Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 22:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 त्याला मेलेल्या गाढवासारखी मूठमाती देण्यात येईल— त्याला सिंहासनावरून फरफटत आणून यरुशलेमच्या द्वाराबाहेर फेकतील!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 गाढवाच्या मूठमातीसारखी त्याची मूठमाती होईल; त्याचे शव यरुशलेमेच्या वेशींबाहेर ओढत नेऊन फेकून देतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 एखाद्या गाढवाला पुरावे तसे यरूशलेममधील लोक यहोयाकीमचे दफन करतील. ते त्याचा मृतदेह ओढत नेऊन यरूशलेमेच्या वेशीबाहेर फेकून देतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 22:19
13 Iomraidhean Croise  

“ ‘यामुळे यरोबोअमच्या घरावर मी अरिष्ट आणणार आहे. मी इस्राएलातून यरोबोअमच्या घराण्याचा प्रत्येक शेवटचा पुरुष नष्ट करेन; मग तो गुलाम असो वा मोकळा असो. यरोबोअमचे घराणे संपूर्णपणे नष्ट होईपर्यंत शेणाप्रमाणे जाळून टाकीन.


वयाच्या पंचविसाव्या वर्षी यहोयाकीम राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव जबूदाह होते; ती रुमाह येथील पदायाहची कन्या होती.


यहोयाकीम आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला. आणि त्याचा वारस त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला.


परंतु जेव्हा ते तिला मूठमाती देण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना तिची फक्त कवटी व हात आणि पायच सापडले.


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला बाबेलला घेऊन जाण्यासाठी त्याला कास्याच्या साखळदंडाने बांधले.


एखाद्या व्यक्तीला शंभर लेकरे असतील आणि तो दीर्घायुषी जगला; तरी तो आपल्या समृद्धीचा आनंद उपभोगू शकत नसेल आणि त्याला योग्य रीतीने मूठमाती मिळत नाही, तर मी असे म्हणतो की, त्याच्यापेक्षा मृत जन्मलेला गर्भ बरा.


“मी त्यांच्यावर चार प्रकारचे संहारक नेमणार आहे,” याहवेहने असे म्हटले, “ठार करण्यासाठी तलवार, फरपटून नेण्यासाठी कुत्री, खाऊन नष्ट करण्यासाठी पक्षी व हिंस्र श्वापदे.


म्हणून यहूदीयाचा राजा यहोयाकीमविषयी, याहवेह असे म्हणतात: दावीदाच्या राजासनावर बसण्यासाठी त्याला कोणीही वारस असणार नाही; त्याचे प्रेत बाहेर दिवसा उन्हामध्ये व रात्रीच्या हिवात पडून राहील.


म्हणून उपवासाच्या दिवशी तू याहवेहच्या मंदिरात जा आणि मी सांगून तू चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची वचने वाचून दाखव. त्या दिवशी यहूदीया प्रांताच्या नगरांतून आलेल्या सर्व लोकांना वाचून दाखव.


आणि ती हाडे चंद्र, सूर्य व तारे यांच्यापुढे पसरील. हीच माझ्या लोकांची दैवते आहेत. यांच्यावरच त्यांचे प्रेम होते, यांना ते अनुसरत होते, यांचा ते सल्ला घेत, यांचीच ते उपासना करीत असत. ही हाडे पुन्हा कोणी गोळा करणार नाहीत वा पुरणार नाहीत. जमिनीवर पडलेल्या शेणाप्रमाणे ती विखुरली जातील.


तेव्हा इतर राष्ट्र व सभोवतालचे प्रांत त्याच्याविरुद्ध आले, त्यांनी त्याच्यासाठी जाळे पसरले, आणि तो त्यांच्या खड्ड्यात अडकला.


तू मोकळ्या रानात पडशील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan