Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 “मी तुमच्या लोकांना उगाच शिक्षा केली; त्यांनी सुधारणेचा स्वीकार केला नाही. तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांचा नाश केला जणू एखादा खवखवलेला सिंहच.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 तुमच्या पुत्रांना मी ताडन केले ते व्यर्थ, त्याने ते शुद्धीवर आले नाहीत; फाडणार्‍या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांना खाऊन टाकले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 “तुझ्या लोकांस मी शिक्षा केली ती व्यर्थ झाली आहे. त्यांनी शिस्त स्विकारली नाही, नाश करणाऱ्या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या भविष्यावाद्यांना खाऊन टाकले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:30
30 Iomraidhean Croise  

एलीयाह म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह परमेश्वरासाठी मी फार ईर्ष्यावान आहे. इस्राएली लोकांनी आपला करार नाकारला आहे, आपल्या वेद्या फोडल्या आहेत आणि आपल्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकले आहे. मी एकटाच उरलो आहे आणि आता ते मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.”


एलीयाह म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह परमेश्वरासाठी मी फार ईर्ष्यावान आहे. इस्राएली लोकांनी आपला करार नाकारला आहे, आपल्या वेद्या फोडल्या आहेत आणि आपल्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकले आहे. मी एकटाच उरलो आहे आणि आता ते मलाही मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.”


परंतु त्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि राजाच्या हुकुमावरून याहवेह यांच्या मंदिराच्या अंगणात त्याला दगडमार करून ठार मारले.


त्याच्या संकटकाळात राजा आहाज याहवेहबरोबर आणखीच अविश्वासू झाला.


परंतु त्यांनी तिथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईपर्यंत परमेश्वराच्या संदेष्ट्यांची चेष्टा केली, याहवेहचा राग त्यांच्या लोकांविरुद्ध चेतवेपर्यंत त्यांच्या शब्दांचा तिरस्कार केला आणि त्यांच्या संदेष्ट्यांची थट्टा केली.


“पण त्यांनी आज्ञाभंग केला आणि तुमच्याविरुद्ध बंड केले; त्यांनी तुमच्या नियमांकडे पाठ फिरविली. लोकांनी तुमच्याकडे परत यावे असे त्यांना सांगणार्‍या संदेष्ट्यांना ठार मारले आणि इतर अनेक तऱ्हेने महाभयंकर ईशनिंदा केली.


तुम्हाला आणखी मार का दिला जावा? तुम्ही विद्रोह का करीत राहावे? तुमच्या संपूर्ण डोक्याला दुखापत झाली आहे, तुमचे संपूर्ण अंतःकरण ग्रस्त झाले आहे.


कारण तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत, तुमची बोटे दोषीपणाने बरबटलेली आहेत. तुमच्या ओठांनी असत्य बोललेले आहे, आणि तुमची जीभ दुष्टतेच्या गोष्टी पुटपुटते.


परंतु ज्या लोकांनी त्यांना वधले, त्यांच्याकडे ते परत आले नाहीत, आणि त्यांनी सर्वसमर्थ याहवेहचा शोधही घेतला नाही.


“मी एफ्राईमचे आक्रंदन निश्चितच ऐकले: ‘तुम्ही मला अनावर वासराला लावावी तशी शिस्त लावली आहे, आणि मी ही शिस्त ग्रहण केली आहे. मला पुन्हा माझ्या पूर्वस्थितीत आणा, म्हणजे मी पूर्ववत होईन, कारण तुम्ही याहवेह, माझे परमेश्वर आहात.


“इजिप्तमध्ये घोषणा करा, मिग्दोलमध्ये जाहीर करा; मेम्फीस व तहपनहेस या शहरांमध्येही जाहीर करा! ‘चला, सिद्ध व्हा, व मोर्चा बांधा, कारण तुमच्या सभोवतालच्यांना तलवार गिळंकृत करीत आहे.’


हे याहवेह, तुमची दृष्टी सत्याला शोधत नाही का? तुम्ही त्यांना शिक्षा केली, पण त्यांना मुळीच वेदना झाली नाही. तुम्ही त्यांना चिरडून टाकले, पण ते आपल्या पापांपासून मागे वळण्याचे नाकारतात. आपली मुखे त्यांनी खडकासारखी कठीण केली व पश्चात्ताप न करण्याचे त्यांनी ठरविले.


म्हणून त्यांना तू हे सांग, ‘आपल्या याहवेह परमेश्वराच्या आज्ञा झिडकारणारे व सुधारणा करण्यास तयार नसणारे असे हे राष्ट्र आहे. सत्यता नष्ट झाली आहे; त्यांच्या ओठातून ती नाहीशी झाली आहे.


तेथील संदेष्ट्यांनी केलेली पापे आणि निर्दोष व्यक्तींचे रक्त या नगरीत सांडून याजकांनी केलेला अधर्मामुळे तसे घडले.


“मानवपुत्रा, या देशाला सांग, ‘तुम्ही असा एक देश आहात जो कोपाच्या दिवशी ना शुद्ध केला गेला ना ज्यावर पाऊस पडला.’


“ ‘आता तुझी अशुद्धता तर दुराचार आहे. कारण तुला शुद्ध करण्याचा मी प्रयत्न केला, परंतु तू तुझ्या अशुद्धतेपासून शुद्ध झाली नाहीस, आता तुझ्याविरुद्ध माझा कोप शांत होईपर्यंत तू शुद्ध होणार नाहीस.


मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आमच्याविरुद्ध लिहून ठेवलेली सर्व संकटे आमच्यावर आली आहेत, तरीही आमच्या अपराधांपासून वळून आणि तुमच्या सत्याकडे लक्ष लावण्यास आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराला विनंती केली नाही.


ती कोणाचीही आज्ञा पाळत नाही, ती कोणतीही सुधारणा स्वीकारत नाही. ती याहवेहवर विश्वास ठेवीत नाही, ती तिच्या परमेश्वराच्या समीप जात नाही.


“अहो परूश्यांनो आणि नियमशास्त्र शिक्षकांनो, अहो ढोंग्यांनो, तुमचा धिक्कार असो. तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि नीतिमानांच्या कबरा सजविता


तुमच्या पूर्वजांनी ज्याचा छळ केला नाही, असा एक तरी संदेष्टा आहे का? जो नीतिमान आहे व त्यांच्या आगमनाचे भविष्य वर्तविणार्‍यांना देखील तुम्ही जिवे मारले आणि आता तुम्ही त्यांचा विश्वासघात करून त्यांनाच जिवे मारले


त्यांनी प्रभू येशूंना आणि संदेष्ट्यांना ठार मारले; आणि आम्हालाही हाकलून लावले. त्यांनी परमेश्वराला नाखुश केले आणि सर्वांचे विरोधी झाले,


माणसे तीव्र उष्णतेने करपून गेली, तेव्हा या पीडांवर ज्यांचे नियंत्रण आहे त्या परमेश्वराच्या नावाला शाप दिला, परंतु त्यांनी पश्चात्ताप केला नाही आणि परमेश्वराचे गौरव केले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan