Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 19:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कारण त्यांनी मला सोडले आहे आणि हे स्थान त्यांनी परक्या दैवताचे केले आहे; हे लोक अन्य दैवतांपुढे धूप जाळतात, जे त्यांच्या पूर्वजांना किंवा यहूदीयाच्या राजांना कधीही माहीत नव्हते, आणि त्यांनी ही जागा निर्दोष रक्ताने भरून टाकली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्यांनी माझा त्याग केला आहे, हे स्थान त्यांनी परक्यांचे असे मानले आहे; त्यांचे पूर्वज व यहूदाचे राजे ह्यांना जे माहीत नव्हते अशा अन्य देवांपुढे त्यांनी धूप जाळला; निर्दोष्यांच्या रक्ताने ते स्थान भरले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मी असे करणार कारण त्यांनी मला सोडले आणि हे ठिकाण विटाळवीले आहे. माहित नसलेल्या अशा परक्या दैवतांना त्यांनी या ठिकाणी जागा दिली. त्यांनी व त्यांच्या पुर्वजांनी आणि यहूदाच्या राजांनी हे ठिकाण निष्पाप रक्ताने भरले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 19:4
49 Iomraidhean Croise  

शिवाय, मनश्शेहने इतके निष्पाप रक्त सांडले की यरुशलेम पूर्ण रक्ताने भरून गेले—त्याने यहूदाहला जे पाप करावयाला लावले होते त्या शिवाय त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले.


कोणीही आपला पुत्र अथवा कन्या यांचा मोलख दैवताला अग्नीत होम करू नये म्हणून राजाने बेन हिन्नोम खोर्‍यातील तोफेत अशुद्ध केले.


त्यासोबत निर्दोषाचे रक्त सांडणे हे सम्मिलीत होते. त्याने यरुशलेम निर्दोषांच्या रक्ताने भरून टाकले, त्यामुळे याहवेहने त्यांना क्षमा करण्याचे नाकारले.


निष्पाप मुलामुलींचे नरबळी दिले, कनानाच्या मूर्तींना अर्पणे वाहिली, आणि त्यांचे रक्त सांडून त्यांनी ती भूमी अपवित्र केली.


पाप करावयाला त्यांचे पाय धाव घेतात; निर्दोषाचा रक्तपात करण्यास ते चपळ असतात. ते दुष्ट योजनेचा पाठपुरावा करतात; हिंसात्मक कृत्यांनी त्यांचे मार्ग ओळखले जातात,


“पण तुम्ही जे याहवेहचा त्याग करता आणि माझ्या पवित्र पर्वताला विसरता, जे भाग्य दैवतासाठी (गादसाठी) मेज पसरविता आणि विधिलिखितासाठी मिश्रित मद्य पात्रात ठेवता,


मी माझ्या लोकांविरुद्ध माझ्या न्यायाची घोषणा करेन, कारण त्यांनी माझा त्याग करण्याचे वाईट कृत्य केले आहे. इतर दैवतांच्या मूर्तीला धूप जाळला व स्वतःच्या हस्तकृतींची पूजा केली आहे.


हे यहूदीया, जेवढी तुमची शहरे आहेत तेवढीच त्या दैवतांची संख्या; आणि तुमच्या या लाजिरवाण्या दैवतांच्या वेद्या, बआलापुढे धूप जाळण्याच्या वेद्या यरुशलेमच्या प्रत्येक रस्त्यावर आहेत.’


तुम्ही मला नाकारले आहे,” याहवेह असे म्हणतात. “तुमची घसरण सुरूच आहे. म्हणून मी माझे हात तुमच्याविरुद्ध करेन व तुमचा नाश करेन; विनाश राखून ठेवण्याचा मला वीट आला आहे.


तेव्हा त्यांना सांग, याहवेह असे म्हणाले, ‘कारण तुमच्या पूर्वजांनी मला सोडले. त्यांनी इतर दैवतांची उपासना केली, त्यांची सेवा केली आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत,


हे याहवेह, तुम्हीच इस्राएलची आशा आहात; ज्यांनी याहवेहला सोडले आहे, ते लाजिरवाणे होतील. जे तुमच्या मार्गापासून दूर गेले आहेत, त्यांचे नाव धुळीत लिहिले जाईल कारण त्यांनी याहवेहचा त्याग केला, जिवंत पाण्याच्या झर्‍याला सोडले आहे.


लोकांना सांग, ‘याहवेहचे हे वचन ऐका, यहूदीयाच्या राजांनो, यहूदीयातील सर्व लोकांनो, आणि यरुशलेमच्या नागरिकांनो, तुम्ही जे या प्रवेशदारातून प्रवेश करता,


तरीसुद्धा माझे लोक मला विसरले; ते व्यर्थ मूर्तीला व्यर्थ धूप जाळतात, ते त्यांना अडखळत चालावयास लावतात ते पूर्वजांचे मार्ग आहेत. जे मार्ग नीट बांधलेले नाही, म्हणून त्या आडमार्गावरून त्यांना चलविले गेले.


“माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत: त्यांनी जीवनदायी पाण्याच्या झर्‍याला, म्हणजे मला, सोडले आहे, आणि ज्यात पाणी राहत नाही असे फुटके, गळके हौद स्वतःसाठी बांधले आहेत.


ज्या याहवेहनी तुम्हाला योग्य मार्गाने चालविले त्या तुमच्या परमेश्वराचा त्याग करून, ही परिस्थिती तुम्ही स्वतःवर ओढवून घेतली नाही का?


तुमचा दुष्टपणाच तुम्हाला शिक्षा देईल; तुमचे माघार घेणे तुम्हाला दोषी ठरवेल. म्हणून विचार करा आणि तुमच्या लक्षात येईल याहवेह तुमच्या परमेश्वराचा त्याग करून दूर जाणे तुमच्यासाठी किती वाईट आणि कटू आहे, आणि माझे भय तुमच्यामध्ये नाही,” सर्वशक्तिमान याहवेह असे म्हणतात.


“मी तुमच्या लोकांना उगाच शिक्षा केली; त्यांनी सुधारणेचा स्वीकार केला नाही. तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांचा नाश केला जणू एखादा खवखवलेला सिंहच.


निष्पाप लोकांच्या रक्ताने तुमची वस्त्रे माखली आहेत, तुमच्या घरात चोरी करण्यासाठी शिरतांना त्यांना तुम्ही बघितले नाही. असे सर्व असूनही


“परंतु तुझे डोळे आणि तुझे अंतःकरण केवळ अनीतीने धन कसे मिळवावे, निर्दोष्यांचे रक्त कसे वाहवे, आणि जुलूम व अन्यायाने कसे बळकावे याचाच शोध घेत असतात.”


याहवेहचे असे म्हणणे आहे: तुमचा न्यायनिवाडा न्यायी व यथायोग्य असो. ज्यांना लुबाडण्यात आले आहे, त्यांना जुलमी लोकांपासून सोडवा. परकीय, अनाथ आणि विधवा यांना अन्याय किंवा हिंसा करू नका, आणि या स्थानावर निरपराध्यांचे रक्त सांडवू नका.


परंतु एक गोष्ट नक्की, तुम्ही मला ठार केले, तर एका निरपराध मनुष्याला ठार केल्याचा ठपका तुमच्यावर, या नगरावर व येथील प्रत्येक रहिवाशावर येईल; कारण तुम्ही ऐकलेला प्रत्येक शब्द तुम्हाला सांगण्यासाठी याहवेहने मला पाठविले, हे अगदी सत्य आहे.”


इजिप्त देशातून त्यांनी उरीयाहला परत आणले, त्याला राजा यहोयाकीम राजाकडे परत आणले, त्याने त्याला तलवारीने ठार मारले आणि ज्या ठिकाणी सामान्य लोक पुरले होते तिथे त्याचा मृतदेह फेकून दिला.)


त्यांनी केलेल्या दुष्टाईमुळेच असे झाले. त्यांनी इतर दैवतांना धूप जाळला व त्यांची आराधना केली म्हणून माझा क्रोध त्यांच्यावर भडकला. अशी दैवते जी त्यांना किंवा तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांनाही माहीत नव्हती.


म्हणून जंगलातील सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, वाळवंटातील लांडगा त्यांना फस्त करेल, त्यांच्या नगरांभोवती चित्ता दबा धरून बसेल, आणि बाहेर पडणार्‍या प्रत्येकाला तो फाडून टाकील; कारण त्यांची बंडखोरी फार मोठी आहे त्यांची घसरण फार मोठी आहे.


जर तुम्ही परकीय, अनाथ आणि विधवा यांच्यावर अत्याचार करत नसाल, या ठिकाणी निष्कलंक रक्त पाडणार नसाल, आणि जे तुमच्या नाशाचे कारण असलेल्या इतर दैवतांचे अनुसरण करणार नाही,


“ ‘तुम्ही चोरी, वध, व्यभिचार, खोट्या शपथा घेतल्या, बआल दैवत व तुम्हाला माहीत नसलेली इतर दैवते यांचे अनुसरण करून,


तेथील संदेष्ट्यांनी केलेली पापे आणि निर्दोष व्यक्तींचे रक्त या नगरीत सांडून याजकांनी केलेला अधर्मामुळे तसे घडले.


त्यांच्याच भेटींनी मी त्यांना अशुद्ध केले; म्हणजेच प्रत्येक प्रथम जन्मलेल्याचा यज्ञ अशासाठी की मी त्यांना भयाने भरावे, म्हणजे ते जाणतील की मीच याहवेह आहे.’


लोकांपासून मी आपले मुख वळवेन, आणि मी जतन केलेले माझे मौल्यवान स्थळ लुटारू अपवित्र करतील. ते त्यात शिरतील आणि त्यास भ्रष्ट करतील.


त्याच्यासमोर इस्राएलचे सत्तर वडील उभे होते आणि शाफानचा पुत्र याजन्याह त्यांच्यामध्ये उभा होता, प्रत्येकाच्या हातात धुपाटणे होते आणि सुगंधी धूपाचा ढग वर चढत होता.


“त्याचे सशस्त्र सैन्य मंदिराच्या दुर्गास अपवित्र करण्यासाठी पुढे येतील आणि दैनंदिन होमार्पण बंद केले जाईल. मग ते ओसाड करणारा अमंगळ पदार्थ स्थापतील.


म्हणून जगाच्या प्रारंभापासून सर्व संदेष्ट्यांचे जे रक्त सांडण्यात आले, त्याबद्दल या पिढीला जबाबदार धरले जाईल.


तुमच्यापैकी काही अधम पुरुष निघाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या नगरातील लोकांना हे बोलून बहकविले, “चला आपण जाऊ आणि इतर दैवतांची उपासना करू” (अशी दैवते ज्यांना तुम्ही ओळखत नाहीत),


जर तुमचा स्वतःचा बंधू किंवा तुमचे पुत्र किंवा कन्या किंवा तुमची प्रिय पत्नी किंवा जिवलग मित्र तुम्हाला गुप्तपणे भुरळ पाडेल व म्हणेल, “चल, आपण जाऊ आणि इतर दैवतांची उपासना करू” (ज्यांना तुम्ही वा तुमचे पूर्वज ओळखत नाहीत,


जर तुम्ही याहवेहचा त्याग करून दुष्कर्मे करीत राहिलात तर तुम्ही ज्या कार्यात हात घालाल त्या प्रत्येक गोष्टीत याहवेह शाप, गोंधळ आणि संकटे आणतील व सरतेशेवटी तुमचा अचानक आणि संपूर्णपणे नाश करतील.


तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांना कधीही माहीत नसलेल्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुम्हाला आणि तुम्ही स्वतःवर नेमलेल्या राजाला हद्दपार करतील. तिथे तुम्ही इतर दैवतांची उपासना कराल, जे लाकडाचे आणि दगडाचे दैवत असेल.


पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत असलेल्या निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुमची पांगापांग करतील. तिथे तुम्ही किंवा तुमच्या पूर्वजांनी ज्यांची कधीही उपासना केली नाही—अशा लाकडाच्या आणि दगडाच्या दैवतांची तुम्ही उपासना कराल.


कारण त्यांनी तुमच्या पवित्र जणांचे आणि संदेष्ट्यांचे रक्त सांडले, आणि आता तुम्ही त्यांना रक्त प्यावयास लावले आहे, त्याला ते पात्र आहेत.”


परमेश्वराने नवीन पुढारी निवडले जेव्हा युद्ध शहराच्या वेशीजवळ आले होते, परंतु इस्राएलाच्या चाळीस हजारांमध्ये एकही ढाल किंवा भाला दिसला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan