Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 26:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जेव्हा यहूदीयाच्या अधिकार्‍यांनी हे ऐकले, तेव्हा ते राजवाड्यातून निघून मंदिराच्या दरवाजापाशी आले व याहवेहच्या मंदिराच्या देवडीत बसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 हे ऐकल्यावर यहूदाचे सरदार राजगृहातून परमेश्वराच्या मंदिरात आले व परमेश्वराच्या मंदिराच्या नवीन द्वाराच्या देवडीत बसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 यहूदातील राज्यकर्त्यांना ही सर्व हकिकत कळली, म्हणून ते राज्याचा घरातून बाहेर आले व वरती परमेश्वराच्या मंदिरात गेले. तेथे ते परमेश्वराच्या मंदिरात नव्या प्रवेशद्वाराजवळ स्थानांवर बसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 26:10
15 Iomraidhean Croise  

तथापि उच्च स्थाने काढली गेली नव्हती; लोकांनी त्यांची अर्पणे व धूप जाळणे सुरूच ठेवले. योथामाने याहवेहच्या मंदिराचा वरील दरवाजा पुन्हा बांधला.


योथामाने याहवेहच्या मंदिराचा वरील दरवाजा पुन्हा बांधला आणि ओफेलच्या डोंगरावरील भिंतीवर बरेच काम केले.


पशहूराने यिर्मयाह संदेष्ट्याला पकडून फटके मारविले आणि याहवेहच्या मंदिराजवळच्या बिन्यामीन दरवाजाजवळ खोड्यात अडकवून ठेवले.


परंतु यहोयाकीम राजा, सेनाधिकारी व इतर अधिकारी वर्ग यांनी त्याचे शब्द ऐकले. तेव्हा राजाने त्याला मारण्याचे ठरविले. ही बातमी उरीयाहाला कळताच तो घाबरून इजिप्त देशात पळून गेला.


परंतु शाफानचा पुत्र हा अहीकाम यिर्मयाहच्या बाजूने उभा राहिला व त्याला मारण्यासाठी त्याला जमावाच्या हवाली करण्यात आले नाही.


सर्व अधिपतींनी व लोकांनी हा करार स्वीकारला की ते त्यांच्या दास व दासींना मुक्त करतील व यापुढे त्यांना बंदी बनवून ठेवणार नाहीत. त्यांनी हे मान्य केले व सर्व दास व दासींना मुक्त केले.


यहूदीया व यरुशलेममधील अधिपती, न्यायालयीन अधिकारी, याजक व सामान्य लोक जे दोन भाग केलेल्या वासराच्या मधून चालत गेले,


शाफानचा पुत्र गमर्‍याह चिटणीस, याच्या याहवेहच्या मंदिरात वरच्या सभागृहाच्या बाजूस नव्या द्वारातील प्रवेशमार्गाजवळील कचेरीमध्ये नेरीयाहचा पुत्र बारूख यिर्मयाहची वचने लिहिलेले हे चर्मपत्र वाचण्यासाठी गेला.


त्यावेळी एलनाथान, दलायाह व गमर्‍याह या तिघांनी हे चर्मपत्र जाळू नये असे राजाला परोपरीने विनविले, परंतु राजाने त्यांचे ऐकले नाही.


तिचे सरदार भक्ष फाडणार्‍या लांडग्याप्रमाणे आहेत; अन्यायाने लाभ करून घेण्यासाठी ते रक्तपात करतात व लोकांना जिवे मारतात.


“ ‘पाहा, इस्राएलचे प्रत्येक राजपुत्र त्यांच्या अधिकाराचा उपयोग कसा रक्तपातासाठी करीत आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan