Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 कोणत्याही राष्ट्रांनी आपले दैवत बदलले आहे काय? (जरी ते सर्व देव नाहीतच.) परंतु माझ्या लोकांनी आपल्या गौरवी परमेश्वराची व्यर्थ मूर्तींशी अदलाबदल केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 जे देवच नाहीत असले देव तरी कोणा राष्ट्राने बदलले काय? तरीपण माझ्या लोकांनी आपल्या वैभवाचा मोबदला, जिच्यात हित नाही अशा गोष्टीशी केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 काय राष्ट्रांनी देवांची अदलाबदली केली, जरी ते देव नसले तरी? पण माझ्या लोकांनी जे काही मदत करू शकत नाही त्याच्याशी आपल्या वैभवाची अदलाबदली केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:11
23 Iomraidhean Croise  

मी असे केले आहे कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि सीदोन्यांची देवी अष्टारोथ, मोआबाचे दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे दैवत मिलकाम यांची उपासना केली आणि ते माझ्या आज्ञेनुसार चालले नाहीत किंवा माझ्या दृष्टीने जे बरे ते केले नाही किंवा शलोमोनचा पिता दावीदाने केले तसे माझे विधी व नियम त्यांनी पाळले नाहीत.


परंतु याहवेहच्या दूताने तिश्बी एलीयाहला निरोप देऊन म्हटले, “वर जा आणि शोमरोनाच्या राज्याच्या दूतांना भेट आणि त्यांना विचार, ‘इस्राएलमध्ये परमेश्वर नाही की काय, म्हणून तुम्ही एक्रोनचे दैवत बाल-जबूब याला विचारावयास निघाले आहात?’


तुम्ही याहवेहचे याजक अहरोनाचे पुत्र आणि लेवी यांना हाकलून दिले आणि स्वतःचे याजक तयार केले, जसे इतर देशातील लोक करत नाहीत का? जो कोणी एक तरुण बैल आणि सात मेंढे घेऊन स्वतःला पवित्र करण्यासाठी येतो, तो जी दैवते नाहीत अशांचा पुजारी होऊ शकतो.


परमेश्वराच्या गौरवाची अदलाबदल गवत खाणार्‍या बैलाच्या प्रतिमेशी केली.


पण त्या तर मानवी हातांनी बनविलेल्या चांदीच्या व सोन्याच्या मूर्ती आहेत.


परंतु याहवेह, तुम्ही माझ्या सभोवती ढाल आहात. माझे गौरव आणि माझी मान उंचाविणारे तुम्हीच आहात.


आणि त्यांनी त्यांची दैवते अग्नीत फेकून दिली आहेत, कारण त्या मूर्ती परमेश्वर नव्हत्या. ते तर मनुष्याने घडविलेले लाकूड आणि दगड होते.


लोक स्वतःसाठी दैवते निर्माण करतात काय? होय, परंतु ते देव नाहीत!”


म्हणून याहवेह असे म्हणतात: “आता राष्ट्रांमध्ये जाऊन चौकशी करा: असा प्रकार कोणी कधी ऐकला आहे काय? इस्राएलाच्या कुमारिकेने एवढे भयंकर कर्म केले आहे.


याहवेह असे म्हणतात: “तुमच्या पूर्वजांना माझ्याठायी असा कोणता अन्याय दिसला की ते माझ्यापासून इतके दूर गेले? आणि ते व्यर्थ मूर्तींना अनुसरू लागले, आणि स्वतःही तसेच निरुपयोगी बनले?


याजकांनी विचारले नाही, ‘याहवेह कुठे आहेत?’ नियमांचा अभ्यास करणाऱ्यांना माझी ओळख नव्हती; त्यांचे अधिपती तर माझ्याविरुद्ध बंड केले आहे. संदेष्टे बआल दैवताद्वारे संदेश देऊ लागले, आणि व्यर्थ मूर्तीचे अनुसरण करू लागले.


“मी तुम्हाला का क्षमा करू? तुमच्या मुलांनी माझा त्याग केला आहे आणि जे देव नाहीत त्यांची ते शपथ घेऊ लागले आहेत. मी त्यांच्या सर्व गरजांचा पुरवठा केला, तरी त्यांनी व्यभिचार केला वेश्यागृहात गर्दी केली.


आपल्या मूर्तींसाठी ज्यांनी मला सोडले आहे, त्या इस्राएल लोकांची मने पुन्हा फिरावी म्हणून मी असे करेन.’


“यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही आपल्या सभोवती असलेल्या राष्ट्रांपेक्षा अधिक मोकाट झाला आहात आणि तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळले नाही. तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांप्रमाणे देखील तुम्ही वागला नाहीत.


सर्व राष्ट्रे आपआपल्या दैवतांच्या नावाने चालतील, पण आम्ही नेहमी याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावाने चालत राहू.


आणि मग त्यांनी अविनाशी परमेश्वराच्या गौरवाची अदलाबदल करून, स्वतःसाठी नश्वर मानव, पक्षी, पशू, सरपटणारे प्राणी यांच्या मूर्ती बनविल्या.


तर आता, मूर्तीना अर्पण केलेले अन्न यासंबंधी आपल्याला माहीत आहे, “या जगातील मूर्तीमध्ये परमेश्वराचे अस्तित्व नाही” आणि “एका परमेश्वराशिवाय दुसरा परमेश्वर नाही.”


तुम्हाला परमेश्वराची ओळख होण्यापूर्वी, तुम्ही सुद्धा, जे वास्तविक परमेश्वर नाहीत, त्यांचे दास होता.


त्यांनी परदेशी दैवतांच्या नादी लागून याहवेहला ईर्षेस पेटविले आणि घृणित मूर्तींमुळे अतिशय संतप्त केले.


जे देव नाहीत त्याद्वारे त्यांनी मला ईर्षेस पेटविले आहे आणि त्यांच्या तुच्छ मूर्तींनी मला संताप आणला आहे. जे लोक नाहीत त्यांच्याद्वारे मी त्यांना ईर्षेस आणेन; ज्या राष्ट्राला समज नाही त्याद्वारे मी त्यांना क्रोधास आणेन;


इस्राएला, तू आशीर्वादित आहेस! इतर कोणत्या लोकांना याहवेहने वाचविले आहे काय? तेच तुझी ढाल व तुझे साहाय्य आहेत आणि तुझ्या वैभवाची तलवार आहेत. तुझे शत्रू तुझ्यापुढे थरथर कापतील, आणि तू त्यांची उच्च स्थाने पायाखाली तुडवशील!”


तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांपासून परंपरेने चालत आलेल्या निरर्थक वागणुकीपासून चांदी किंवा सोने अशा नाशवंत वस्तूंनी तुमची सुटका केली नाही,


त्या मुलाचे नाव ईखाबोद असे ठेवत ती म्हणाली, “इस्राएलचे वैभव निघून गेले आहे,” कारण परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे आणि तिच्या सासर्‍याचा आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan