Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 19:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेह मला असे म्हणतात: “जा व एक मातीचे मडके विकत घे आणि जाताना लोकांमधील काही वडीलजन आणि काही याजक यांना आपल्याबरोबर घे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेश्वर म्हणाला, “जा, कुंभाराचे एक मडके विकत घे आणि आपल्याबरोबर लोकांचे व याजकांचे काही वडील घेऊन,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर असे म्हणतो, “जा आणि कुंभारकडून एक मातीचे मडके विकत घे, आणि तुझ्यासोबत लोकांतले वडील आणि याजकांतले वडील बोलावून घे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 19:1
20 Iomraidhean Croise  

त्याने राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि वडील याजक यांना गोणपाट नेसून आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याकडे पाठविले.


मातीच्या भांड्यांसारखे त्याचे इतक्या निर्दयीपणाने तुकडे केले जातील की त्याच्या अनेक बारीक तुकड्यांमध्ये चुलीमधून निखारे घेण्यासाठी किंवा रांजणातून पाणी काढण्यासाठी एकही तुकडा सापडणार नाही.”


याहवेहने मला म्हटले, “जा आणि तागाचा एक कमरबंद विकत घे. तो कमरेस गुंडाळ, पण त्याला पाणी लागू देऊ नकोस.”


नंतर काही वडीलजन पुढे आले व संपूर्ण सभेतील लोकांना उद्देशून बोलू लागले,


‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मोहोरबंद खरेदीखत व त्याची प्रत ही दोन्हीही घेऊन दीर्घकाळापर्यंत टिकून राहवी म्हणून ती मातीच्या एका पात्रात घालून ठेव.


सुवर्णतुल्य असलेल्या, सीयोनाच्या लेकरांना, आता कुंभाराच्या हातांनी घडविलेल्या मातीच्या पात्रांप्रमाणे लेखले जात आहे!


“आता हे मानवपुत्रा, ओल्या मातीची एक वीट घे आणि ती तुझ्यापुढे ठेव व तिच्यावर यरुशलेम शहराचे चित्र काढ.


“आता, हे मानवपुत्रा, धारदार तलवार घे व ती न्हाव्याच्या वस्तर्‍या प्रमाणे वापरून तुझे डोके व दाढीचे मुंडण कर. मग तराजूवर त्याचे माप करून केसांची वाटणी कर.


वयस्कर पुरुष, तरुण पुरुष व स्त्रिया, आई व लेकरे सर्वांची कत्तल करा, परंतु ज्यांच्या कपाळावर चिन्ह केलेले आहे त्यांना स्पर्श करू नका. माझ्या पवित्रस्थानापासून सुरुवात करा.” तेव्हा त्यांनी त्या वयस्क पुरुषांपासून सुरुवात केली जे मंदिराच्या समोर होते.


याहवेह मोशेला म्हणाले: “इस्राएली लोकांमधील सत्तर वडील ज्यांना तू पुढारी आणि अधिकारी म्हणून ओळखतो, त्यांना माझ्यासमोर आण. त्यांनी सभामंडपात यावे व तुझ्याबरोबर उभे राहावे.


नंतर प्रमुख याजकवर्ग आणि लोकांचे वडीलजन महायाजक कयफाच्या राजवाड्यात एकत्र जमले.


प्रातःकाळ झाल्यावर सर्व महायाजक आणि लोकांच्या वडीलजनांनी येशूंचा वध कसा करता येईल याची योजना केली.


आम्हाकडे येऊन त्याने पौलाचा कमरबंद घेतला व स्वतःचे हातपाय बांधून तो म्हणाला, “पवित्र आत्मा म्हणतो, ‘हा कमरबंद ज्या मनुष्याचा आहे त्याला यरुशलेममधील यहूदी पुढारी असेच बांधून गैरयहूदीयांच्या हाती देतील.’ ”


तरी आम्हासाठी हा मोलवान ठेवा एका मातीच्या पात्रात ठेवलेला आहे हे दाखविण्यासाठी की, जे अपार सामर्थ्य आमचे स्वतःचे नसून परमेश्वराकडून आहे, हे प्रत्येकाला दिसावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan