु नको.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 26:2
32 Iomraidhean Croise  

“तू स्वतःला तयार कर! उठून जा आणि मी तुला सांगतो ते सर्व त्यांना सांग. त्यांना घाबरू नकोस, नाहीतर त्यांच्यासमोर मी तुला भयभीत करेन.


परंतु याहवेह मला म्हणाले, “ ‘मी कोवळा तरुण आहे,’ असे म्हणू नकोस. मी तुला जिथे पाठवेन, तिथे तुला जावे लागेल आणि मी जे तुला सांगेन, ते तुला बोलावे लागेल.


नंतर यिर्मयाह तोफेत येथे हा संदेश देऊन परतला, जिथे याहवेहने यिर्मयाहला भविष्यवाणी करण्यासाठी पाठविले होते, तिथे तो मंदिरापुढे थांबला व सर्व लोकांना उद्देशून म्हणाला,


ज्या खोट्या संदेष्ट्यांना स्वप्ने पडतात, त्यांना ती स्वप्ने सांगू दे, परंतु ज्याला माझे वचन प्राप्त झाले आहे, त्याने ते विश्वासूपणे सांगावे. कोंड्याचा गव्हाशी काय संबंध आहे?” असे याहवेह जाहीर करतात.


मग यिर्मयाह संदेष्ट्याने यहूदीयाच्या सर्व लोकांना व यरुशलेमच्या रहिवाशांना म्हणाला:


यावर याहवेहच्या मंदिरात उभे असलेले सर्व लोक आणि याजकांच्या समक्ष यिर्मयाह संदेष्टा हनन्याहला म्हणाला,


शाफानचा पुत्र गमर्‍याह चिटणीस, याच्या याहवेहच्या मंदिरात वरच्या सभागृहाच्या बाजूस नव्या द्वारातील प्रवेशमार्गाजवळील कचेरीमध्ये नेरीयाहचा पुत्र बारूख यिर्मयाहची वचने लिहिलेले हे चर्मपत्र वाचण्यासाठी गेला.


यिर्मयाह संदेष्ट्याने उत्तर दिले, “मी तुमचे ऐकले आहे, मी निश्चितच याहवेह, तुमचे परमेश्वर यांच्याकडे तुमच्या विनवणीप्रमाणे प्रार्थना करतो; आणि ते काय म्हणतात ते तुम्हाला मी सांगतो, मी तुमच्यापासून काही लपविणार नाही.”


“याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभा राहा आणि तिथे हा संदेश जाहीर कर: “ ‘यहूदीयातील सर्व लोक जे या प्रवेशद्वारातून याहवेहची उपासना करण्यासाठी आत येतात ते लोकहो, याहवेहचे हे वचन ऐका.


“जेव्हा हे सर्व तू त्यांना सांगशील, ते तुझे ऐकणार नाहीत; तू त्यांना हाक मारशील, पण ते त्यांना प्रतिसाद देणार नाहीत.


आणि तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, मी तुझ्याशी जी वचने बोलतो ती काळजीपूर्वक ऐक आणि आपल्या हृदयात जपून ठेव.


“मानवपुत्रा, मी तुला इस्राएली लोकांचा पहारेकरी केले आहे; तर जे वचन मी सांगतो ते ऐक आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर.


तो मनुष्य मला म्हणाला, “मानवपुत्रा, काळजीपूर्वक पाहा आणि जवळ येऊन ऐक आणि जे काही मी तुला दाखविणार आहे त्याकडे लक्ष दे, त्यासाठीच तुला येथे आणले गेले आहे. तू जे काही बघतो ते इस्राएली लोकांना सांग.”


आणि मी तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांना सर्वकाही पाळावयास शिकवा आणि मी सदैव, युगाच्या अंतापर्यंत तुमच्याबरोबर आहे.”


त्यानंतर येशू मंदिराच्या आवारात दररोज शिक्षण देऊ लागले. परंतु प्रमुख याजकवर्ग आणि इतर नियमशास्त्र शिक्षक व वडीलजन त्यांना ठार मारण्याचा बेत करीत होते.


येशूने त्याला उत्तर दिले, “मी जगापुढे उघडपणे बोलतो, कारण मी सभागृहांमध्ये व मंदिरात जिथे सर्व यहूदी एकत्रित येतात तिथे नियमितपणे शिक्षण दिले आहे. मी गुप्तपणे काहीही बोललो नाही.


अगदी पहाटेच येशू पुन्हा मंदिराच्या अंगणात आले, त्यांच्याभोवती सर्व लोक जमले आणि ते बसून त्यांना शिकवू लागले.


जे तुमच्यासाठी हितकारक आहे, त्याचा प्रचार करण्यास उशीर अथवा कुरकुर केली नाही, परंतु लोकांमध्ये उघडपणे आणि घरोघरी जाऊन शिक्षण दिले.


कारण परमेश्वराचे संपूर्ण मनोरथ सांगण्यास मी कधीही मागेपुढे पाहिले नाही.


इतक्यात कोणीतरी येऊन सांगितले, “पाहा! ज्यांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ती माणसे मंदिराच्या आवारात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत.”


आणि प्रत्येक दिवशी मंदिराच्या आवारात व घरोघरी जाऊन “येशू हेच ख्रिस्त आहेत” याबद्दलचे शिक्षण देण्याचे व शुभवार्तेची घोषणा करण्याचे त्यांनी थांबविले नाही.


मी देत असलेल्या सर्व आज्ञांचे तुम्ही पालन करावे; त्यात काहीही भर घालू नये किंवा त्यातून काही कमी करू नये.


उलट, तुमच्या सर्व गोत्रांच्या जागेतून याहवेह तुमचे परमेश्वर निवडील व त्या जागेला ते स्वतःचे नाव देतील, त्या ठिकाणी तुम्ही जावे;


याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे त्यांचे तुम्ही फक्त पालन करा, त्यात काही भर घालू नका आणि काही कमी करू नका.


यहोशुआने संपूर्ण इस्राएली मंडळी, स्त्रिया आणि मुलेबाळे आणि जे परदेशीय त्यांच्यामध्ये राहत होते यांना, मोशेने दिलेल्या सर्व आज्ञातील वाचून दाखविण्यात आल्या, एकही शब्द न वाचता सोडला नाही.


तसेच जो कोणी या भविष्यकथनच्या पुस्तकात वर्णन केलेल्या वचनांतून काही काढून टाकील, परमेश्वर त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून काढून टाकील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan