Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 समुद्राचा किनारा ओलांडून कित्तीम बेटाच्या तटावर जा आणि पाहा, केदारच्या वाळवंटात पाठवा व जवळून चौकशी करा; अशा प्रकारे कधी काही घडले का ते पहा:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 कित्ती लोकाच्या द्वीपात जाऊन पाहा, केदारास कोणाला तरी पाठवून नीट विचार करा, व असल्या गोष्टी कधी झाल्या आहेत की काय ते पाहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 कारण कित्तीम लोकांच्या बेटावर पार जाऊन व्यवस्थीत पाहा. कोणाला तरी केदारला पाठवा आणि लक्षपूर्वक पाहा, कोणी असे कधी काही केले आहे का ते बघा!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:10
21 Iomraidhean Croise  

ही इश्माएलाच्या पुत्रांची त्यांच्या जन्मानुसार यादी: इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, नंतर केदार, अदबील, मिबसाम,


तेव्हा लोक उत्तर देतील, ‘याहवेह त्यांचे परमेश्वर, ज्यांनी या लोकांच्या पूर्वजांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या याहवेहला सोडून ते इतर दैवतांची उपासना व सेवा करू लागले आहेत; म्हणून याहवेहने त्यांच्यावर हे अरिष्ट आणले आहे.’ ”


यावानाचे पुत्र: एलिशाह, तार्शीश, कित्तीम व रोदानीम.


जेव्हा दावीद वृद्ध व वयातीत झाला, तेव्हा त्याने आपला पुत्र शलोमोनला इस्राएलचा राजा बनविले.


कोहाथाचे पुत्र: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीएल; सर्व मिळून चार पुत्र.


धिक्कार असो माझा, जर मी मेशेख हे माझे निवासस्थान केले, वा केदार येथे माझा डेरा घातला!


प्रभू मला असे म्हणतात: “एका वर्षाच्या आत, कराराने बांधलेला सेवक जसे एकएक दिवस मोजत असतो, तसे केदारचे सर्व वैभव नाहीसे होईल.


सोरविरुद्ध भविष्यवाणी: तार्शीशच्या जहाजांनो, विलाप करा! कारण सोरचा नाश झाला आहे आणि तिथे घर किंवा बंदर असे काहीच राहिले नाही. कित्तीम देशाकडून हे वचन त्यांच्याकडे आले आहे.


ते म्हणाले, “कुमारिके सीदोन, यापुढे तुझी चैनबाजी चालणार नाही. आता तू चिरडली जावी! “वर कित्तीम पलीकडे गेलात; तर तिथेही तुम्हाला विश्रांती मिळणार नाही.”


केदार व हासोरची राज्ये ज्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने हल्ला केला त्याविषयी: याहवेह असे म्हणतात: “सज्ज व्हा, व केदारवर हल्ला करा आणि पूर्वेच्या लोकांना नष्ट करा.


आपली काही वस्त्रे घेऊन त्यांची भडक उच्च पूजास्थाने तू बनविली, तिथे तू आपला वेश्याव्यवसाय चालू ठेवला. तू त्याच्याकडे गेलीस आणि त्याने तुझ्या सौंदर्यावर कब्जा केला.


“ ‘अरबी लोक व केदारचे सर्व राजपुत्र तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला कोकरे, एडके व बोकडे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला.


त्यांनी तुझी वल्ही बाशानच्या एला झाडाची बनविली; त्यांनी तुझ्या बैठकी कित्तीम द्वीपातील सुरूच्या लाकडाच्या बनविल्या आणि त्यांना हस्तिदंताने सजविले.


“यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही आपल्या सभोवती असलेल्या राष्ट्रांपेक्षा अधिक मोकाट झाला आहात आणि तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळले नाही. तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांप्रमाणे देखील तुम्ही वागला नाहीत.


यानंतर तो आपले लक्ष किनारपट्टीवरील शहरांकडे वळवील व त्यातील अनेक जिंकून घेईल. परंतु एक सेनापती त्याला प्रतिकार करेल व त्याला लाजिरवाणी माघार घ्यावी लागेल.


पश्चिमेकडील कित्तीम बेटांतील जहाजे त्याला विरोध करतील आणि त्याचे धैर्य तुटेल. मग तो पवित्र करारावर आपला रोष काढण्यासाठी परत येईल. तो परत येईल आणि पवित्र कराराचा त्याग करणार्‍यांवर कृपा दाखवेल.


कित्तीमाच्या किनार्‍यावरून जहाजे येतील; ते अश्शूर व एबर यांच्यावर जुलूम करतील, परंतु त्यांचाही नाश होईल.”


मला असा अहवाल मिळाला आहे की तुमच्यामध्ये लैंगिक अनैतिकता आहे, की जी गैरयहूदीही खपवून घेणार नाहीत; कोणाएका मनुष्याने आपल्या वडिलांच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले आहेत.


ज्या प्रत्येकाने ते पाहिले, त्यांनी एक दुसर्‍यांना म्हटले, “इस्राएली लोक इजिप्तमधून आले, तेव्हापासून आजवर अशी घटना पाहिली नाही किंवा केली नाही. आपण काहीतरी केलेच पाहिजे! चला बोलू या!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan