यिर्मया 23:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 माझा तिरस्कार करणार्या बंडखोरांना ते म्हणतात, ‘याहवेह म्हणतात: तुम्हाला शांतता लाभेल’ आणि जे स्वतःच्या मनाच्या हट्टीपणाने चालतात त्यांना ते म्हणतात, ‘तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.’ Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मला तुच्छ मानणार्यांना ते म्हणत राहतात की, ‘परमेश्वर बोलला आहे : तुम्हांला शांती प्राप्त होईल;’ आपल्या अंत:करणाच्या हट्टाप्रमाणे चालणार्या सर्वांस ते म्हणतात की, ‘तुमच्यावर काही अरिष्ट येणार नाही.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 माझा अपमान करणाऱ्यांना ते सतत बोलत राहतात की, परमेश्वराने तुम्हास शांती देऊ केली आहे, आणि प्रत्येकजण आपल्या हृदयाच्या हट्टीपणाच्या वाटेने चालतात आणि म्हणतात, तुमच्यावर कोणतीच आपत्ती येणार नाही. Faic an caibideil |
“पुत्र आपल्या पित्याचा आदर करतो, नोकर आपल्या धन्याचा आदर करतो. जर मी तुमचा पिता आहे, तर मला दिला जाणारा योग्य आदर कुठे आहे? मी जर धनी आहे, तर मला दिला जाणारा योग्य आदर कुठे आहे?” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. “ते तुम्ही याजक आहात, जे माझ्या नामाचा अनादर करतात. “पण तुम्ही विचारता, ‘आम्ही तुमच्या नामाचा अनादर कसा केला?’
आज येथे उभा असणारा तुमच्यातील कोणताही पुरुष किंवा स्त्री, कूळ किंवा गोत्राचे हृदय याहवेह तुमच्या परमेश्वराला सोडून इतर राष्ट्रांच्या दैवतांची उपासना करण्यासाठी त्यांच्याकडे वळणार नाही याबद्दल खबरदारी घ्या; हे कडू विषारी फळ आणि कडू दवणा देणार्या रोपट्याचे मूळ तुम्हामध्ये उगविणार नाही याबद्दल खबरदारी घ्या.