Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 18:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 चांगल्याची वाईटाने भरपाई करावी का? माझा जीव घेण्यासाठी त्यांनी खड्डा खोदला आहे. आठवण ठेवा की मी आपल्यासमोर उभा राहिलो आणि त्यांच्यावतीने बोललो जेणेकरून तुमचा क्रोध त्यांच्यापासून दूर व्हावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 बर्‍याची फेड वाइटाने व्हावी काय? कारण त्यांनी माझ्या जिवासाठी खाडा खणला आहे. त्यांच्यावरल्या तुझ्या रागाचे निवारण व्हावे म्हणून त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास मी तुझ्यासमोर उभा राहिलो ह्याचे स्मरण कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 त्यांच्यासाठी चांगले असून पण, अरिष्ट हेच माझी परतफेड असणार काय? कारण त्यांनी माझ्या जीवासाठी खड्डा खोदला आहे. त्यांच्या कल्याणासाठी बोलायला आणि तुझा क्रोध त्यांच्यापासून फिरवायला मी तुझ्यासमोर कसा उभा राहिलो ते आठव.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 18:20
31 Iomraidhean Croise  

तुम्ही तर अनाथांवर चिठ्ठ्या टाकण्यास व आपल्या मित्रांची विक्री करण्यास चुकत नाही.


मग ते म्हणाले की ते त्यांचा नाश करतील— जर खुद्द त्यांनी निवडलेला पुरुष मोशे, मध्ये उभा राहिला नसता तर, त्यांनी आपला क्रोध न आवरता त्या लोकांचा नाश केला असता.


दुष्ट लोक माझा नाश करण्याची वाट पाहत आहेत, तरी मी माझे चित्त तुमच्या अधिनियमाकडे लावेन.


ते माझ्या बर्‍याची फेड वाईटानेच करतात. माझा जीव शोकग्रस्त झाला आहे.


विनाकारण त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आणि विनाकारण माझ्यासाठी खड्डा खणला आहे.


माझ्या चांगुलपणाची फेड ते दुष्टाईने करीत आहेत आणि मी सत्याच्या बाजूने उभे राहिलो, तरीही ते माझा द्वेष करीत आहेत.


माझ्या पावलांसाठी त्यांनी सापळा लावला आहे— संकटात मी वाकून गेलो होतो. माझ्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी खड्डा खणला होता— परंतु ते स्वतःच त्यात पडले आहेत. सेला


जे खड्डा खणतात आणि माती काढून खोल करतात ते स्वतःच त्यांनी खणलेल्या खड्ड्यात पडतात.


जो चांगल्याची फेड वाईटाने करतो, त्याच्या घराला अरिष्ट कधीही सोडणार नाही.


जो कोणी खड्डा करतो, तोच त्याच्यात पडेल; जर कोणी दगड ढकलून टाकतो, तो परत त्यांच्यावरच ढकलून दिला जाईल.


जो खड्डा खणतो तोच तिच्यात पडेल. जो कुंपण मोडतो त्याला सर्प चावेल.


“म्हणून हे यिर्मयाह, इतःपर या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, त्यांच्यासाठी रडू नकोस अथवा विनवण्याही करू नकोस; कारण अखेरीस निराशेने व्याकूळ होऊन ते माझ्यापुढे पदर पसरतील. परंतु मी त्यांचे ऐकणार नाही.


हे याहवेह, आम्ही आमचा दुष्टपणा पदरी घेतो आणि आमच्या पूर्वजांचा अपराध स्वीकार करतो; आम्ही निश्चितच तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.


तेव्हा याहवेहने मला म्हटले: “जर मोशे व शमुवेल माझ्यासमोर येऊन उभे राहिले तरीसुद्धा या लोकांकरिता माझे हृदय द्रवित होणार नाही. त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालवून दे! त्यांना जाऊ दे!


माझा छळ करणाऱ्यांना लज्जित करा, परंतु मला फजिती पासून सोडवा; त्यांना भयभीत करा परंतु मला भय मुक्त करा. त्यांच्यावर संकटाचे दिवस येऊ दे; त्यांच्यावर दुप्पट नाश ओढवू दे.


“हे याहवेह, माझे ऐका, माझ्याविरुद्ध कारस्थान करणारे काय म्हणतात ते ऐका!


जेव्हा स्वारी करणारे त्यांच्यावर अचानक हल्ला करतील तेव्हा त्यांच्या घरातून आक्रोश व किंचाळ्या ऐकू येवोत, कारण मला पकडावे म्हणून त्यांनी खड्डा खणला आहे आणि माझ्या वाटेवर त्यांनी गुप्त सापळे लावले आहेत.


जर ते संदेष्टे असतील व त्यांच्याकडे याहवेहचे वचन असेल तर, याहवेहच्या मंदिरातील सुवर्णपात्रे मंदिरात व यहूदीयाच्या राजाच्या महालात आणि यरुशलेममधील महालांमध्येच राहवी, ती बाबेलला नेली जाऊ नयेत, अशी त्यांनी सर्वसमर्थ याहवेहस विनंती करावी.


“माझ्या लोकांमध्ये दुष्ट लोक आहेत शिकारी जसा आडोशाला दबा धरून पक्षांची वाट बघतो, तसे ते माणसांना पकडण्यासाठी सापळे लावतात.


“म्हणून या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, किंवा यांच्यासाठी माझ्याकडे विनंती किंवा विनवण्या करू नकोस. कारण मी तुझे ऐकणार नाही.


याहवेह, माझ्यावर झालेला अन्याय तुम्ही पाहिला आहे. तुम्हीच माझी बाजू उचलून धरा!


परंतु येशू त्यांना म्हणाले, “मी पित्याद्वारे अनेक चांगली कामे केली आहेत. माझ्या कोणत्या कामामुळे तुम्ही मला दगडमार करीत आहात?”


‘विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला,’ असे त्यांच्या नियमात जे म्हटले आहे, ते पूर्ण झाले आहे.


योनाथान त्याचा पिता शौल याच्याशी दावीदाबद्दल चांगले बोलत म्हणाला, “राजाने त्यांचा सेवक दावीद याचे काही वाईट करू नये; त्याने तुमचे काही वाईट केले नाही आणि त्याने जे काही केले त्यामुळे तुम्हाला मोठा फायदा झाला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan