Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 23:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 याहवेहच्या अंतःकरणाचा उद्देश पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा महाभयंकर क्रोध शांत होणार नाही. पुढे येणाऱ्या दिवसात तुला ते अगदी स्पष्टपणे कळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 परमेश्वर आपले कार्य करीपर्यंत, आपला मनोदय पूर्ण करीपर्यंत, त्याचा संताप मागे फिरणार नाही; पुढील काळात तुम्हांला हे चांगले समजेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 परमेश्वराने आपल्या हृदयातील हेतू सिद्धीस नेई पर्यंत, त्याचा राग परतणार नाही. शेवटल्या दिवसात तुम्हास हे समजेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 23:20
18 Iomraidhean Croise  

नंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना बोलावून म्हटले: “असे माझ्याभोवती गोळा व्हा, म्हणजे पुढे भविष्यकाळात तुमचे काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगेन.


आणि ते कैदेत असता त्यांच्या हृदयाचा पालट झाला व पश्चात्ताप करीत कैद करून नेलेल्यांच्या देशात आपल्याकडे असे म्हणत विनंती केली, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही विपरीत वागलो आहोत, आम्ही दुष्टतेने वागलो आहोत’;


इतके होऊनही यहूदीयाच्या विरुद्ध आलेला याहवेहचा महाक्रोध कमी झाला नव्हता, मनश्शेह राजाने जी दुष्टता केली होती त्यामुळे त्यांचा यहूदाहवरचा राग कमी झाला नाही.


म्हणून याहवेहने म्हटले, “इस्राएलप्रमाणे मी यहूदीयालाही माझ्या उपस्थितीतून काढून टाकेन आणि मी स्वतः ज्या नगरीला निवडले होते त्या यरुशलेमचा आणि या मंदिराचाही ज्याबद्दल मी म्हटले होते, ‘तिथे माझे नाव राहील’  त्यांचा त्याग करेन.”


मनुष्याचे कोणतेही सुज्ञान, बुद्धिमत्ता, कोणत्याही योजना याहवेहविरुद्ध यशस्वी होऊ शकत नाहीत.


सर्वसमर्थ याहवेहनी शपथ घेतली आहे, “निश्चितच, मी जी योजना केली आहे, तसेच होईल, आणि जो माझा संकल्प आहे, त्याप्रमाणे हे घडून येईल.


त्याप्रमाणे माझे वचन, जे माझ्या मुखातून बाहेर पडते: ते कार्य केल्याशिवाय माझ्याकडे परत येत नाही, पण ते माझ्या इच्छेप्रमाणे सर्व परिपूर्ण करते व ज्या कार्यासाठी पाठविण्यात आले, तो माझा हेतू साध्य करते.


याहवेहच्या अंतःकरणाचा उद्देश पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा महाभयंकर क्रोध शांत होणार नाही. पुढे येणाऱ्या दिवसात तुला हे कळेल.


यास्तव पृथ्वी शोक करेल आणि आकाशात काळोख होईल, कारण मी बोललो आहे, त्यात आता बदल होणार नाही, मी निर्णय घेतला आहे आणि मागे फिरणार नाही.”


बाबेलच्या तटबंदीविरुद्ध तुमचे झेंडे उंच करा! पहारेकऱ्यांची कुमक पाठवून मजबूत करा, पहारेकऱ्यांना स्थानबद्ध करा, दबा धरून बसण्याची तयारी करा! याहवेहनी बाबेलच्या लोकांविरुद्ध दिलेल्या फर्मानाचा हेतू ते सिद्धीस नेतील.


कत्तल करण्यास धार लावलेली, विजेप्रमाणे चमकणारी अशी केलेली! “ ‘माझ्या राजपुत्राच्या राजदंडामुळे आम्ही आनंद करावा काय? तलवार अशा प्रत्येक काठीला तुच्छ लेखते.


तेव्हा सर्व लोक जाणतील मी याहवेहने आपल्या म्यानातून तलवार उपसली आहे; ती परत त्यात जाणार नाही.’


पण माझी वचने व माझे नियम जे मी माझ्या सेवक संदेष्ट्यांना आज्ञापिले होते, त्यांनी तुमच्या पूर्वजांना मागे टाकले आहे ना? “तेव्हा त्यांनी पश्चात्ताप केला व ते म्हणाले, ‘आमचे वागणे व प्रथांमुळे याहवेहकडून आम्हाला जी शिक्षा मिळाली, त्यास आम्ही पात्र आहोत. जी करण्याचा त्यांनी निर्धार केला होता.’ ”


तुमच्यावर यातना व अनेक दुःखाचे प्रसंग येतील, तेव्हा तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत याल आणि त्यांचे आज्ञापालन कराल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan