Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 17:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 ते पाण्याच्या जवळ लावलेल्या झाडासारखे आहेत. त्याची मुळे खोलवर पाण्यात गेलेली असतात. या झाडाला उष्णतेचे भय वाटत नाही; त्याची पाने सदा हिरवी राहतात. अवर्षणाच्या वर्षांची त्याला काळजी वाटत नाही. आणि ते आपली रसाळ फळे देण्याचे कधीच थांबत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल, तो आपली मुळे नदीकिनारी पसरील; उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही, त्याची पाने हिरवी राहतील; अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही, तो फळे देण्याचे सोडणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या वृक्षाप्रमाणे तो होईल, ज्याची मुळे प्रवाहाजवळ पसरते, तो हे पाहत नाही की उन्हाची झळ येत आहे, कारण त्याची पाने हिरवीगार राहतात. मग दुष्काळाच्या वर्षाच्या काळात तो चिंताग्रस्त होणार नाही, किंवा तो फळ देण्याचे थांबवणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 17:8
12 Iomraidhean Croise  

माझी मुळे खोल पाण्यापर्यंत पोहचतील, आणि रात्रभर दहिवर माझ्या फांद्यांना भिजवतील.


सूर्यप्रकाशात भरपूर पाणी दिलेल्या रोपट्यासारखे ते होतात. त्यांच्या फांद्या बागेत सर्वत्र पसरतात.


ते अशा वृक्षासारखे आहेत जे सतत वाहणार्‍या जलप्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या ऋतूमध्ये फळ देते आणि ज्यांची पाने कोमेजत नाहीत. त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम सिद्धीस जाते.


जे आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, तो नाश पावतील, परंतु नीतिमान मनुष्य हिरव्या पानाप्रमाणे बहरेल.


याहवेह तुम्हाला सतत मार्गदर्शन करतील; सूर्याच्या उष्णतेने शुष्क भूमीत राहूनही ते तुमच्या गरजा भागवतील व तुमच्या हाडांना बळकट करतील. मग तुम्ही भरपूर पाणी पाजलेल्या बागेप्रमाणे, कधीही पाणी न आटणाऱ्या झर्‍याप्रमाणे व्हाल.


सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना— राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट, विलापाऐवजी आनंदाचे तेल, निराशेच्या आत्म्याऐवजी स्तुतीचे वस्त्र बहाल करण्यासाठी. कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी ते नीतिमत्तेचे एला वृक्ष याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.


मी तुला वाचवेन; तलवारीने तुझा वध होणार नाही, पण मी तुझा जीव वाचवेन, कारण तू माझ्यावर भिस्त ठेवलीस, असे याहवेह जाहीर करतात.’ ”


अश्शूरला पाहा, लबानोनमधील एक गंधसरू असलेला, ज्याच्या सुंदर फांद्या जंगलास झाकून देत असत; तो सर्वात उंच वाढून, त्याचा शेंडा दाट झाडींच्या वर जातो.


नदीच्या दोन्ही बाजूंना सर्वप्रकारच्या फळांची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाहीत, ना त्यांची फळे संपतील. प्रत्येक महिन्यात ते फळे देतील, कारण त्यांच्याकडे पवित्रस्थानातून पाणी वाहते. त्यांची फळे खाण्यासाठी व त्यांची पाने आरोग्यासाठी वापरली जातील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan