Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 17:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “परंतु जो मनुष्य याहवेहवर भरवसा ठेवतो, जो फक्त याहेवेहवर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादित असो,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे तो धन्य!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 परंतु जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादीत आहे, कारण परमेश्वर त्याचा विश्वास आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 17:7
16 Iomraidhean Croise  

ज्यांचा याहवेहवर विश्वास आहे, ते सीयोन पर्वतासारखे स्थिर आहेत, कारण ते कधीही ढळत नाहीत, तर सर्वकाळ टिकतात.


तो मनुष्य धन्य होय, ज्याचा साहाय्यकर्ता याकोबाचा परमेश्वर आहे, आणि ज्याची आशा याहवेह त्याच्या परमेश्वराच्या ठायी आहे,


त्यांच्या पुत्राचे चुंबन घ्या, नाहीतर ते रागावतील, आणि तुमचे मार्ग तुम्हाला नाशाकडे घेऊन जातील, कारण एका क्षणात त्यांचा क्रोधाग्नी पेटेल. धन्य आहेत ते सर्वजण जे त्यांना शरण जातात.


ती कोसळतील आणि नाश पावतील, पण आम्ही उठू आणि बळकटपणे उभे राहू.


याहवेह किती चांगले आहेत याचा अनुभव घ्या; जे त्यांच्यावर भाव ठेवतात ते धन्य.


जे लोक याहवेहवर भरवसा ठेवतात, जे गर्विष्ठांच्या व असत्याकडे वळणार्‍यांच्या वार्‍यासही उभे राहत नाही, ते धन्य होत.


प्रभू याहवेह, केवळ तुम्हीच माझे आशास्थान आहात; तारुण्यापासून मी तुमच्यावर भरवसा ठेवला आहे.


सर्वशक्तिमान याहवेह, जे लोक तुमच्यावर भाव ठेवतात, ते कितीतरी धन्य होत.


जो कोणी शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, त्याची समृद्धी होते, आणि जो याहवेहवर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित असतो.


तरीसुद्धा याहवेह तुमच्यावर कृपा करण्यास आतुरलेले असतात; त्यामुळे तुमच्यावर दया दाखविण्यास ते उभारतील. कारण याहवेह हे न्यायी परमेश्वर आहेत. धन्य आहेत ते सर्व जे त्यांची वाट पाहतात!


सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना— राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट, विलापाऐवजी आनंदाचे तेल, निराशेच्या आत्म्याऐवजी स्तुतीचे वस्त्र बहाल करण्यासाठी. कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी ते नीतिमत्तेचे एला वृक्ष याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.


मी तुला वाचवेन; तलवारीने तुझा वध होणार नाही, पण मी तुझा जीव वाचवेन, कारण तू माझ्यावर भिस्त ठेवलीस, असे याहवेह जाहीर करतात.’ ”


तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, “शद्रख, मेशख व अबेदनगोचे परमेश्वर धन्यवादित असो. ज्यांनी राजाची आज्ञा मोडून आपल्या परमेश्वराशिवाय अन्य दैवतांची सेवा किंवा उपासना करावयाची नाही असे ठरवून मरण पत्करले, तेव्हा त्याने आपला दिव्यदूत पाठवून आपल्या विश्वासू सेवकांची सुटका केली.


मी तुझ्यामध्ये जे गरीब व दीन, असेच अवशिष्ट लोक ठेवेन. इस्राएलचे अवशिष्ट लोक असतील आणि ते याहवेहच्या नामात आश्रय घेतील.


यात उद्देश असा होता की, आपण ज्यांनी ख्रिस्तावर प्रथम आशा ठेवली होती, त्यांनी त्यांच्या गौरवाच्या स्तुतीचे साधन व्हावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan