Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 20:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 मी कित्येकांना कुजबुजतांना ऐकले आहे, “सर्व बाजूंनी दहशत! त्याला दोषी ठरवा! चला, त्याला दोषी ठरवू या!” माझे सर्व मित्रगण माझ्या हातून एखादी चूक होण्याची वाट पाहत आहेत. ते म्हणतात, “कदाचित त्याची फसवणूक होईल; मग आपण त्याच्यावर वर्चस्व करू आणि आपला सूड उगवू.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 कारण मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो; चोहोकडे दहशत आहे. मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की त्याच्याविरुद्ध गिल्ला करा, आपण त्याच्याविरुद्ध गिल्ला करू; कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मी बऱ्याच लोकांकडून दहशतवादी अफवा ऐकल्या आहेत. तक्रार, आम्ही तक्रार करणे आवश्यक आहे माझ्या जवळ असणारा प्रत्येकजन, मला पाडण्यास टपला आहे, कदाचित त्यास फसवले जाऊ शकते. तेव्हा आपण त्यास पराभूत करु आणि त्याचा सूड घेऊ.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 20:10
35 Iomraidhean Croise  

तेव्हा ईजबेलने एलीयाहकडे असे म्हणत एक दूत पाठवला, “उद्या या वेळेपर्यंत मी त्यांच्यातील एकाप्रमाणे तुझ्या जिवाचे केले नाही तर देव माझे त्याहूनही अधिक वाईट करो.”


अहाब एलीयाहला म्हणाला, “हे माझ्या वैर्‍या, शेवटी तू मला शोधलेच!” तो म्हणाला, “मी तुला शोधलेच, कारण याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करण्यास तू स्वतःस विकून टाकले आहेस.


आणि त्यांना सांगा, ‘राजा असे म्हणतात: या मनुष्याला तुरुंगात टाका आणि मी सुखरुप परत येईपर्यंत त्याला केवळ भाकर आणि पाणी द्या.’ ”


इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “ज्याच्याद्वारे आपण याहवेहचा सल्ला घेऊ शकतो असा एक संदेष्टा अजूनही आहे, परंतु तो माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही, नेहमीच वाईट संदेश देतो, म्हणून मला त्याचा तिरस्कार वाटतो. तो इम्लाहचा पुत्र मिखायाह आहे.” यहोशाफाटने उत्तर दिले, “राजाने असे बोलू नये.”


माझ्या जिवलग मित्रांनादेखील माझा वीट येतो; ज्यांच्यावर मी प्रीती केली, तेही माझ्यावर उलटले.


कारण अनेकांना कुजबुजतांना मी ऐकले आहे. “सर्व बाजूने दहशत आहे!” ते माझ्याविरुद्ध कट रचीत आहे आणि माझा जीव घेण्यासाठी ते तयार आहेत.


परंतु याहवेह, माझा भरवसा तुमच्यावर आहे. मी म्हणालो, “तुम्हीच माझे परमेश्वर आहात.”


परंतु याहवेह, मजवर कृपा करून मला पुन्हा उठवा; म्हणजे मला त्यांचा सूड घेता येईल.


प्रत्यक्ष माझा जिवलग मित्रदेखील, ज्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता, ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला आहे.


सिंहांनी मला घेरले आहे; ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत, ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवार आहे अशा हिंसक स्वभावाच्या मनुष्यांमध्ये मी पडलो आहे.


जो लबाडीच्या ओठांनी आपला द्वेष गुप्त ठेवितो, आणि चहाडी करीत फिरतो, तो मूर्ख होय.


जे इतरांना त्यांच्या शब्दाद्वारे दोषी ठरवितात, जे रक्षकाला सापळ्यात अडकवितात, जे खोटी साक्ष देऊन निष्पाप लोकांना न्यायापासून वंचित करतात.


ते तुझ्याशी युद्ध करतील, परंतु तुझ्यावर विजयी होणार नाही, कारण मी तुझ्यासह आहे आणि तुझा बचाव करेन,” असे याहवेह म्हणतात.


कत्तलखान्याकडे चालविलेल्या अज्ञान कोकरासारखा मी भोळाभाबडा होतो; मलाच ठार मारण्याचा त्यांचा बेत होता याची मला जाणीवही नव्हती, ते म्हणाले, “झाडाचा त्याच्या फळांसहित नाश करू या; याला जिवंताच्या भूमीवरून नाहीसे करू या, म्हणजे याची नावनिशाणीही राहणार नाही.”


म्हणून अनाथोथच्या लोकांविषयी, जे माझा जीव घेण्याची धमकी देतात, ते म्हणतात “याहवेहच्या नावाने भविष्यवाणी करू नको, नाहीतर आमच्या हातून तुझा जीव जाईल;”


त्यांनी म्हटले, “चला, उठा, यिर्मयाह विरुद्ध काहीतरी कारस्थान करू; आम्हाला नियम शिकविण्यास आमचे याजक, बोध देण्यासाठी आमचे ज्ञानी लोक, आणि संदेश देण्यासाठी आमचे संदेष्टेही नष्ट होणार नाहीत. म्हणून चला, आपण त्याच्यावर वाक्बाणाचा हल्ला करू आणि तो काय बोलतो याच्याकडे लक्ष देऊ नये.”


पशहूरने जेव्हा दुसर्‍या दिवशी यिर्मयाहाला खोड्यातून मोकळे केले, तेव्हा यिर्मयाह त्याला म्हणाला, “याहवेहने तुझे पशहूर नाव बदलून, येथून पुढे सर्व बाजूने दहशत असे ठेवले आहे.


परंतु तो बिन्यामीन वेशीतून बाहेर जात असता, हनन्याहचा नातू, शेलेम्याहचा पुत्र इरीयाह या पहारेकर्‍याच्या प्रमुखाने त्याला पकडले व यिर्मयाह संदेष्ट्याला म्हणाला, “तू बाबेलच्या सैन्यास फितूर झाला आहेस!”


शेतातून बाहेर जाऊ नका, किंवा रस्त्यांवरून प्रवास करू नका, कारण शत्रूकडे तलवार आहे, आणि प्रत्येक बाजूला आतंक पसरलेला आहे.


तुझ्यात निंदक राहतात, ज्यांचा कल रक्तपाताकडे आहे; तुझ्यात असे लोक आहेत जे डोंगरावरील पूजास्थानात प्रसाद खातात आणि अश्लील कृत्ये करतात.


यामुळे अध्यक्ष आणि प्रांताधिकारी दानीएलविरुद्ध राज्य कारभारातील दोष शोधण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना त्याच्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार आढळला नाही, कारण तो विश्वासू होता आणि तो भ्रष्ट नव्हता किंवा निष्काळजीपणाही करीत नव्हता.


त्यांच्यावर बारकाईने पाळत ठेऊन, त्यांनी गुप्तहेरांना प्रामाणिक माणसे आहेत असे ढोंग करून त्यांच्याकडे पाठविले यासाठी की येशूंना त्यांच्या शब्दात पकडावे आणि त्यांना राज्यपालाच्या अधिकारकक्षेत आणावे.


त्यांनी जे आरोप मजवर केले आहेत ते तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकत नाहीत.


हे ऐकल्यावर ते अतिशय संतापले व त्यांना मारून टाकण्याचे त्यांनी ठरविले.


सभागृहातील यहूदी पुढार्‍यांनी हे ऐकले तेव्हा ते भयंकर संतापले आणि त्याच्यावर दात खाऊ लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan