Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 23:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 हा प्रकार या खोट्या संदेष्ट्यांच्या अंतःकरणात किती काळ चालणार, जे त्यांच्या मनाच्या भ्रांतीने भविष्यवाणी करतात?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 माझ्या नावाने असत्य संदेश देणारे ते संदेष्टे आपल्या मनातले कपट संदेशरूपाने कथन करतात, हे कोठवर चालणार?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 संदेष्ट्ये जे खोटे भविष्य सांगतात आणि आपल्या हृदयाच्या दुष्टपणाने विचार करतात हे किती काळ चालणार?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 23:26
13 Iomraidhean Croise  

अहो मनुष्यांनो, किती वेळा तुम्ही माझ्या गौरवाला काळिमा लावणार? किती काळ तुम्ही फसवणुकीवर प्रीती कराल आणि खोट्या दैवतांचा शोध कराल? सेलाह


दृष्टान्त पाहणाऱ्यांना ते असे म्हणतात, “यापुढे दृष्टान्त पाहू नका!” आणि संदेष्ट्यांना म्हणतात, “यापुढे काय योग्य आहे, याबद्दल आम्हाला दर्शन देऊ नका! आनंद देणाऱ्या गोष्टी आम्हाला सांगा, भ्रामक कल्पना असलेली भविष्यवाणी करा.


तुझा व्याभिचार व तुझे ते कामातुरपणे खिंकाळणे, व तुझी निर्लज्ज वेश्यावृत्ती! डोंगरावर आणि शेतात चाललेली तुझी अमंगळ कामे मी बघितली आहेत. हे यरुशलेम, तुला धिक्कार असो! तू केव्हापर्यंत शुद्ध राहणार नाही?”


त्यावर याहवेहने मला म्हटले, “संदेष्टे माझ्या नावाने असत्य संदेश सांगत आहेत. मी काही त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना नेमले नाही वा त्यांच्याशी बोललो नाही. खोट्या दृष्टान्तावरून, प्रकटीकरणांवरून, व्यर्थ शकुनविद्येवरून आणि स्वतःच्या मनाच्या भ्रांतीवरून ते तुम्हाला खोटी भविष्ये सांगतात.”


सर्वात कपटी काही असेल तर, ते म्हणजे अंतःकरण आणि ते बरे करण्याच्या पलीकडे आहे. हे कळण्यास कोण समर्थ आहे?


यरुशलेम, तुमच्या अंतःकरणाची अशुद्धता स्वच्छ करा आणि तुमचे रक्षण होईल. किती काळ तुम्ही तुमचे दुष्ट विचार अंतःकरणात ठेवणार?


हे शोमरोना, तुझी वासराची मूर्ती फेकून दे! त्यांच्याविरुद्ध माझा राग पेटला आहे. ते अजून किती काळ शुद्ध होण्यास असमर्थ राहतील?


“तू सैतानाचा पुत्र आहेस आणि सर्व चांगुलपणाचा वैरी आहेस! तू सर्वप्रकारच्या कपटाने व चातुर्याने भरलेला आहेस. प्रभूच्या चांगल्या मार्गाला भ्रष्ट करण्याचे तू कधीच सोडणार नाहीस काय?


कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक शुद्ध शिक्षण स्वीकारणार नाहीत. त्याऐवजी, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याभोवती असंख्य शिक्षक एकत्रित करतील जे त्यांच्या कानाची खाज जिरविणारे उपदेश देतील.


कारण भविष्यकथन मनुष्यांच्या इच्छेने कधी झालेले नाही, तर संदेष्ट्यांनी, जरी ते मनुष्य होते तरी पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन परमेश्वराकडून आलेला संदेश सांगितला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan