Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मी तुम्हाला एका सुपीक भूमीवर घेऊन आलो, तिची उपज आणि तिचे उत्तमोत्तम पदार्थ खाण्यासाठी आणले. परंतु तुम्ही ती भूमी अशुद्ध केली आणि माझे वतन अमंगळ केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मी तुम्हांला सुपीक भूमीवर तिचा उपज खाण्यासाठी व तिची संपत्ती भोगण्यासाठी आणले, पण तुम्ही येऊन माझा देश विटाळला, माझे वतन तुम्ही अमंगळ केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पण मी तुम्हास कर्मेलाच्या भूमीत आणले ह्यासाठी की तुम्ही तिचे फळ आणि इतर चांगल्या गोष्टीं खाव्या. तरीही तुम्ही माझी ही भूमी विटाळवीली, तुम्ही माझा वारसा घृणास्पद केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:7
28 Iomraidhean Croise  

त्यांनी तटबंदीची शहरे आणि सुपीक जमिनी काबीज केल्या; सर्व चांगल्या वस्तूंनी भरलेली घरे, खोदलेल्या विहिरी, द्राक्षमळे, जैतुनाचे मळे व विपुल फळझाडे हस्तगत केली. मग ते खाऊन तृप्त व उत्तमरित्या पोषित झाले; आणि तुमच्या महान चांगुलपणाचा त्यांनी आनंद साजरा केला.


“पण त्यांनी आज्ञाभंग केला आणि तुमच्याविरुद्ध बंड केले; त्यांनी तुमच्या नियमांकडे पाठ फिरविली. लोकांनी तुमच्याकडे परत यावे असे त्यांना सांगणार्‍या संदेष्ट्यांना ठार मारले आणि इतर अनेक तऱ्हेने महाभयंकर ईशनिंदा केली.


सर्वसमर्थ याहवेह त्यांना आशीर्वाद देतील आणि म्हणतील, “इजिप्तमधील माझे लोक आशीर्वादित असावेत, अश्शूर माझी हस्तकला आणि इस्राएल माझे वतन असो!”


त्यांच्या दुष्टतेबद्दल व पापांबद्दल मी त्यांना दुप्पट शासन करणार आहे, कारण त्यांनी त्यांच्या निर्जीव आकाराच्या निरुपयोगी प्रतिकृतींनी माझा देश भ्रष्ट केला आहे आणि माझे वतन त्यांच्या घृणास्पद मूर्तींनी भरून टाकला आहे.”


“जर एखाद्या पुरुषाने आपल्या स्त्रीला घटस्फोट दिला आणि त्या स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले, तर तिच्या पहिल्या पतीकडे तिच्याकडे परत जावे काय? असे करण्याने ही भूमी पूर्णपणे भ्रष्ट होणार नाही काय? परंतु तू एका वेश्येप्रमाणे अनेक प्रियकरांसह राहिलीस— तू माझ्याकडे आता परत येणार का?” असे याहवेह म्हणतात.


“उजाड टेकडीकडे आपली दृष्टी कर व पाहा. असे कोणते स्थान आहे जिथे तुझ्यासह कुकर्म केले गेले नाही? रस्त्याच्या कडेला तू आपल्या प्रियकरांची वाट बघतेस, एखाद्या अरबीचे जीवन जगणाऱ्या व्यक्तीसारखी बसून राहतेस. आपल्या कुकर्माने व जारकर्माने तू सर्व भूमी दूषित केली आहेस.


कारण इस्राएलच्या दृष्टीत हा व्यभिचार अल्पमात्र होता, तिने सर्व भूमीला भ्रष्ट केले आहे आणि लाकडांच्या व दगडांच्या मूर्तींशी व्यभिचार केला आहे.


ते इथे आले व त्यांनी या देशाचा ताबा घेतला, परंतु तुमचे आज्ञापालन करण्याचे व तुमचे नियम अनुसरण्याचे त्यांनी नाकारले; म्हणूनच तुम्ही त्यांच्यावर हे सर्व अरिष्ट आणले आहे.


“त्यांच्या तारुण्यापासून इस्राएलने व यहूदीयाने माझ्या नजरेत दुष्कर्म करण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही; खरोखर, स्वतःच्या हस्तकृतींची उपासना करून माझा क्रोध भडकविण्याशिवाय त्यांनी दुसरे काहीही केले नाही, असे याहवेह जाहीर करतात.


कारण त्यांनी माझे नियम पाळले नाहीत, तर माझ्या विधींचा धिक्कार केला व माझे शब्बाथ विटाळले आणि त्यांच्या डोळ्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या मूर्तींची वासना बाळगली.


जो देश मी त्यांना शपथ वाहून देऊ केला होता, त्यात जेव्हा मी त्यांना आणले आणि त्यांनी एखादे उंच डोंगर किंवा दाट पानांनी भरलेले झाड पाहिले, तिथे त्यांनी यज्ञ केले, माझा राग पेटेल अशी अर्पणे त्यांनी केली, त्यांचे सुवासिक धूप सादर करीत त्यांची पेयार्पणे ओतली.


त्या दिवशी मी त्यांच्याशी शपथ वाहिली की मी त्यांना इजिप्तमधून जो देश मी त्यांच्यासाठी शोधला आहे, जिथे दूध व मध वाहते अशा देशात मी त्यांना आणेन, जो सर्व देशांपेक्षा अति सुंदर आहे.


“म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तू मला विसरलीस व माझ्याकडे पाठ फिरवलीस, म्हणून त्याचा परिणाम तू भोगलाच पाहिजे, तू तुझ्या अश्लीलतेचे व वेश्यावृत्तीचे प्रतिफळ भोगलेच पाहिजे.”


“मानवपुत्रा, इस्राएली लोक जेव्हा स्वदेशात राहत होते, तेव्हा त्यांनी तो त्यांच्या वर्तनाने व कृत्यांनी भ्रष्ट केला. त्यांची कृत्ये माझ्या दृष्टीत स्त्रियांच्या महिन्याच्या अशुद्धतेप्रमाणे होती.


याहवेहच्या देशात ते राहणार नाहीत; एफ्राईम इजिप्त देशात परत जाईल आणि अश्शूर येथे अशुद्ध भोजन खाईल.


उठा, चालते व्हा! कारण हे तुमचे विश्रांतिस्थान नाही, कारण हे अशुद्ध झाले आहे, सर्व उपायांच्या पलीकडे, ते उद्ध्वस्त झाले आहे.


त्यांनी मोशेला अहवाल दिला तो असा: “जो देश हेरण्यास तुम्ही आम्हाला पाठविले तिथे आम्ही गेलो, त्यात खरोखरच दूध व मध वाहतात! ही पाहा तेथील फळे.


तर त्याचा मृतदेह रात्रभर तिथे ठेवू नये, तर त्याच दिवशी त्याचे दफन करावे; कारण जो कोणी खांबावर टांगलेला असेल, त्याच्यावर परमेश्वराचा शाप असतो. म्हणून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जो देश वतन म्हणून देत आहे, तो तुम्ही भ्रष्ट करू नये.


कारण याहवेहची प्रजाच त्यांची संपत्ती होती, याकोब हे त्यांचे वैयक्तिक वतन आहे.


याहवेहच्या दृष्टीने जे योग्य व चांगले आहे तेच करा, तर तुमचे सर्व बाबतीत कल्याण होईल आणि याहवेहने तुमच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात तुम्ही जाल व तो देश तुम्ही ताब्यात घ्याल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan