Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 25:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 हा सर्व देश ओसाड व पडीक असा होईल. हे देश सत्तर वर्षे बाबेलच्या राजाची सेवा करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 हा सगळा देश वैराण आणि विस्मयाला कारण होईल, आणि ही राष्ट्रे सत्तर वर्षे बाबेलच्या राजांचे दास्य करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आणि ती सगळी भूमी वैराण व वाळवंट होईल, आणि ही राष्ट्रे सत्तर वर्षांपर्यंत बाबेलाच्या राजाचे दास होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 25:11
23 Iomraidhean Croise  

तलवारीच्या घातापासून सुटलेल्या लोकांना तो बाबेलला बंदिवासात घेऊन गेला आणि पर्शियाचे राज्य सत्तेवर येईपर्यंत ते त्याचे आणि त्याच्यानंतर येणाऱ्यांचे सेवक झाले.


मी ती जमीन उजाड करेन, तिथे छाटणी किंवा नांगरणी करणार नाही, आणि तिथे कुसळे व काटेरी झुडपे वाढतील. मी ढगांना आज्ञा देईन की, त्यांच्यावर पाऊस पाडू नका.”


“गुलामगिरीची ही सत्तर वर्षे संपल्यानंतर, मी बाबेलचा राजा व त्याचे लोक यांना त्यांच्या अपराधांबद्दल शासन करेन; मी खाल्डियनांचा देश कायमचा ओसाड करेन,


सिंह आपली गुहा सोडतो तसे ते आपले विश्रांतिस्थान सोडतील, आणि जुलूम करणाऱ्यांच्या तलवारीमुळे आणि परमेश्वराच्या तीव्र क्रोधामुळे त्यांची भूमी उद्ध्वस्त होईल.


‘होय, त्या आता बाबेलला नेण्यात येतील आणि मी त्यांची भेट घेईपर्यंत त्या तिथेच राहतील,’ याहवेह घोषित करतात. ‘नंतर पुढे मी हे सर्व यरुशलेमला परत आणेन व पुनर्स्थापित करेन.’ ”


सर्व राष्ट्रे, त्या देशाची वेळ येईपर्यंत, त्याच्या पुत्राची व त्याच्या नातवाची सेवा करतील, आणि नंतर अनेक राष्ट्रे व मोठमोठे राजे बाबिलोन जिंकून घेतील आणि त्याला आपला गुलाम करतील.


सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: या सर्व राष्ट्रांच्या मानेवर मी लोखंडी जोखड ठेवले आहे, त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची गुलामगिरी करण्यास लावेन, व ते करतील. मी वनपशूही त्याच्या ताब्यात देईन.’ ”


याहवेह असे म्हणतात: “बाबेलमध्ये सत्तर वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी तुमची भेट घेईन आणि तुम्हाला दिलेल्या उत्तम अभिवचनानुसार पुन्हा तुम्हाला या ठिकाणी आणेन.”


सुपीक जमीन ही एक वाळवंट झाली होती; आणि येथील सर्व नगरे उद्ध्वस्त होती याहवेहच्या समोर, त्यांच्या भयंकर क्रोधाग्नीपुढे.


याहवेह असे म्हणतात: “संपूर्ण भूमी उजाड होईल, तरीपण मी त्याचा पूर्ण अंत करणार नाही.


आणि मग त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मी माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरला इजिप्तमध्ये पाठवेन. मी त्याचे सिंहासन याच लपविलेल्या धोंड्यावर स्थापन करेन; मग तो त्यावर आपला राजमंडप पसरेल.


तुम्ही जी सर्व दुष्कृत्ये करीत होता, ती सहन करणे याहवेहला अशक्य झाले; म्हणून तुमची भूमी शापित झाली व ओसाड होऊन निर्मनुष्य झाली, जशी ती आजही आहे.


देशातील लोकांना सांग: ‘इस्राएल व यरुशलेमात राहणार्‍यांविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ते त्यांचे अन्न चिंतेने खातील व आपले पाणी घाबरत पितील, कारण त्यात राहणार्‍या लोकांच्या क्रूरतेमुळे त्यांच्या देशात असलेले सर्वकाही काढून टाकले जाईल.


ना कोणी मनुष्य ना पशू त्यामधून जाईल; चाळीस वर्षे तिथे कोणी वस्ती करणार नाही.


मी आपला हात त्यांच्याविरुद्ध उगारेन आणि दिबलाहच्या वाळवंटापासून ते जिथे कुठे राहतील मी त्यांचा देश ओसाड करेन; तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”


त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मला, दानीएलला, संदेष्टा यिर्मयाहला दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार पवित्र शास्त्रातून समजले की यरुशलेम सत्तर वर्षे उजाड अशा अवस्थेत राहील.


मी देश ओसाड करेन, म्हणजे तुमचे शत्रू जे त्यात राहतील ते त्यामुळे गांगरून जातील.


पृथ्वीवरील रहिवाशांमुळे, त्यांच्या कृतींचा परिणाम म्हणून, पृथ्वी उजाड होईल.


मग याहवेहच्या दूताने म्हटले: “हे सर्वसमर्थ याहवेह, गेली सत्तर वर्षे तुम्ही यरुशलेम व यहूदीयाच्या नगरांवर संतापलेले आहात, त्यांच्यावर दया करण्याचे तुम्ही किती वेळ नाकारणार आहात?”


“तुमच्या देशातील सर्व लोकांना आणि याजकांना हा प्रश्न विचार, ‘गेली सत्तर वर्षे तुम्ही पाचव्या आणि सातव्या महिन्यात जे उपवास आणि शोक करीत होता, ते खरोखर माझ्यासाठी उपवास करत होते काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan