यिर्मया 19:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “ ‘या ठिकाणी यहूदीया व यरुशलेम यांच्या योजना मी उधळून लावेन. मी त्यांच्या शत्रूच्या समक्ष तलवारीने त्यांचा वध करेन, जे त्यांचा प्राण घेऊ पाहतात, आणि मी त्यांची प्रेते पक्ष्यांना आणि हिंस्र पशूंना खावयास देईन. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ह्या स्थळी यहूदा व यरुशलेम ह्यांची मसलत मी निष्फल करीन; त्यांच्या शत्रूंपुढे त्यांचा जीव घेण्यास टपणार्यांच्या हाताने, तलवारीने ते पडतील असे मी करीन; त्यांची प्रेते आकाशांतील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य म्हणून देईन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 येथेच मी यहूदातील व यरूशलेममधील रचलेले बेत हाणून पाडीन. त्यांचा पाठलाग करणाऱ्यांच्या आणि त्यांचा शोध घेणाऱ्यांच्या हाती लागण्याआधी मी त्यांना तलवारीवर पाडून मारुन टाकीन. मग त्यांची प्रेते आकाशातील पक्षी व जंगली पशू ह्यांचे भक्ष्य होईल. Faic an caibideil |
आणि जर त्यांनी तुला विचारले, ‘आम्ही कुठे जावे?’ तर त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: “ ‘ज्यांना मरणासाठी नेमले आहे, त्यांनी मरणाकडे जावे; तलवारीने ज्यांचा वध व्हावयाचा आहे, त्यांनी तलवारीकडे जावे; उपासमारीने जे मरणार आहेत, त्यांनी दुष्काळाकडे जावे; जे बंदिवासासाठी नेमलेले आहेत, त्यांनी बंदिवासात जावे.’