Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 22:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तो म्हणतो, ‘मी माझ्यासाठी एक भव्य राजवाडा बांधेन, ज्यामध्ये वरच्या मजल्यावर मोठमोठ्या खोल्या असतील.’ तो त्याला अनेक मोठ्या खिडक्या बांधतो, गंधसरूची तक्तपोशी करतो आणि सुंदर लाल रंगाने सजवितो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तो म्हणतो, ‘मी आपल्यासाठी विस्तीर्ण घर व लांबरुंद माड्या बांधीन.’ तो त्याला बहुत खिडक्या पाडतो; त्याने घरास गंधसरूची तक्तपोशी केली आहे, हिंगुळाचा रंग दिला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 जो कोणी असे म्हणतो, “मी माझ्यासाठी उंच असे घर आणि विस्तीर्ण माड्या बांधीन.” जो आपल्यासाठी मोठ्या खिडक्या असलेले घर बांधतो. तो तक्तपोशीसाठी गंधसरु वापरतो आणि तक्तपोशीला लाल रंग देतो. त्यास हाय हाय!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 22:14
13 Iomraidhean Croise  

राजाने नाथान संदेष्ट्याला म्हटले, “पाहा, मी येथे गंधसरूच्या भवनात राहतो आणि परमेश्वराचा कोश एका तंबूत आहे!”


मंदिराचा दिवाणखाना त्याने देवदारू लाकडाची तक्तपोशी करून ती सोन्याने मढविली व तिच्यावर खजुरीचे वृक्ष व साखळ्यांची नक्षीचे कोरीव काम केले होते.


जो कोणी कलहप्रिय असतो तो पापाची आवड धरतो; जो कोणी उंच प्रवेशद्वार बांधतो तो आपत्तींना आमंत्रण देतो.


तुझे बाहेरचे काम योग्यप्रकारे पूर्ण कर आणि तुझे शेत तयार कर; त्यानंतर, तुझे घर बांध.


आमच्या घराच्या तुळया केदारच्या; व छपर देवदारूच्या लाकडाचे आहे.


सर्व लोकांना ते माहीत होईल— एफ्राईम आणि शोमरोन येथील नागरिक— जे अभिमानाने आणि अंतःकरणाच्या उद्धटपणाने असे म्हणतात,


“परंतु तिने तिची वेश्यावृत्ती अजून पुढे नेली. भिंतीवर रेखाटलेल्या पुरुषांच्या प्रतिमा तिने पाहिल्या, जी लाल रंगाने रंगविलेली खास्द्यांची चित्रे होती,


मग राजा म्हणाला, “हे महान बाबेल नाही का, जे मी माझ्या प्रतापी सामर्थ्याने माझ्या वैभवाच्या गौरवासाठी शाही निवासस्थान म्हणून बांधले आहे?”


सार्वभौम याहवेहनी स्वतः शपथ घेतली आहे—याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर घोषणा करतात: “याकोबाच्या गर्वाचा मी तिरस्कार करतो आणि त्यांचे किल्ले मी घृणास्पद मानतो; मी या शहराला आणि तिच्यातील सर्वकाही शत्रूंच्या हाती देईन.”


“भवन उद्ध्वस्त अवस्थेत असताना, तुम्ही स्वतः नक्षीदार तावदाने असलेल्या घरात राहण्यासाठी ही वेळ योग्य आहे काय?”


एसावाचा वंशज, एदोमाने म्हटले, “जरी आम्ही चिरडले गेलो आहोत तरी देखील, भग्न झालेली स्थळे आम्ही पुन्हा बांधू.” परंतु सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “ते बांधतील, पण मी ते उद्ध्वस्त करेन, कारण त्या देशाचे नाव दुष्टाईचा देश आणि त्या लोकांवर नेहमीच याहवेहचा कोप राहील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan