Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 23:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 “माझ्यापासून कोणाला गुप्तस्थळी लपून राहता येईल काय? जेणेकरून मी त्यांना बघू शकणार नाही.” असे याहवेह जाहीर करतात. मी स्वर्ग आणि पृथ्वी व्यापून टाकणारा नाही काय? असे याहवेह जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 परमेश्वर म्हणतो, माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणाला लपता येईल काय? मी आकाश व पृथ्वी व्यापून राहत नाही काय? असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 परमेश्वर असे म्हणतो, कोण असा आहे जो गुप्त ठिकाणी लपतो म्हणजे मी त्यास पाहू शकणार नाही? मी स्वर्ग आणि पृथ्वी भरून उरलो नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 23:24
28 Iomraidhean Croise  

तिच्याशी बोलणार्‍या याहवेहला तिने हे नाव दिले: “मला पाहणारे परमेश्वर तुम्हीच आहात,” कारण ती म्हणाली, “जे मला पाहात आहेत, त्यांना मी आता पाहिले आहे.”


“पण परमेश्वर खचितच पृथ्वीवर राहतील काय? स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्गात सुद्धा आपण मावणार नाहीत! मग हे जे मंदिर मी बांधले आहे त्यात आपण कसे मावाल?


परंतु ज्यांना स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्ग सुद्धा अपुरा आहे, त्यांच्यासाठी मंदिर बांधण्यास कोण समर्थ आहे? तर मग मंदिर बांधणारा मी कोण? केवळ त्यांच्या पुढे अर्पणे करण्यासाठी स्थान मी बांधत आहे.


“पण परमेश्वर खचितच मानवजातीबरोबर पृथ्वीवर राहतील काय? स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्गात सुद्धा आपण मावणार नाहीत! मग हे जे मंदिर मी बांधले आहे त्यात आपण कसे मावाल?


“मानवाच्या मार्गाकडे त्यांचे डोळे लागलेले आहेत; परमेश्वराचे त्यांच्या प्रत्येक पावलांवर लक्ष आहे.


कोणतीही दाट छाया ना गडद अंधकार आहे, जिथे दुष्कर्मी लपू शकतील.


तो स्वतःशी बोलतो, “परमेश्वराच्या लक्षात हे कधीही येणार नाही, त्यांनी आपले मुख लपविले आहे, ते हे पाहात नाहीत.”


तुमच्या आत्म्यापासून दूर मी कुठे जाऊ? तुमच्या समक्षतेपासून दूर मी कुठे पळू?


मी वर स्वर्गात गेलो, तरी तिथे तुम्ही आहात; अधोलोकात माझे अंथरूण केले, तर तिथेही तुम्ही आहातच.


तुम्ही सर्व याहवेहचे स्तवन करा, कारण केवळ त्यांच्याच नामाला महिमा मिळो; त्यांचे ऐश्वर्य पृथ्वी आणि आकाशाहून महान आहे.


तुम्ही आमचे अपराध आपल्यापुढे पसरून ठेवता; तुमच्या सानिध्यात आमची सर्व गुप्त पातकेही प्रकाशात येतात.


याहवेहचे नेत्र सर्वठिकाणी बघत आहेत, सज्जनांवर व दुर्जनांवर त्यांची नजर असते.


धिक्कार असो, जे त्यांच्या योजना याहवेहपासून लपविण्यासाठी खूप खोलवर जातात, जे त्यांची कार्ये अंधारात करतात आणि असा विचार करतात, “आम्हाला कोण पाहतो? हे कोणाला माहीत होईल?”


जे अनंतकाळ अस्तित्वात आहेत, ज्यांचे नाम पवित्र आहे जे सर्वोच्च व परमथोर आहेत, ते म्हणतात— “मी परमोच्च व पवित्रस्थानी राहतो, परंतु जे पश्चात्तापी व आत्म्याने लीन आहेत, अशांसोबतही राहतो, मी नम्र जणांच्या आत्म्यांना ताजेतवाने करतो व पश्चात्तापी अंतःकरणाच्या लोकांना नवा धीर देतो.


याहवेह असे म्हणतात: “स्वर्ग माझे सिंहासन आहे आणि पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी निवासस्थान बांधणार ते कुठे आहे? माझे विश्रांतिस्थान कुठे असणार?


कारण माझी नजर तुझ्या सर्व मार्गावर लक्ष ठेऊन आहे; ते माझ्यापासून लपू शकत नाही, आणि त्यांचे कोणतेही पाप माझ्या नजरेतून सुटत नाही.


तुमच्या योजना महान आहेत व तुमची कार्ये अद्वितीय आहेत. सर्व मानवजातीचे मार्ग तुमच्या नेत्रांना उघड दिसतात; प्रत्येकाला तुम्ही त्याच्या वागणुकीनुसार व कृत्यानुसार योग्य मोबदला देता.


परंतु मी एसावला पूर्णपणे विवस्त्र करेन; मी त्याची लपण्याची ठिकाणे उघडी करेन, म्हणजे तो स्वतःला गुप्त ठेऊ शकणार नाही. त्याचे शस्त्रधारी पुरुष, तसेच त्यांचे मित्रगण व शेजारीदेखील नष्ट झाले आहेत, म्हणून तिथे असे म्हणणारा कोणीही राहिलेला नाही,


तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे वडीलजन आपआपल्या मूर्तिघराच्या अंधारात काय करीत आहेत ते तू पाहिलेस काय? ते म्हणतात, ‘याहवेह आम्हाला पाहत नाही; याहवेहने आम्हाला टाकले आहे.’ ”


याहवेहने मला म्हटले, “इस्राएल व यहूदीयाच्या लोकांचे अपराध फारच घोर आहेत; देश रक्तपाताने व शहर अन्यायाने भरले आहे. ते म्हणतात, ‘याहवेहने देशाला सोडून टाकले आहे; आणि याहवेह पाहत नाही.’


गहन आणि गूढ रहस्य तेच प्रकट करतात; अंधारात काय आहे हे ते जाणतात आणि प्रकाश त्यांच्यामध्ये राहतो.


पृथ्वीवरील सर्व लोक कवडीमोलाचे आहेत. स्वर्गातील शक्तींमध्ये आणि पृथ्वीवरील रहिवाशांमध्ये त्यांना जे योग्य वाटते तेच ते करतात. त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही अथवा त्यांना बोलू शकत नाही: “तुम्ही हे काय केले?”


मंडळी जे त्यांचे शरीर, तिला त्यांच्या परिपूर्णतेने सर्वकाही सर्वप्रकारे पुरवितात.


संपूर्ण सृष्टीतील काहीही परमेश्वराच्या दृष्टीपासून लपलेले नाही. ज्यांना आपण हिशोब देणे आवश्यक आहे, त्यांच्या डोळ्यांपुढे सर्वकाही अनावृत व उघडे आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan