Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 18:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्यांचा देश भयानकतेचे, आणि नेहमीसाठी तिरस्काराचे उदाहरण होईल; येजा करणाऱ्या सर्वांना हे बघून दहशत भरेल आणि ते आश्चर्याने आपली डोकी हालवितील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 अशा प्रकारे ते आपला देश दहशत व निरंतरचा उपहास ह्यांना पात्र करतात; त्याच्याजवळून येणारा-जाणारा प्रत्येक जण विस्मित होऊन आपले डोके हलवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 यास्तव जे राष्ट्र भयानक आणि सर्वकाळासाठी फुत्काराची गोष्ट असा होईल. तिच्याजवळून जाणारा प्रत्येक हादरेल आणि आपले डोके हालवेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 18:16
35 Iomraidhean Croise  

हे मंदिर ढेकळ्यांचा ढिगारा होईल. त्याच्या जवळून जाणारे सर्वजण आश्चर्यचकित होऊन तुच्छतेने म्हणतील, ‘याहवेहने या देशाचे व या मंदिराचे असे का केले आहे?’


त्यामुळेच याहवेहचा क्रोध यहूदीया आणि यरुशलेम यांच्यावर आला आहे; त्यांनी त्यांना भयप्रद व दहशत निर्माण करणारे आणि तिरस्काराचा विषय असे केले आहे, जसे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता.


विरोधकांसाठी मी अपयशाचे प्रतीक झालो आहे; मला पाहून ते डोकी हलवितात.


मला पाहून ते माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, आपले डोके हालवीत,


तुम्ही आम्हाला राष्ट्रांमध्ये उपहास असे केले आहे; लोक आमच्याकडे पाहून डोके हालवितात.


त्याच्याविरुद्ध बोललेले याहवेहचे वचन हे आहे: “सीयोनाची कुमारी कन्या तुझा उपहास आणि तिरस्कार करते. यरुशलेम कन्या तुझे पलायन बघून आपले डोके हालविते.


नंतर मी म्हणालो, “हे प्रभू, आणखी किती वेळ?” आणि त्यांनी उत्तर दिले: “शहरे जोपर्यंत उद्ध्वस्त होत नाहीत आणि तिथे कोणी लोक राहिले नाहीत, घरे ओसाड पडत नाहीत आणि शेतांची नासाडी होत नाही आणि ती उद्ध्वस्त होत नाहीत तोपर्यंत.


मी या नगराचा नाश करेन आणि ते दहशतीचे व आणि घृणेचे ठिकाण बनवीन; त्याच्या जवळून जाणारा कोणीही त्याच्या सर्व जखमांमुळे भयचकित होतील आणि त्यांचा उपहास करतील.


मी उत्तरेकडील सर्व लोक व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यांना एकवटेन. त्याच्या सर्व सैन्यांना मी या देशावर, येथील लोकांवर व तुमच्या आसपासच्या इतर राष्ट्रांवर आणेन. मी त्यांचा संपूर्ण नायनाट करून त्यांना दहशत, तिरस्कार व नाशाचा कायमचा विषय करेन,” याहवेह म्हणतात,


मी त्यांचा तलवार, दुष्काळ व मरीने पाठलाग करेन, जगभरातील सर्व राष्ट्राचे लोक त्यांची घृणा करतील, व त्यांना मी जिथेही हाकलून लावले तेथील लोक शाप देतील, त्यांची नाचक्की करतील, त्यांची चेष्टा करतील.


कारण इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: ‘यरुशलेमच्या लोकांवर माझ्या रागाचा व क्रोधाचा वर्षाव झाला, तसाच तुम्ही इजिप्तमध्ये प्रवेश कराल तेव्हा तुमच्यावर होईल. तिथे तुम्ही घृणा, शाप व उपहासाचा विषय व्हाल; तुम्हाला हा देश परत कधी दिसणार नाही.’


इजिप्तमध्ये जाण्याचा हट्ट धरणार्‍या या यहूदीयातील उरलेल्या लोकांना मी नाहीसे करेन. ते सर्वजण इजिप्तमध्ये नष्ट होतील; ते तलवारीने वा दुष्काळाने मरण पावतील. अगदी लहानांपासून थोरापर्यंत सर्व तलवारीने वा दुष्काळाने मरतील. ते एक असा शाप होतील, ते भयानकतेचा, तिरस्काराचा, व शापाचा विषय होतील.


इस्राएलही तुमच्या उपहासाचा विषय नव्हता का? ती चोरांच्यामध्ये पकडली गेली का, कारण जेव्हाही तिचा उल्लेख होतो, घृणाभावनेने तुम्ही आपली मान हालविता नाही का?


याहवेह जाहीर करतात, मी माझ्या नावाची शपथ वाहून म्हणत आहे, बस्रा उद्ध्वस्त व शापित होईल, ते दहशत व उपहासाचा विषय बनतील; आणि त्याची सर्व नगरे कायमची ओसाड होतील.”


एदोम दहशतीचे ठिकाण होईल; त्याच्या जवळून जाणारा कोणीही त्याच्या सर्व जखमांमुळे भयचकित होतील आणि त्यांचा उपहास करतील.


याहवेहच्या क्रोधामुळे ती आवासित होणार नाही, पण पूर्णपणे ओसाड होईल. आणि तिची अवस्था पाहून बाबेलातून येजा करणार्‍यांना दहशत वाटेल; तिच्या जखमा पाहून ते तिचा उपहास करतील.


बाबिलोन भग्नावशेषाचा ढिगारा होईल, तिथे कोल्ह्यांचा संचार होईल, ते भयानकतेचा व तिरस्काराचा विषय होतील, जिथे कोणीही राहत नाही असे ठिकाण.


तिची शहरे ओसाड होतील, ती एक शुष्क व निर्जन भूमी होईल, एक अशी भूमी जिथे कोणी मनुष्य राहत नाही, जिच्यामधून कोणीही प्रवास करीत नाही.


“मी यरुशलेमला उद्ध्वस्त करून त्याचा ढिगारा करेन, आणि त्यात कोल्ह्यांची विवरे होतील. यहूदीयातील नगरे उजाड करेन तिथे कोणीही वस्ती करू शकणार नाही.”


या वाटेच्या वाटसरूंनो माझी दुर्दशा पाहून तुम्हाला काहीच वाटत नाही काय? मला जे दुःख देण्यात आले आहे, त्या माझ्या दुःखासारखे दुसरे दुःख आहे काय? याहवेहने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी ही वेदना माझ्यावर लादली आहे.


देशातील लोकांना सांग: ‘इस्राएल व यरुशलेमात राहणार्‍यांविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ते त्यांचे अन्न चिंतेने खातील व आपले पाणी घाबरत पितील, कारण त्यात राहणार्‍या लोकांच्या क्रूरतेमुळे त्यांच्या देशात असलेले सर्वकाही काढून टाकले जाईल.


राष्ट्रांचे व्यापारी तुझा धिक्कार करतात; तुझा भयंकर अंत झाला आहे आणि तुझे अस्तित्वच नाहीसे होणार आहे.’ ”


म्हणून भविष्यवाणी कर आणि सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही बाकीच्या राष्ट्रांचे वतन व्हावे व लोकांच्या द्वेष व निंदेचा विषय व्हावे म्हणून चहूकडून त्यांनी तुम्हाला उद्ध्वस्त करून तुम्हाला सर्व बाजूंनी ठेचले आहे,


मी आपला हात त्यांच्याविरुद्ध उगारेन आणि दिबलाहच्या वाळवंटापासून ते जिथे कुठे राहतील मी त्यांचा देश ओसाड करेन; तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”


मी देश ओसाड करेन, म्हणजे तुमचे शत्रू जे त्यात राहतील ते त्यामुळे गांगरून जातील.


कारण ती भूमी ओसाड पडल्यामुळेच शब्बाथांचा आनंद उपभोगू शकत आहे. ते त्यांच्या पापांची परतफेड करतील कारण त्यांनी माझे नियम नाकारले आणि माझ्या विधींचा तिरस्कार केला.


तू ओमरीचे नियम आणि अहाबाच्या घराण्याच्या सर्व चालीरीती पाळल्या आहेत; तुम्हीही त्यांच्या रूढी पाळल्या आहेत. म्हणून मी तुझा नाश करेन व तुझ्या प्रजेची थट्टा करेन; तू राष्ट्रांची निंदा सहन करशील.”


जे जवळून जात होते त्यांनी त्यांचा अपमान केला, ते डोकी हालवीत


जे जवळून जात होते त्यांनी त्यांचा अपमान केला, डोकी हालवीत म्हणाले, “तू मंदिर उद्ध्वस्त करून तीन दिवसात पुन्हा बांधणार आहे ना,


तर याहवेह तुमच्यावर व तुमच्या वंशजांवर असाध्य रोग आणि कधीही न थांबणारे भयंकर साथीचे रोग पाठवतील.


तुमचा संपूर्ण देश गंधक आणि क्षारयुक्त होऊन—पूर्णपणे जळून गेल्यामुळे ती एक निरुपयोगी भूमी झाली आहे असे त्यांना आढळून येईल आणि याहवेहने क्रोधाविष्ट होऊन त्याचा सदोम, गमोरा, अदमाह व सबोईम या देशांसारखाच नाश केला आहे हे त्यांना दिसेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan