यिर्मया 26:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परंतु एक गोष्ट नक्की, तुम्ही मला ठार केले, तर एका निरपराध मनुष्याला ठार केल्याचा ठपका तुमच्यावर, या नगरावर व येथील प्रत्येक रहिवाशावर येईल; कारण तुम्ही ऐकलेला प्रत्येक शब्द तुम्हाला सांगण्यासाठी याहवेहने मला पाठविले, हे अगदी सत्य आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 एवढे मात्र पक्के समजा की, तुम्ही मला जिवे माराल तर तुम्ही आपणांवर, ह्या नगरावर व ह्यातील रहिवाशांवर निर्दोष रक्त पाडल्याचा दोष आणाल; कारण वास्तविक ही सर्व वचने तुमच्या कानी पडावीत म्हणून परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 पण तुम्ही मला ठार मारलेत, तर एका गोष्टीची खात्री बाळगा. निरपराध मनुष्यास मारल्याबद्दल तुम्ही अपराधी ठराल. तुम्ही या नगरीला आणि तिच्यात राहणाऱ्या प्रत्येक मनुष्यासही अपराधी बनवाल. परमेश्वराने खरोखरच मला तुमच्याकडे ह्यासाठी पाठवले आहे की ही सर्व वचने तुमच्या कानात बोलावी.” Faic an caibideil |