Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 20:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 आणि हे पशहूरा, तू स्वतः व तुझ्यासह तुझ्या घरात राहणारे सर्वजण बाबेलमध्ये बंदिवासात जाल. तू तिथेच मरशील व पुरला जाशील, तू व ज्यांच्याकडे तू खोटी भविष्यवाणी केलीस त्या तुझ्या सर्व मित्रगणाची गतही तशीच होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 हे पशहूरा, तू व तुझ्या घरात राहणारे ह्या सर्वांना धरून नेण्यात येईल; तू बाबेलास जाऊन तेथे मरशील; तुला व ज्यांना तू खोटा संदेश दिला, त्या तुझ्या सगळ्या इष्टमित्रांना तेथेच पुरतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 पण पशहूर तू आणि तुझ्या घरातील सर्व लोकांस कैद करून नेतील, आणि तू बाबेलास जाऊन मरशील, आणि तेथे तुला व तुझ्यावर प्रेम करणारे ज्यांना तू खोटे भविष्य सांगितले त्यांनाही पुरतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 20:6
25 Iomraidhean Croise  

वडीलजन आणि मान्यवर लोक हे मस्तक आहेत, खोटे शिक्षण देणारे संदेष्टे हे शेपूट आहेत.


परंतु मी म्हटले, “अरेरे, हे सार्वभौम याहवेह! त्यांचे संदेष्टे त्यांना सांगतात, ‘तलवार किंवा दुष्काळ निश्चितच येणार नाहीत. मी या ठिकाणी तुम्हाला खात्रीने स्थायी शांतता देईन.’ ”


आणि हे लबाड लोक ज्यांना संदेश देतात तेही तलवारीला व दुष्काळाला बळी पडून यरुशलेमच्या रस्त्यांवर फेकून दिले जातील आणि त्यांना, पत्नी, पुत्र व कन्यांना मूठमाती द्यायलाही कोणी राहणार नाही. कारण मी त्यांच्यावर घोर विपत्ती पाठविणार ज्याला ते पात्र आहेत.


जेव्हा याहवेहच्या मंदिराचा मुख्य अधिकारी इम्मेरचा पुत्र पशहूर याजक, याने यिर्मयाहास अशी भविष्यवाणी करताना ऐकले, तेव्हा


याहवेह असे म्हणतात: मी तुला स्वतःकरिता व तुझ्या मित्राकरिता दहशत असे करेन; ते सर्व शत्रूंच्या तलवारींनी बळी पडलेले तू आपल्या नजरेने पाहशील. मी संपूर्ण यहूदीया प्रांत बाबेलच्या राजाच्या स्वाधीन करेन, तो या लोकांना गुलाम करून बाबेलला नेईल किंवा त्यांना ठार मारेल.


जे खोटी स्वप्ने सांगून भविष्यवाणी करतात, अशा संदेष्ट्यांच्या मी निश्चितच विरुद्ध उभा आहे, असे याहवेह जाहीर करतात. ते त्यांना वाचाळपणाने लबाडपणे सांगतात आणि माझ्या लोकांना पापाकडे नेतात. याहवेह म्हणतात, “मी त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना निवडले नाही. या लोकांच्या भल्यासाठी यांचा काहीही उपयोग नाही,” असे याहवेह जाहीर करतात.


याहवेह असे म्हणतात: मी नेहेलामी शमायाहला व त्याच्या वंशजांना निश्चितच शिक्षा करेन. त्याच्या लोकांपैकी कोणीही हयात राहणार नाही, माझ्या लोकांचे जे अभीष्ट मी करणार आहे, ते तो बघू शकणार नाही, असे याहवेह जाहीर करतात, कारण माझ्याविरुद्ध बंडखोरी करण्याचा त्याने संदेश दिला आहे.’ ”


संदेष्टे खोटी भविष्यवाणी करतात, याजक स्वतःचेच अधिकार चालवितात, आणि माझ्या लोकांना ते आवडते. पण शेवटी तुम्ही काय करणार आहात?


तुझ्या संदेष्ट्यांनी सांगितलेले दृष्टान्त खोटे व व्यर्थ होते; तुला बंदिवासात पडण्यापासून वाचविण्याकरिता तुझी पापे उघडकीस आणली नाहीत. त्यांनी तुला दिलेले संदेश खोटे व दिशाभूल करणारे होते.


त्यांचे संदेष्टे खोटे दर्शन व लबाड शकुनाद्वारे या सर्व कृत्यांवर चुन्याचा लेप फासतात आणि याहवेह बोलले नाही तरी ते म्हणतात, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’


मी तुम्हापासून आपले मुख फिरवेन आणि तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव होईल. ज्यांचा तुम्ही द्वेष करता तेच तुमच्यावर सत्ता गाजवतील आणि कोणी पाठलाग करीत नसतानाही तुम्ही पळाल.


जर एखादा लबाड आणि फसवणूक करणारा येऊन म्हणाला, ‘मी तुम्हाला भरपूर द्राक्षारस व मद्याची भविष्यवाणी करेन,’ तर अशीच व्यक्ती या लोकांसाठी योग्य संदेष्टा होईल!


“आणि जर कोणी पुन्हा खोटे भविष्यकथन करू लागला, ज्यांनी त्याला जन्म दिला ते त्याचे खुद्द आईवडीलच त्याला सांगतील, ‘तू मेलाच पाहिजे, कारण तू याहवेहच्या नावाने खोटे बोलत आहेस.’ ते भविष्यकथन करणाऱ्यास भोसकून जिवे मारतील!


तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव व्हावा, असे याहवेह करतील. तुम्ही त्यांच्यावर एका दिशेने चाल करून जाल, पण सात दिशांनी गोंधळून पळ काढाल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांकरिता तुम्ही भयानक विनाशाचे उदाहरण व्हाल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan