Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 23:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 म्हणून याहवेह, इस्राएलचे परमेश्वर मेंढपाळांना जे माझ्या लोकांची राखण करतात त्यांना असे म्हणतात: “कारण तुम्ही माझ्या कळपाची पांगापांग केली व त्यांना हुसकून लावले आणि त्यांची काळजी घेतली नाही, आता तुम्ही त्यांच्याशी केलेल्या दुष्टपणाबद्दल मी तुमच्यावर शिक्षांचा वर्षाव करेन.” असे याहवेह जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 ह्यामुळे माझ्या लोकांना चारणार्‍या मेंढपाळांविषयी इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, “तुम्ही माझा कळप विखुरला आहे, त्यांना हाकून लावले आहे, त्यांचा समाचार घेतला नाही; पाहा, मी तुमच्या कर्मांचा अनिष्ट परिणाम तुमच्यावर आणून तुमचा समाचार घेईन, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 यास्तव परमेश्वर, इस्राएलचा देव, त्या मेंढपाळांना, जे त्याच्या लोकांस चारतात, त्याविषयी असे म्हणतो, “तुम्ही माझ्या मेंढरांना विखरले आणि त्यांना घालवून लावले आहे. तुम्ही त्यांची काळजी घेतली नाही. हे जाणून घ्या, मी तुम्हास तुमच्या वाईट कृत्यांबद्दल परत फेड करीन.” परमेश्वर असे म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 23:2
21 Iomraidhean Croise  

आता जा आणि ज्या ठिकाणाविषयी मी बोललो त्याकडे लोकांना चालव आणि माझा दूत तुमच्यापुढे जाईल. तथापि, जेव्हा शिक्षा करण्याची वेळ येईल, तेव्हा मी त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा देईन.”


माझे मेंढपाळ असमंजस आहेत कारण ते याहवेहचे मार्गदर्शन घेत नाहीत; म्हणून ते समृद्ध होत नाहीत आणि त्यांच्या सर्व कळपांची पांगापांग होते.


म्हणून सर्वसमर्थ याहवेहने मला असे उत्तर दिले: “मी त्यांना शिक्षा देईन. त्यांचे पुरुष तलवारीस बळी जातील, त्यांचे पुत्र व कन्या उपासमारीने मरतील.


जर तुम्ही माझे ऐकले नाही, तर मी एकांतात अश्रू ढाळेन तुमच्या गर्विष्ठपणामुळे; माझे डोळे घोर रुदन करतील, माझ्या अश्रूंचा पूर लोटेल, कारण याहवेहच्या कळपाला बंदिवान करून नेण्यात येईल.


नेत्र उंच करा व पाहा उत्तरेकडून कूच करीत चालून येणार्‍यांना पाहा. ज्या मेंढरांचा तुला अभिमान होता, विश्वासाने तुझ्या सुपूर्द केलेला तुझा कळप कुठे आहे?


ज्यांचे संगोपन करून त्यांना आपले विशेष मित्र बनविले त्यांनाच याहवेहने तुझ्यावर सत्ता दिली, तर मग तू काय म्हणशील? तेव्हा तू प्रसूती वेदनांनी तळमळणाऱ्या स्त्रीप्रमाणे तळमळणार नाही का?


“मी याहवेह, अंतःकरणे पारखतो, आणि मनाची परीक्षा घेतो, म्हणून प्रत्येक मानवाला त्याने केलेल्या आचरणाप्रमाणे, प्रत्येकाला त्याच्या कर्मांप्रमाणे रास्त प्रतिफळ देतो.”


दावीदाच्या घराण्याला, याहवेह काय म्हणतात ते ऐका: “ ‘रोज सकाळी योग्य न्यायनिवाडा करा; दुष्टांनी ज्याला लुबाडले आहे अशांना त्यांच्या हातातून सोडवा, नाहीतर माझा क्रोध भडकेल व अग्नीसारखा पेटेल कारण तुम्ही दुष्कर्म केले आहे— हा क्रोधाग्नी कोणीही शांत करू शकणार नाही.


आणि ‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ असे हक्काने सांगणारे संदेष्टे आणि याजक वा इतर कोणीही लोक या सर्वांना आणि त्यांच्या कुटुंबांना मी शासन करेन.


तुम्ही जी सर्व दुष्कृत्ये करीत होता, ती सहन करणे याहवेहला अशक्य झाले; म्हणून तुमची भूमी शापित झाली व ओसाड होऊन निर्मनुष्य झाली, जशी ती आजही आहे.


मी त्यांना याची शिक्षा देऊ नये काय?” असे याहवेह विचारतात. “अशा राष्ट्राचा मी स्वतः सूड घेऊ नये का?


हे सर्व पाहून मी त्यांना शिक्षा करू नये काय? ही याहवेहची जाहीर वाणी आहे. अशा दुष्ट राष्ट्राचा मी स्वतः प्रतिकार करू नये काय?


त्यांना त्यांच्या वाईट कृत्याबद्दल लाज वाटते का? नाही, त्यांना मुळीच लज्जा वाटत नाही; लाज वाटणे म्हणजे काय असते हे त्यांना माहीतच नाही. म्हणून ते पतन पावलेल्या लोकांमध्ये पतन पावतील; त्यांना शिक्षा मिळेल तेव्हा त्यांचे पतन होईल, असे याहवेह म्हणतात.


म्हणून मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची पांगापांग झाली आणि जेव्हा ते पांगले गेले तेव्हा हिंस्र पशूंसाठी भक्ष्य झाले.


जेव्हा तिने बआलसाठी धूप जाळला, तिला मी त्या दिवसांसाठी शिक्षा करेन; तिने स्वतःला अंगठ्यांनी आणि दागिन्यांनी सजविले, आणि तिच्या प्रियकरांच्या मागे गेली, परंतु मला मात्र ती विसरून गेली,” असे याहवेह घोषित करतात.


त्यांच्यामध्ये जो सर्वोत्कृष्ट मानला जातो तो काटेरी झुडूप आणि जो नीतिमान तो काट्याच्या कुंपणापेक्षाही वाईट आहे. परमेश्वराने तुमच्याकडे येण्याचा दिवस आला आहे, म्हणजेच तुमच्या पहारेकऱ्याने आवाज देण्याची वेळ आली आहे. आता तुमच्या गोंधळाची वेळ आली आहे.


“माझा संताप मेंढपाळांविरुद्ध भडकतो, आणि मी पुढार्‍यांना शिक्षा करेन; कारण आपल्या कळपाची, यहूदीयाच्या लोकांची काळजी सर्वसमर्थ याहवेह करतील, आणि त्यांना युद्धातील कुशल घोड्यांप्रमाणे करतील.


मी या राष्ट्रास एका अशा मेंढपाळाच्या हाती देईन, जो हरविलेल्या मेंढरांची काळजी घेणार नाही, कोकरांकडे लक्ष देणार नाही, जखमी मेंढरांना औषध देणार नाही किंवा सशक्त मेंढरांना चारा देणार नाही. त्याऐवजी तो पुष्ट मेंढरे खाऊन टाकील व त्यांची खुरे विदारून त्याचे तुकडे करेल.


मला वस्त्रांची गरज होती, तेव्हा तुम्ही मला वस्त्रे दिली; मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली, तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही माझी भेट घेतली.’


परका होतो, तेव्हा तुम्ही मला घरात घेतले नाही; वस्त्रहीन होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले नाही; आजारी होतो, तुरुंगात होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली नाही.’


परमेश्वर पित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्दोष भक्ती हीच आहे की अनाथ व विधवांची त्यांच्या दुःखात काळजी घेणे आणि जगाच्या मलिनतेपासून स्वतःला अलिप्त राखणे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan