Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 23:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 “शोमरोनच्या संदेष्ट्यांमध्ये मी ही तिरस्करणीय गोष्ट बघितली: त्यांनी बआल दैवताच्या नावाने संदेश देऊन माझ्या इस्राएली लोकांना मार्गभ्रष्ट केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 शोमरोनातील संदेष्ट्यांच्या ठायी मी मूर्खपणा पाहिला आहे; त्यांनी बआलदैवतांच्या नावाने भाषणे करून माझे लोक इस्राएल ह्यांना बहकवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 “शोमरोनच्या संदेष्ट्यांनी चुकीच्या गोष्टी केल्याचे मी पाहिले. मी त्यांना बाल या खोट्या दैवताच्या नावाने भविष्य वर्तविताना पाहिले. आणि त्यांनी इस्राएलाच्या लोकांस चूकीच्या मार्गास नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 23:13
12 Iomraidhean Croise  

मग एलीयाहने त्यांना आज्ञा दिली, “बआलच्या संदेष्ट्यांना पकडा, कोणालाही जाऊ देऊ नका!” तेव्हा त्यांनी पकडले आणि एलीयाहने त्यांना खाली किशोन ओहळाकडे नेऊन त्यांचा वध केला.


परंतु मनश्शेहने यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांना मार्गभ्रष्ट केले, ज्यांचा इस्राएली लोकांसमोर याहवेहने नाश केला होता, त्या राष्ट्रांपेक्षा अधिक दुष्टपणा केला.


या लोकांना मार्गदर्शन करणारे त्यांची दिशाभूल करतात, आणि ज्यांना मार्गदर्शन मिळाले, ते पथभ्रष्ट झाले आहेत.


याजकांनी विचारले नाही, ‘याहवेह कुठे आहेत?’ नियमांचा अभ्यास करणाऱ्यांना माझी ओळख नव्हती; त्यांचे अधिपती तर माझ्याविरुद्ध बंड केले आहे. संदेष्टे बआल दैवताद्वारे संदेश देऊ लागले, आणि व्यर्थ मूर्तीचे अनुसरण करू लागले.


जे खोटी स्वप्ने सांगून भविष्यवाणी करतात, अशा संदेष्ट्यांच्या मी निश्चितच विरुद्ध उभा आहे, असे याहवेह जाहीर करतात. ते त्यांना वाचाळपणाने लबाडपणे सांगतात आणि माझ्या लोकांना पापाकडे नेतात. याहवेह म्हणतात, “मी त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना निवडले नाही. या लोकांच्या भल्यासाठी यांचा काहीही उपयोग नाही,” असे याहवेह जाहीर करतात.


“तू एक गुंडाळी घेऊन त्याच्यावर इस्राएल, यहूदीया व इतर राष्ट्रे यांच्याविषयी योशीयाहच्या काळापासून आतापर्यंत मी जे सर्व संदेश देत आलो आहे, ते लिही.


जुना द्राक्षारस आणि नवीन द्राक्षारस त्यांचा समंजसपणा दूर करतात.


माझे लोक लाकडी मूर्तींचा सल्ला घेतात आणि दैवप्रश्न करणाऱ्यांची काठी त्यांचे भविष्य सांगते. व्यभिचाराचा आत्मा त्यांना भरकटवितो; ते त्यांच्या परमेश्वराला विश्वासू राहिले नाहीत.


हे सर्व याकोबाच्या अपराधामुळे आणि इस्राएली लोकांच्या पापाचे परिणाम आहे. याकोबाचा अपराध काय आहे? ते शोमरोन आहे की नाही? यहूदीयाचे उच्च स्थान कोणते आहे? ते यरुशलेम नाही की नाही?


Lean sinn:

Sanasan


Sanasan