Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 21:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 हे यरुशलेमा, मी तुझ्याविरुद्ध आहे, तुम्ही जे या खोर्‍यावर राहता खडकाळ पठारावरील रहिवासी, याहवेह असे म्हणतात; तुम्ही म्हणता, “आमच्याविरुद्ध कोण येईल? आमच्या वस्ती मध्ये कोण प्रवेश करेल?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 “परमेश्वर म्हणतो, अगे खोर्‍यातील व पठारावरील रहिवासिनी, पाहा, जे तुम्ही म्हणता की, ‘आमच्यावर कोण चढाई करून येईल, आमच्या वस्तीत येण्याची कोणाची छाती आहे?’ त्या तुमच्याविरुद्ध मी उभा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 खोऱ्यात आणि सपाट जागेतील खडकात राहणाऱ्या, पाहा! परमेश्वर असे म्हणतो, मी तुझ्याविरूद्ध आहे. जे तुम्ही असे म्हणता, आमच्यावर कोण हल्ला करेल? कोणी आमच्या भक्कम नगरीत येणार?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 21:13
21 Iomraidhean Croise  

यरुशलेमला वेष्टण करणारे पर्वत जसे तिचे रक्षण करतात, तसेच आता आणि सदासर्वकाळ, याहवेह आपल्या लोकांना वेष्टून त्यांचे रक्षण करतात.


सुक्कोथ शहर सोडल्यावर त्यांनी वाळवंटाच्या सीमेवर एथाम येथे तळ दिला.


त्या दिवशी आपल्या लेकरांना सांगा, जेव्हा आम्ही इजिप्तमधून बाहेर आलो तेव्हा याहवेहने आमच्यासाठी जे केले, त्याचे चिन्ह म्हणून आम्ही हे करतो.


दृष्टान्ताच्या खोऱ्याविरुद्ध एक भविष्यवाणी: आता तुम्हाला काय त्रास होत आहे, ज्यामुळे तुम्ही सर्वजण छप्परावर गेलेले आहात?


या भूमीवर माझे उंच पर्वत आणि तुमची संपत्ती व सर्व भांडारे तुमच्या उच्च स्थळासहित, लूट म्हणून मी देईन, कारण संपूर्ण देशभर तुम्ही पाप केले आहे.


माझ्या अतिक्रोध व भयानक कोपामुळे माझा उगारलेला हात व शक्तिशाली भुजा घेऊन मी स्वतःच तुमच्याविरुद्ध लढणार आहे.


तुम्ही दहशतीस दिलेले प्रोत्साहन आणि तुमच्या अंतःकरणाच्या गर्विष्ठपणाने तुमची फसवणूक केली आहे, तुम्ही जे खडकांच्या कपारीत राहता, तुम्ही ज्यांनी डोंगरावरील उच्च स्थाने व्यापली आहेत. जरी तुम्ही तुमची घरटी गरुडांच्या घरट्यांप्रमाणे उंच बांधली आहेत, तरी तिथून मी तुला खाली आणेन. असे याहवेह जाहीर करतात.


“पाहा, अहो गर्विष्ठ लोकांनो, मीच तुमच्याविरुद्ध आहे आता तुमचा दिवस आला आहे, तुम्हाला शिक्षा देण्याचा समय आला आहे! प्रभू सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.


“हे संहारक पर्वता, तू जो संपूर्ण पृथ्वीचा विध्वंस करतो, मी तुझ्याविरुद्ध आहे,” याहवेह जाहीर करतात, “मी माझा हात तुझ्याविरुद्ध उगारेन, तुला कडेलोट करेन, आणि तुला भस्म झालेला डोंगर करेन.


तुमची फसवणूक करणाऱ्या शब्दांवर विश्वास ठेऊन असे म्हणू नका, “हे याहवेहचे मंदिर आहे, हे याहवेहचे मंदिर आहे, हे याहवेहचे मंदिर आहे!”


यरुशलेमच्या वेशीतून आत एखादा शत्रू वा विरोधी शिरू शकेल, यावर संपूर्ण पृथ्वीवरील राजांनी तसेच जगातील कोणत्याही लोकांनी विश्वास ठेवला नाही.


“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुमची खोटी वचने व लबाड दृष्टान्त यामुळे मी तुमच्याविरुद्ध आहे असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.


आणि इस्राएलाच्या भूमीला सांग: ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्याविरुद्ध आहे. माझ्या म्यानातून मी माझी तलवार उपसून नीतिमान आणि दुष्ट अशा दोघांनाही तुझ्यातून छेदून टाकेन.


सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी मेंढपाळांविरुद्ध आहे आणि माझ्या कळपाचा जाब त्यांच्यापासून घेईन. माझा कळप राखण्याचे काम मी त्यांच्यापासून काढून घेईन, म्हणजे मेंढपाळ पुन्हा स्वतःस पोसणार नाही. त्यांच्या तोंडातून मी माझ्या कळपाची सुटका करेन आणि यापुढे ते त्यांचा आहार होणार नाही.


“म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे यरुशलेमे, मी स्वतःच तुझ्याविरुद्ध आहे आणि मी सर्व राष्ट्रांसमक्ष तुला शासन करेन.


तिचे पुढारी लाच घेऊन न्याय करतात, तिचे याजक किंमत घेऊन शिकवितात, व तिचे संदेष्टे पैशासाठी भविष्य सांगतात. तरीही ते याहवेहच्या मदतीसाठी आसुसलेले असतात आणि म्हणतात, “याहवेह आपल्यामध्ये नाहीत काय? आमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.”


सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात: “मी तुझ्याविरुद्ध उठलो आहे, मी तुझे रथ भस्म करून त्यांचा धूर करेन, आणि तलवार तुझ्या सिंहाच्या बछड्यांना गिळंकृत करेल. मी पृथ्वीवर तुझ्यासाठी एकही भक्ष ठेवणार नाही. तुझ्या संदेशवाहकांचे आवाज यापुढे कधीही ऐकू येणार नाहीत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan