Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 23:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 ज्या खोट्या संदेष्ट्यांना स्वप्ने पडतात, त्यांना ती स्वप्ने सांगू दे, परंतु ज्याला माझे वचन प्राप्त झाले आहे, त्याने ते विश्वासूपणे सांगावे. कोंड्याचा गव्हाशी काय संबंध आहे?” असे याहवेह जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 कोणा संदेष्ट्याने स्वप्न पाहिले असेल तर ते तो कथन करो; माझे वचन कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो ते माझे वचन सांगो. गव्हापुढे पेंढा तो काय? असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 संदेष्ट्याला स्वप्न सांगायचे असेल, तर त्यास सांगू द्या. पण ज्या कोणाला मी काही घोषीत करतो, त्याने माझे वचन सत्याने सांगावे. गव्हा पुढे गवत ते काय? परमेश्वर असे म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 23:28
15 Iomraidhean Croise  

पण मिखायाह म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, याहवेह मला जे काही सांगतील तेच मी त्याला सांगेन.”


राजाने त्याला म्हटले, “मी तुला किती वेळा शपथ देऊन सांगावे की याहवेहच्या नावाने तू मला केवळ जे सत्य तेच सांगावे?”


खरा साक्षीदार कधीच फसवणूक करीत नाही, परंतु खोटा साक्षीदार मुखातून असत्य ओततात.


माझे लोक जे खळ्यावर चिरडले गेले आहेत, इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह यांच्याकडून, मी जे ऐकले आहे ते मी तुम्हाला सांगतो.


“माझ्या नावाने खोटे संदेश देणारे संदेष्टे काय म्हणतात ते मी ऐकले आहे. ते म्हणतात, ‘मला स्वप्न पडले! मला स्वप्न पडले!’


यिर्मयाह संदेष्ट्याने उत्तर दिले, “मी तुमचे ऐकले आहे, मी निश्चितच याहवेह, तुमचे परमेश्वर यांच्याकडे तुमच्या विनवणीप्रमाणे प्रार्थना करतो; आणि ते काय म्हणतात ते तुम्हाला मी सांगतो, मी तुमच्यापासून काही लपविणार नाही.”


हे सर्व समजण्याइतपत शहाणा कोण आहे? याहवेहने हे त्याला समजावून सांगितले व तो त्याचे स्पष्टीकरण करेल तो कुठे आहे? हा देश एवढा ओसाड व वाळवंटासारखा का झाला की यातून प्रवास करण्यासही कोणी धजत नाही?


आता स्त्रियांनो, याहवेहचे शब्द ऐका! त्यांच्या मुखातील शब्द ऐकण्यासाठी तुमचे कान उघडा. तुमच्या कन्यांना विलाप करण्यास शिकवा; एकमेकींना आकांत करण्यास शिकवा.


सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मूर्ख संदेष्टे ज्यांनी काहीही पाहिले नाही तरी स्वतःच्याच आत्म्याचे अनुसरण करतात त्यांचा धिक्कार असो!


“तुमच्यामध्ये प्रामाणिक व सुज्ञ कारभारी कोण आहे? ज्याच्यावर घरधनी त्याच्या कुटुंबीयांची देखभाल करण्याचे व अन्नाचे योग्य वेळी वाटप करण्याचे काम सोपवितो.


यावर प्रभूजींनी उत्तर दिले, “प्रामाणिक व सुज्ञ कारभारी कोण आहे, ज्याच्यावर घरधनी त्याच्या सेवकांच्या अन्नाचे योग्य वेळी वाटप करण्याचे काम सोपवितो?


आता ज्यांना कारभार सोपवून दिला आहे, त्यांनी स्वतःला विश्वासू असे प्रमाणित करावे.


आम्ही अशा अनेक लोकांसारखे नाही की जे परमेश्वराचे वचन सांगून लाभ मिळवितात. उलट ख्रिस्तामध्ये आम्ही परमेश्वरासमोर प्रामाणिकपणाने आणि परमेश्वराने पाठविलेल्या माणसाप्रमाणे बोलत असतो.


मी आपल्या प्रभू ख्रिस्त येशूंचा आभारी आहे, ज्यांनी मला सामर्थ्य दिले आणि त्यांनी मला विश्वासयोग्य मानून त्यांच्या सेवेसाठी निवडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan