Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 22:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 ‘दावीदाच्या राजासनावर बसलेल्या हे यहूदीयाच्या राजा, याहवेहचा हा संदेश तुझ्यासाठी आहे—तू, तुझे अधिकारी आणि लोक जे या व्दारातून आत येतात या सर्वांसाठी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 असे म्हण : ‘दाविदाच्या सिंहासनावर बसणार्‍या यहूदाच्या राजा, तू, तुझे दास व ह्या वेशींनी येजा करणारे तुझे लोक असे तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 आणि तू असे म्हण, ‘यहूदाच्या राजा, जो तू दावीदाच्या सिंहासनावर बसतो, तो तू परमेश्वराचे वचन ऐक, आणि तू, तुझे चाकर आणि तुझे लोक जे या दारातून आत जातात, तेही ऐको.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 22:2
18 Iomraidhean Croise  

मिखायाह पुढे म्हणाला, “तर आता याहवेहचे वचन ऐका: याहवेह आपल्या सिंहासनावर बसलेले आणि स्वर्गातील सर्व समुदाय त्यांच्या सभोवती डावीकडे व उजवीकडे उभा असलेला मला दिसला.


अहो, सदोमाचे राज्यकर्ते, याहवेहचे शब्द ऐका; तुम्ही गमोराचे लोकहो, आमच्या परमेश्वराची सूचना ऐका!


म्हणून, जे यरुशलेमच्या लोकांवर राज्य करतात, त्या उपहास करणार्‍या अधिकार्‍यांनो, याहवेहचे वचन ऐका:


त्यांच्या सत्तेच्या महानतेचा आणि शांतीचा अंत होणार नाही. ते दावीदाच्या सिंहासनावरून राज्य करतील आणि त्याच्या राज्यावर राज्य करतील, ते त्या काळापासून आणि सर्वकाळपर्यंत न्याय आणि धार्मिकता स्थापन करतील आणि टिकवतील. सर्वसमर्थ याहवेहचा आवेश हे पूर्ण करेल.


राजाला व राजमातेला सांगा, “तुमच्या राजासनावरून खाली उतरा, कारण तुमचे वैभवी मुकुट तुमच्या मस्तकांवरून पडतील.”


आणि म्हण, अहो यहूदीयाच्या राजांनो, आणि यरुशलेमच्या लोकांनो, याहवेहचे वचन ऐका! सर्वसमर्थ याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: या स्थानावर मी असे भयंकर अरिष्ट आणेन की त्याविषयी जे ऐकतील त्यांचे कान भणभणतील.


याहवेह असे म्हणतात: “यहूदीयांच्या राजाच्या राजवाड्यात जा आणि या संदेशाची तिथे घोषणा कर:


जर तुम्ही या आज्ञेचे काळजीपूर्वक पालन केले, नंतर दावीदाच्या राजासनावर बसलेले राजे या महालाच्या व्दारातून रथ आणि घोड्यांवर स्वार होऊन, त्यांचे अधिकारी आणि लोक यांच्यासह प्रवेश करतील.


म्हणून यरुशलेम येथून बाबिलोन येथे मी पाठविलेल्या सर्व यहूदी बंदिवानांनो, आता याहवेहचे वचन ऐका.


“इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, याला जाऊन सांग की याहवेह म्हणतात, ‘मी हे नगर बाबेलच्या राजाच्या हातात देईन व तो ते जाळून टाकील.


म्हणून यहूदीयाचा राजा यहोयाकीमविषयी, याहवेह असे म्हणतात: दावीदाच्या राजासनावर बसण्यासाठी त्याला कोणीही वारस असणार नाही; त्याचे प्रेत बाहेर दिवसा उन्हामध्ये व रात्रीच्या हिवात पडून राहील.


“याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभा राहा आणि तिथे हा संदेश जाहीर कर: “ ‘यहूदीयातील सर्व लोक जे या प्रवेशद्वारातून याहवेहची उपासना करण्यासाठी आत येतात ते लोकहो, याहवेहचे हे वचन ऐका.


“ ‘म्हणून, तुम्ही मेंढपाळांनो, याहवेहचे वचन ऐका:


म्हणून आता तुम्ही याहवेहचे वचन ऐका, व तुम्ही म्हणतात, “ ‘इस्राएलविरुद्ध भविष्यवाणी करू नकोस, आणि इसहाकाच्या घराण्याविरुद्ध प्रचार करणे थांबव.’


ते परमथोर होतील आणि त्यांना परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू परमेश्वर त्यांना त्यांचा पूर्वज दावीदाचे सिंहासन देतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan