Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 18:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 जेव्हा स्वारी करणारे त्यांच्यावर अचानक हल्ला करतील तेव्हा त्यांच्या घरातून आक्रोश व किंचाळ्या ऐकू येवोत, कारण मला पकडावे म्हणून त्यांनी खड्डा खणला आहे आणि माझ्या वाटेवर त्यांनी गुप्त सापळे लावले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तू त्यांच्यावर एकाएकी सैन्य आणशील तेव्हा त्यांच्या घरांतून आक्रोश कानी पडो; कारण त्यांनी मला पकडण्यासाठी खाडा खणला आहे, माझ्या पायांसाठी पाश मांडले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तू त्यांच्यावर अचानक टोळी आणशील तेव्हा त्यांच्या घरातून आरोळी ऐकू येवो, कारण त्यांनी माझ्या पायाकरीता सापळा रचला आहे आणि मला पकडण्यासाठी त्यांनी खड्डा खोदला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 18:22
23 Iomraidhean Croise  

अहंकारी मला अडकविण्यासाठी खड्डे खणत आहेत, जे तुमच्या नियमाविरुद्ध आहे.


या गर्विष्ठ लोकांनी मला पकडण्यासाठी पाश लपविले आहेत; त्यांनी रस्त्याच्या बाजूस दोरांचे जाळे पसरले आहे, आणि माझ्या मार्गावर सापळे रचले आहेत. सेला


याहवेहला मी म्हणतो, “तुम्हीच माझे परमेश्वर आहात.” याहवेह, माझ्या विनवणीकडे कान द्या.


ते पाहा! माझ्या उजवीकडे मला साहाय्य करणारा कोणीही नाही; माझी कोणालाही पर्वा नाही. मला काहीच आश्रय नाही; माझ्या जिवाची कोणासही चिंता नाही.


माझा जीव घेऊ पाहणारे त्यांचे जाळे रचतात, मला इजा करणारे माझ्या नाशाबद्दल बोलतात; ते दिवसभर फसवणूक आणि लबाडी करतात.


गल्लीमच्या मुली, आरडाओरडा करा! ऐक, लईशाह! गरीब बिचारा अनाथोथ!


चांगल्याची वाईटाने भरपाई करावी का? माझा जीव घेण्यासाठी त्यांनी खड्डा खोदला आहे. आठवण ठेवा की मी आपल्यासमोर उभा राहिलो आणि त्यांच्यावतीने बोललो जेणेकरून तुमचा क्रोध त्यांच्यापासून दूर व्हावा.


मी कित्येकांना कुजबुजतांना ऐकले आहे, “सर्व बाजूंनी दहशत! त्याला दोषी ठरवा! चला, त्याला दोषी ठरवू या!” माझे सर्व मित्रगण माझ्या हातून एखादी चूक होण्याची वाट पाहत आहेत. ते म्हणतात, “कदाचित त्याची फसवणूक होईल; मग आपण त्याच्यावर वर्चस्व करू आणि आपला सूड उगवू.”


याहवेहने दयामाया न दाखविता प्राचीन नगरांचा जसा नाश केला, तसाच त्या निरोप्याचाही नाश होवो. सकाळी तो शोकगीते ऐको, व दुपारी रणगर्जना.


एक स्त्री प्रसूतीच्या वेळी ओरडते तसा मला आवाज ऐकू आला, जणू तिला पहिल्यांदा मूल होते, अशा प्रकारचा आक्रोश— सीयोनच्या कन्येचा श्वास कोंडला आहे, ती आपले हात पसरून म्हणत आहे, “हाय रे हाय! मला मूर्च्छा येत आहे; माझा जीव मी घातक्यापुढे ठेवला आहे.”


“माझ्या लोकांमध्ये दुष्ट लोक आहेत शिकारी जसा आडोशाला दबा धरून पक्षांची वाट बघतो, तसे ते माणसांना पकडण्यासाठी सापळे लावतात.


माझ्या लोकांनो, गोणपाट धारण करा, आणि राखेत लोळा; एकुलत्या एका पुत्रासाठी आक्रोश करतो तसा आक्रोश कर. कारण संहारक सेना एकाएकी तुझ्यावर हल्ला करेल.


तो दिवस तटबंदीच्या नगरांविरुद्ध आणि कोपऱ्यातील बुरुजा विरुद्ध रणशिंगाचा व रणगर्जनांच्या निनादांचा असेल.


मग परूशी लोक बाहेर गेले आणि येशूंना त्यांच्या बोलण्यात कसे पकडावे यासंबंधी चर्चा केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan