Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 22:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 “धिक्कार असो, जो आपला महाल अधर्माने बांधतो, अन्यायाने माळे बांधतो, त्याच्या स्वतःच्या लोकांना बिनपगारी कामासाठी लावतो, आणि त्यांच्या परिश्रमाचा मोबदला त्यांना देत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 “जो आपले घर अधर्माने बांधतो, आपल्या माड्या अन्यायाने उभारतो, आपल्या शेजार्‍याकडून फुकट सेवा करून घेतो, त्याला वेतन देत नाही, तो हायहाय करणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 जो अनीतीने आपले घर बांधतो आणि आपली वरची माडी अन्यायने बांधतो, जो आपली सेवा मोल न देता करून घेतो, त्यास हाय हाय!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 22:13
16 Iomraidhean Croise  

इजिप्तच्या राजाने यहोआहाजचा भाऊ एल्याकीम याला यहूदीया आणि यरुशलेमचा राजा केले आणि एल्याकीमचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले. परंतु नखोने एल्याकीमचा भाऊ यहोआहाजाला घेऊन इजिप्तमध्ये नेले.


वयाच्या पंचवीसाव्या वर्षी यहोयाकीम राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये अकरा वर्षे राज्य केले. त्याने याहवेह त्याच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले.


मोल चुकते न करताच जर मी त्याचा उपज खाल्ला असेल किंवा भाडेकरूंचे मन मोडले असेल,


तुम्ही जे एका घरानंतर दुसरे घर बांधता, आणि जोपर्यंत जागा संपत नाही शेताला शेत जोडून घेतात, आणि मग त्या भूमीवर तुम्ही एकटेच राहता, त्यांना धिक्कार असो.


तित्तर पक्षी आपण न दिलेल्या अंडींना उबवितो अशाप्रकारे अन्यायाने संपत्ती मिळविणारे लोक असतात. अर्ध्या जीवनात त्यांची संपत्ती त्यांना सोडून जाते, आणि आयुष्याच्या अखेरीस ते एक मूर्ख ठरविले जातात.


म्हणून यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र यहोयाकीम याबद्दल याहवेह असे म्हणतात: “त्याच्यासाठी ते शोक करणार नाही: ‘हाय, माझ्या भाऊ आणि बहिणींनो!’ त्याच्यासाठी ते शोक करणार नाही: ‘अहो, माझ्या धन्या! अहो, त्याची थोरवी!’


“ ‘तुम्ही कोणाला फसवू नये किंवा तुमच्या शेजार्‍याला लुबाडू नये. “ ‘मजुरांची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नये.


सीयोनला रक्तपाताने आणि यरुशलेमला दुष्टपणाने बांधले आहे.


“धिक्कार असो, जो रक्तपात करून शहरे बांधतो आणि अन्यायाने नगर वसवितो!


“त्यावेळी मी येईन आणि तुमची पारख करून न्याय करेन. जादूटोणा करणारे, व्यभिचारी व खोटी साक्ष देणारे, आपल्या मजुरांना लुबाडणारे, विधवा व अनाथांवर जुलूम करणारे, परकियांना न्यायापासून वंचित करणारे, पण माझे भय न बाळगणारे, अशा सर्व दुष्ट लोकांविरुद्ध मी त्वरित कारवाई करेन,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.


आणि ज्यावेळी तुम्ही त्यांना मुक्त कराल, त्यावेळी त्यांना रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका.


पाहा! ज्या कामकर्‍यांनी तुमची शेते कापली, त्यांचे वेतन तुम्ही दिले नाही ते तुमच्याविरुद्ध आक्रोश करीत आहेत. कापणी करणार्‍यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानावर गेला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan