Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 23:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 सर्व देश व्यभिचाऱ्यांनी व्यापून टाकला आहे; कारण शाप त्यांच्यावर येऊन भूमी ओसाड झाली आहे. अरण्यातील हिरवीगार कुरणे वाळून गेली आहेत, कारण संदेष्टे दुष्कर्मे करतात आणि त्यांचे सामर्थ्य अयोग्य रीतीने वापरतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 कारण जारकर्म्यांनी देश व्यापला आहे; शापामुळे भूमी शोक करीत आहे; रानातील कुरणे वाळली आहेत; लोकांची गती वाईट आहे, त्यांचा पराक्रम म्हटला तर अधर्म;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 कारण व्यभिचाऱ्यांनी राष्ट्र भरला आहे, यास्तव राष्ट्र शोक करीत आहे. रानातील कुरणे वाळून गेली आहे. संदेष्ट्यांचे मार्ग दुष्ट आहेत, ते त्यांची शक्ती चुकीच्या पद्धतीने वापरतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 23:10
27 Iomraidhean Croise  

ज्यांनी गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केले होते, त्या याजकांची यादी पुढीलप्रमाणे आहे: योसादाकाचा पुत्र येशूआ व त्याचे भाऊबंद: मासेयाह, एलिएजर, यारीब व गदल्याह.


आणि दुष्टांना त्यांच्या पातकाबद्दल शासन करण्यासाठी, त्यांच्या चांगल्या भूमीचे ते क्षारभूमीत रूपांतर करतात.


म्हणून शाप पृथ्वीला भस्मसात करतो. तिच्या लोकांना त्यांच्या दोषाचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे पृथ्वीचे रहिवासी जळून गेले आहेत, आणि फारच थोडे उरले आहेत.


धिक्कार असो, जे कपटाच्या दोरीने पाप ओढवून घेतात, आणि दोरीने गाडी ओढल्यागत जे दुष्टता ओढवून घेतात.


माझ्यापुढे कोरडा व उद्ध्वस्त करून तो ओसाड केला जाईल, संपूर्ण भूमी वैराण करण्यात येईल, कारण तिची राखण करणारे कोणीही नसेल.


“यहूदीया विलाप करीत आहे, तिची नगरे झुरणीला लागली आहेत; ते या भूमीसाठी शोक करीत आहेत, आणि यरुशलेममधून आक्रोश वर जात आहेत.


“त्यांच्यातील लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण लोभी आहेत; संदेष्टे आणि याजक सर्व एकसारखेच, कपटी व्यवहार करतात.


“ ‘तुम्ही चोरी, वध, व्यभिचार, खोट्या शपथा घेतल्या, बआल दैवत व तुम्हाला माहीत नसलेली इतर दैवते यांचे अनुसरण करून,


मी डोंगराविषयी विलाप आणि आक्रोश करेन आणि तसेच रानातल्या निर्जन कुरणाबद्दल विलाप करेन. कारण सर्वकाही ओसाड पडलेले व प्रवास करण्यायोग्य नाहीत, गाईगुरांचे हंबरणे ऐकू येत नाही. पक्षीसुद्धा उडून गेले आहेत. आणि जनावरेही गेली आहेत.


हे सर्व समजण्याइतपत शहाणा कोण आहे? याहवेहने हे त्याला समजावून सांगितले व तो त्याचे स्पष्टीकरण करेल तो कुठे आहे? हा देश एवढा ओसाड व वाळवंटासारखा का झाला की यातून प्रवास करण्यासही कोणी धजत नाही?


बरे झाले असते, जर ओसाड रानात माझ्याकडे या यात्रेकरूंकरिता एखादे आश्रयस्थान असते. जेणेकरून मी माझ्या लोकांचा त्याग करून त्यांच्यापासून दूर गेलो असतो; कारण ते सर्वजण व्यभिचारी आहेत, विश्वासघातकी लोकांचा एक जमाव.


ते सर्वच व्यभिचारी आहेत; रोटी भाजणार्‍याच्या सतत पेटलेल्या भट्टीप्रमाणे ते आहेत. पीठ मळून ते फुगेपर्यंत तो विस्तव चाळविण्याचे थांबवितो.


शेतांची धूळधाण झाली आहेत, भूमी कोरडी पडली आहे; धान्याचा नाश झाला आहे, नवीन द्राक्षारस सुकला आहे, जैतून तेल समाप्त झाले आहे.


जर पाहिलेल्या किंवा माहीत झालेल्या गोष्टींबद्दल साक्ष देण्यासाठी सार्वजनिकरित्या केलेला आरोप जे ऐकतात पण काही बोलत नाहीत, तर ते पाप करतात, त्यांना जबाबदार धरले जाईल.


तिचे संदेष्टे अधर्म करणारे आहेत; ते विश्वासघातकी लोक आहेत. तिचे याजक मंदिर अपवित्र करतात ते आज्ञेचे उल्लंघन करतात.


“त्यावेळी मी येईन आणि तुमची पारख करून न्याय करेन. जादूटोणा करणारे, व्यभिचारी व खोटी साक्ष देणारे, आपल्या मजुरांना लुबाडणारे, विधवा व अनाथांवर जुलूम करणारे, परकियांना न्यायापासून वंचित करणारे, पण माझे भय न बाळगणारे, अशा सर्व दुष्ट लोकांविरुद्ध मी त्वरित कारवाई करेन,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.


जारकर्मी, समलैंगिक, दासांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी—आणि इतर जे काही शुद्ध शिक्षणाविरुद्ध आहे.


विवाह सर्वांना सन्मान्य असावा आणि वैवाहिक अंथरूण पवित्र राखावे, कारण व्यभिचार करणारे अथवा जारकर्म करणार्‍यांचा न्याय परमेश्वर स्वतः करेल.


व्यभिचारी लोकांनो, जगाशी मैत्री परमेश्वराबरोबर वैर आहे हे तुम्हाला समजत नाही काय? यास्तव, जो कोणी जगाचा मित्र होण्याचे पसंत करतो तो परमेश्वराचा शत्रू झाला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan