Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 24:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मी त्यांना असे करेन की पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्राला त्यांची घृणा येईल, आणि मी जिथे मी घालवून देईन, तिथे निंदा, कुचेष्टा, शाप आणि ते उपहासाचा विषय होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांना हाकून देईन तेथे ते अपशब्द व लोकप्रवाद, निंदा व शाप ह्यांचे विषय होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मी त्यांना एक भयावह गोष्ट बनवीन, मी त्यांना सर्व मानवजातीच्या दृष्टीत अरिष्ट असे करीन, ते जीथे घालवले जातील तीथे ते चेष्टेचा व निंदा, म्हण व शाप असे होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 24:9
29 Iomraidhean Croise  

तर जो देश मी त्यांना दिला आहे त्यातून मी इस्राएली लोकांना छेदून टाकीन आणि हे मंदिर जे मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे त्याचा मी धिक्कार करेन. मग इस्राएल सर्व लोकांमध्ये थट्टा व निंदेचा विषय होतील.


तर मी माझ्या देशातून जो मी त्यांना दिलेला आहे, तिथून मी इस्राएली लोकांना उपटून टाकीन आणि या मंदिराचा, जे मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे त्याचा मी धिक्कार करेन. सर्व लोकांमध्ये मी ते थट्टा व निंदेचा विषय करेन.


जेव्हा मी गोणपाट पांघरले, तेव्हा ते माझ्याबद्दल उपहासाने बोलू लागले.


म्हणूनच मी तुमच्या मंदिराच्या अधिपतींची मानहानी केली; मी याकोबाला विध्वंसाच्या हवाली केले व इस्राएलला तिरस्कारास्पद केले.


माझ्या निवडलेल्या लोकांमध्ये तुमचे नाव शापवचन असे होईल; सार्वभौम याहवेह तुम्हाला ठार करतील, परंतु आपल्या सेवकांना नवीन नावाने संबोधतील.


यहूदीयाचा राजा हिज्कीयाहचा पुत्र मनश्शेह, याने यरुशलेममध्ये जे अनाचार केले, त्याबद्दल मी केलेले शासन पाहून सर्व जगातील राष्ट्रांना दहशत बसेल.


मी या नगराचा नाश करेन आणि ते दहशतीचे व आणि घृणेचे ठिकाण बनवीन; त्याच्या जवळून जाणारा कोणीही त्याच्या सर्व जखमांमुळे भयचकित होतील आणि त्यांचा उपहास करतील.


यरुशलेम व यहूदीयाची नगरे, आणि त्यांचे राजे आणि अधिपती या सर्वांनी पडीक व भयानकतेचे एक उदाहरण, तिरस्कृत व शापित व्हावे—जसे ते आजही आहेत;


तर या मंदिरास मी शिलोह आणि या नगरासारखे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांमध्ये शाप असे करेन.’ ”


मी त्यांचा तलवार, दुष्काळ व मरीने पाठलाग करेन, जगभरातील सर्व राष्ट्राचे लोक त्यांची घृणा करतील, व त्यांना मी जिथेही हाकलून लावले तेथील लोक शाप देतील, त्यांची नाचक्की करतील, त्यांची चेष्टा करतील.


ज्या लोकांना यहूदीयामधून खास्द्यांमध्ये बंदिवान म्हणून नेले, ते शाप देताना म्हणतील: ‘ज्याप्रमाणे बाबेलच्या राजाने सिद्कीयाह व अहाब यांना जिवंत जाळले, त्यांच्याप्रमाणेच याहवेह तुझे करो.’


“म्हणून याहवेह असे म्हणतात: तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही; तुमच्या स्वतःच्या लोकांची मुक्तता करण्याची घोषणा करीत नाही. म्हणून मी आता तुमची ‘मुक्तता’ करेन, असे याहवेह जाहीर करतात—युद्ध, दुष्काळ व मरी यांच्याद्वारे तुम्हाला मरणाची ‘मुक्तता’ मिळेल. सर्व जगातील राज्यात मी तुम्हाला घृणास्पद असे करेन.


कारण इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: ‘यरुशलेमच्या लोकांवर माझ्या रागाचा व क्रोधाचा वर्षाव झाला, तसाच तुम्ही इजिप्तमध्ये प्रवेश कराल तेव्हा तुमच्यावर होईल. तिथे तुम्ही घृणा, शाप व उपहासाचा विषय व्हाल; तुम्हाला हा देश परत कधी दिसणार नाही.’


इजिप्तमध्ये जाण्याचा हट्ट धरणार्‍या या यहूदीयातील उरलेल्या लोकांना मी नाहीसे करेन. ते सर्वजण इजिप्तमध्ये नष्ट होतील; ते तलवारीने वा दुष्काळाने मरण पावतील. अगदी लहानांपासून थोरापर्यंत सर्व तलवारीने वा दुष्काळाने मरतील. ते एक असा शाप होतील, ते भयानकतेचा, तिरस्काराचा, व शापाचा विषय होतील.


यरुशलेममध्ये राहणाऱ्यांना मी जशी शिक्षा केली, तशीच या इजिप्तमध्ये राहणाऱ्यांनाही मी तलवार, दुष्काळ व मरी यांनी शिक्षा करेन.


तुम्ही जी सर्व दुष्कृत्ये करीत होता, ती सहन करणे याहवेहला अशक्य झाले; म्हणून तुमची भूमी शापित झाली व ओसाड होऊन निर्मनुष्य झाली, जशी ती आजही आहे.


“सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्यांच्याविरुद्ध मोठा जमाव आणा आणि त्यांना आतंक व लुटेच्या स्वाधीन करा.


अम्मोन्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेहचे वचन ऐका. सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जेव्हा माझे पवित्रस्थान अपवित्र करण्यात आले, आणि इस्राएल देश ओसाड झाला व जेव्हा यहूदीयाचे लोक बंदिवासात गेले, तेव्हा तुम्ही “आहा!” असे म्हटले,


“मानवपुत्रा, यरुशलेमविषयी सोरने म्हटले, ‘आहा! राष्ट्रांचे प्रवेशद्वार मोडले आहे आणि त्याचे दरवाजे माझ्यासाठी उघडे पडले आहेत; ती उजाड झाली आहे, तर आता माझी भरभराट होईल,’


“म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे यरुशलेमे, मी स्वतःच तुझ्याविरुद्ध आहे आणि मी सर्व राष्ट्रांसमक्ष तुला शासन करेन.


तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव व्हावा, असे याहवेह करतील. तुम्ही त्यांच्यावर एका दिशेने चाल करून जाल, पण सात दिशांनी गोंधळून पळ काढाल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांकरिता तुम्ही भयानक विनाशाचे उदाहरण व्हाल.


याहवेह तुम्हाला अशा सर्व राष्ट्रांमध्ये ओढून नेतील, जिथे तुम्ही भयाचा, म्हणीचा आणि उपहासाचा विषय बनाल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan